Site icon InMarathi

उंच मुलींचा बांधा सुबक, व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स

deepika fashion im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उंच मुलगी म्हटले की तिला फक्त साडी किंवा सलवार-कमीज च शोभून दिसतो, असा एक समज आपल्याकडे आहे. खर तर फॅशनची योग्य जाण तुम्हाला असेल तर अगदी वनपीस पासून ते वेगवेगळ्या स्टायिलच्या जीन्सपर्यंत कोणत्याही पेहरावात तुम्ही उठून दिसाल.
मग चला तर पाहूया, अशा कोणकोणत्या स्टाइल तुम्हाला खुलून दिसतील –

 

 

स्कर्ट्स, मिडी किंवा मॅक्सी यापैकी कोणताही पर्याय तुम्हाला शोभून दिसेल –

मुळातच उंची असल्याने स्कर्ट्स, मिडी किंवा मॅक्सी हे कोणतेही पेहराव शोभून दिसतात. जर तुम्ही लॉंग स्कर्ट्स ची निवड केली असेल तर त्यावर शक्यतो शॉर्ट कुर्ती किंवा टी-शर्ट घाला आणि जर मिडी किंवा मॅक्सी घालणार असाल तर कमरेला छानसा बेल्ट बांधा. यामुळे तुमची उंची चांगलीच नजरेत भरेल.

 

 

जम्पसूट घाला नि स्टायलिश दिसा

सध्या जम्पसूट ची फॅशन जोरात आहे. आणि जर या फॅशनसाठी आपण योग्य नाही आहोत असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. उलट उंच मुलीना जम्पसूट चांगलाच उठून दिसतो.

तुम्ही जर न्यू्टरल रंगाचा जम्पसूट आणि त्यावर एखादीच स्टायलिश अॅक्सेसरीज जसे मोठ्या रिंगा किंवा ब्रेसलेट यापैकी काहीही एक व त्यावर मेसी बन अथवा मोकळे सोडलेले केस असा लुक केल्यास निश्चितपणे लोकांच्या नजरा वळून वळून बघत राहतील.

 

 

स्ट्रेट जीन्स तर तुमची सखीच –

स्ट्रेट जीन्स म्हणजे उंच मुलींसाठी वरदानच आहे.याच्या इतका सुटसुटीत आणि फॅशनेबल पर्याय शोधून सापडणार नाही. या जीन्सची रचनाच अशी असते की त्यात तुम्ही एकदम स्लीम दिसतात. त्यातही जर स्कीनी जीन्सचा पर्याय निवडलात तर, तऱ्हेतऱ्हेच्या फॅशन करायला तुम्हाला भरपूर वाव असतो.

 

 

सलवार – कमीज ने मिळवा खास लुक –

मुळातच सलवार-कमीज मध्ये आजकाल हर तऱ्हेचे पर्याय उपलब्ध असतात. गरारा ,शरारा पासून ते धोती, पटियाला, पॅण्ट स्टाइल असे असंख्य प्रकार सलवारी मध्ये पहायला मिळतात तर त्यावर घालण्यासाठी एसिमिट्रीक, थाय लेन्थ, हाय स्लीट, लॉंग लेन्थ, ए- लाइन असे कुर्तीज चे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

आपल्या शरीरयष्टी नुसार जर योग्य सलवार-कमीज ची निवड केलीत तर, त्यामध्ये तुमची उंची अधिक खुलून दिसेल. कारण बऱ्याचदा उंच मुलगी म्हटले की, आपल्या समोर उंच, बारीक, सडपातळ शरीरयष्टी असलेली मुलगी येते. पण उंच मुलीसुद्धा जाड किंवा मध्यम स्वरूपाच्या असू शकतात.

 

त्यामुळेच स्वत:च्या शरीरयष्टीनुसार सलवार-कमीज ची निवड केल्यास ते अधिक योग्य ठरेल. आणि त्यावर मोजकीच ज्वेलरी घातल्यास एकाचवेळी तुम्ही परंपारिक कम फॅशनेबल लुक देण्यास यशस्वी व्हाल.

फ्लेअर पॅण्ट्स

जर तुम्हाला तुमच्या उंच टांगा दाखविणारा लुक कॅरी करायचा असेल तर फ्लेअर पॅण्ट्स हा उत्कृष्ट पर्याय आहे. फ्लेअर पॅण्ट्स आणि त्यावर फुल हात असलेला आणि इन केलेला टॉप घातला तर एकदम झक्कास दिसाल.

===

===

मोनोक्रोम फॅशन

मोनोक्रोम फॅशन म्हणजे काय तर एकाच रंगाचा पोशाख घालणे. उंच मुलीनी जर सलग व एकसंघ असा एकाच रगांतला पेहराव केलात तर ,खांबावर कपडा चढविल्यासारखे दिसेल. परंतु अशा स्वरूपाचा पेहराव करताना जर मध्ये बेल्ट किंवा साईड ला ए कट असलेला पोशाख घातला तर तो अधिक खुलून दिसतो.

जसे तुम्ही काळ्या रंगाचा एखादा वनपीस घातला असेल ,तर त्यावर सौम्य रंगाचा बेल्ट घातल्यास अधिक उठून दिसेल. यामुळे तुमच्या शरीराचा वरचा भाग व पायापासूनचा भाग असा फरक दिसल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा फॅशनेबल लुक प्राप्त होतो.

हाय नेकलाइन पोशाख –

उंच मुलीना हाय नेकलाइन असलेले जसे हाय –कट ब्लाउज , टरटल नेक किंवा हॉलटर नेक असलेले पोशाख अधिक खुलून दिसतात. कारण अशा प्रकारच्या गळ्यामुळे त्यांची उंची अधिक भारदस्त जाणविते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version