इतर अनेक जोडप्यांप्रमाणे तुमच्यातील प्रेम आटू द्यायचं नसेल तर या ७ गोष्टी पाळा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नवरा-बायकोचं नातं विलक्षण असतं. म्हणजे नुकतेच नवीन लग्न झालेले असो वा २५-३० वर्षे लग्नाला झाली असो, त्यामधील नव्याची नवलाई संपल्यानंतर नात्यामध्ये तोचतोचपणा जाणवू लागतो. मग कुठेतरी हे नातं शीळं झाल्याची भावना दोघांच्याही मनांत निर्माण होते.
पण यावर नेमका तोडगा काय काढावा हे समजत नाही. पुढे ७ टिप्सचा विचारपूर्वक विचार करून, त्यानुसार जर काही बदल केल्यास नाते सबंधांमध्ये निश्चितपणे नव्याने दरवळ बहरु शकतो.
१. जोडीदारांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका –
दिवसभरात तुम्ही दोघेही आपापल्या कामात व्यस्त असलात तरी, एक ठराविक वेळ निश्चित करा, जसे एकत्र मिळून चहा किंवा नाष्टा करणे. मग यावेळी एकमेकांशी छान गप्पा मारा. याकाळात कोणत्याही प्रकारचे जुने वाद उकरून न काढण्याचे तंत्र दोघांनीही टाळा.
भलेही जोडीदाराची काही मतं तुम्हाला पटत नसतील तरी त्याचे / तिचे बोलणे लक्ष देऊन ऐका.
दरवेळी प्रत्येक मतावर रिअॅक्ट होणे जरुरीचे नाही. आपलं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं जात आहे, हे जरी समोरच्या व्यक्तीला समजलं तरी एकमेकांविषयी असलेला आदर वाढतो.
२. तुमचा जोडीदार मनकवडा आहे, हे दरवेळी गृहीत धरू नका –
तुमच्या मनात नेमकं काय चाललंय हे तुमच्या जोडीदाराला तुम्ही न बोलता समजलं पाहिजे, अशी बहुतांश लोकांची इच्छा असते, पण दरवेळी ते शक्य होईलच असं नाही.
आपला जोडीदार मनकवडा असावा, अशी चुकीची अपेक्षा ठेवू नका.
३. सतत टीकात्मक सूर लावू नका –
कित्येकदा असं होतं, की जोडीदार एकमेकांसमोर आले, की तो /ती कशी चुकीची आहे, हेच सतत दाखवत असतात. मग त्यासाठी कळत-नकळतपणे जोडीदाराची तुलना इतर व्यक्तीबरोबर केली जाते आणि नेमकी इथेच ठिणगी लागून भडका उडतो.
साधे वाद टोकाला जातात म्हणून जोडीदाराची एखादी गोष्ट पटत नसली तरीही लगेच टीकेचा सूर लावू नका.
४. एकमेकांचा आदर करा –
तुमच्या जोडीदाराला कायम आदराची वागणूक द्या. कदाचित वरील हे शीर्षक वाचताना बऱ्याच जणांना हसू येईल. पण ही गोष्ट हसण्यावारी नेऊ नका.
भले ही तुमच्यात कितीही वाद, भांडणे होत असतील, पण तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्या विषयी तितकाच आदर आहे, हे जरी समजलं तरी वाद फारसे टोकाला जात नाहीत.
===
भावनाशून्य जोडीदार: अनेकांच्या या समस्येवरील हे उपाय संसार वाचवू शकतात
केवळ प्रेम, हँडसम लुक्स यापेक्षा या ९ गोष्टींच्या शोधात असतात मुली!
===
५. एकमेकांविषयी बदल्याची भावना ठेवू नका –
मागच्या भांडणाच्या वेळी माझ्यावर असा राग काढला, आता यावेळी मी त्याचा बदला घेणार, असे ठरवून वागू नका. मुळात भांडणं झाली की ती शक्यतो तिथल्या तिथेच किंवा काही काळाने ती विसरून गेली पाहिजे.
६. एकमेकांना आवश्यक ती स्पेस द्या –
बऱ्याचदा असं होते की, जोडीदारापैकी एकाने कधीही ,काहीही केलं तरी चालतं, परंतु त्याचवेळी मात्र दुसऱ्या जोडीदाराने काहीही करू नये अशी अपेक्षा ठेवली जाते, जी मुळातच चुकीची आहे.
नात्यातील दुरावा दूर करायचा असेल तर एकमेकांना आवश्यक ती स्पेस देणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही, की एकमेकांकडे पूर्णत: दुर्लक्ष करा. उलट एकमेकांना विश्वासात घेऊन अपेक्षित असलेले स्वातंत्र्य बहाल करा.
७. एकत्र डिनर करा किंवा फिरायला जा –
नात्यांमधला गोडवा टिकून राहण्यासाठी दरवेळेला काही महागड्या गोष्टी गिफ्ट म्हणून दिल्या पाहिजेत, असं मुळीच नाही.
कधी कधी दोघांनी मिळून एकत्र डिनरला जाणं, जवळपास एखाद्या ठिकाणी फिरायला जाणं किंवा वॉक घेणं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून देखील मोठा आनंद मिळतो. कधीतरी सहज म्हणून किंवा अचानक एकमेकांना सरप्राईज द्या.
मग हे सरप्राईज एखादा आवडीचा पदार्थ असू शकेल वा एखादी हवी असलेली गोष्ट असू शकेल. असं केल्याने देणारा आणि घेणारा दोघेही खुश होतात. पुन्हा एकदा नव्याने नात्यात गोडवा निर्माण होऊ लागतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.