Site icon InMarathi

आयुष्यभर १ रुपयांत रुग्णसेवा करणारा हा चेहरा, पैश्यांमागे धावणाऱ्या जगात उठून दिसतो!

sushovan im 4

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

समाजसेवा हीच ईश्वरसेवा असते असं आपण आजवर ऐकत आलेलो आहोत.आपल्या देशात आणि आजूबाजूलादेखील याच समाजसेवेचं व्रत हाती घेतलेले आणि त्यासाठी स्वतःला वाहून दिलेले अनेक लोक आपल्याला माहिती आहेत.

आपल्या कार्यातून लोकांची सेवा व्हावी हा विचार प्रत्येक जण करत नाही. आणि आजच्या या आर्थिक काटकासरीच्या जगात एखादा डॉक्टर तुम्हाला म्हणाला की..”मी माझी चेक-अप फी निम्मी घेतो” तरी तो डॉक्टर आपल्याला दानशूर वगैरे वाटेल. मात्र पश्चिम बंगालमधील एक डॉक्टर रुग्णांचा इलाज करण्यासाठी फक्त एक रुपये घ्यायचा ! विश्वास बसत नसेल तर डॉ.सुशोवन बंडोपाध्याय यांची गोष्ट जरूर वाचा…!

*फक्त एक रुपयात रुग्णाचा इलाज !*

आज आपल्याला डॉक्टरची फी किती असते याचा चांगलाच अंदाज आहे. वैद्यकीय खर्च एवढा वाढला आहे की त्यासाठी लोन किंवा पॉलिसी पद्धती निघाल्या आहेत. मात्र याच आजारांचं निदान आणि रुग्णांना बरं करण्यासाठी डॉ.सुशोवन बंडोपाध्याय फक्त एक रुपया घ्यायचे.

 

 

६० वर्षांपेक्षा जास्त काळच्या कारकिर्दीत या डॉक्टरने आजवर कोणत्याही रुग्णाकडून एक रुपयापेक्षा जास्त शुल्क घेतलं नाही. पश्चिम बंगालमधील हे लोकप्रिय हे असे एक डॉक्टर होते जे आज हयात नसतानाही लोक ‘वन रुपी डॉक्टर’ या नावानेच ओळखत आहेत. आपल्या आयुष्यात त्यांनी या अविरत सुरू असलेल्या वैद्यकीय सेवेला कोविडमध्ये विराम दिला.

*डॉक्टरांच्या संपातही उपचार सुरू !*

२०१९ मध्ये ज्युनियर डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात अनेक डॉक्टर संपावर गेले तेव्हाही मानवसेवेसाठीचे डॉ.बंडोपाध्याय यांचं समर्पण दिसून आलं. सर्व डॉक्टर संपावर गेले असतानाही त्यांनी आरोग्य सेवा बंद केली नाही. तेव्हा त्यांचं म्हणणं होत की, ‘डॉक्टरवरील हल्ल्याचे मी कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. पण, डॉक्टरांच्या संपाला माझाही पाठिंबा नाही. निषेधाचा मार्ग वेगळा असावा. कारण, त्रासलेले रुग्ण जीव वाचवण्यासाठी शेवटी डॉक्टरांचाच हात धरतात.’ यातूनच त्यांची परोपकार भावना दिसून येते.

 

 

*गिनीज बुकमध्ये नोंदवल गेलं नाव..!*

डॉ.सुशोवन बंडोपाध्याय यांना २०२० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २०२० मध्येच सर्वात जास्त रुग्णांवर उपचार केल्याबद्दल त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवल गेलं.

 

औषधांच्या पाकिटावर का असते रिकामी जागा? वाचा, तुम्हाला माहित नसलेलं कारण

औषधांच्या पॅकेटवर असणाऱ्या लाल रेषेचा नेमका अर्थ जाणून घ्या!

*डॉ. सुशोवन हे बोलपूरचे आमदारही राहिले आहेत*

वनरुपी डॉक्टर हे पश्चिम बंगालमधील बोलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. १९८४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. ते पूर्वी तृणमूल काँग्रेसचे सदस्य आणि बीरभूमचे जिल्हाध्यक्ष होते, पण नंतर त्यांनी पक्ष सोडला आणि स्वतःला सेवेत वाहून घेतल.

*’मानवी आत्म्याचे सर्वोत्कृष्ट रूप’; मोदींनी वाहिली श्रद्धांजली*

बंगालचे ‘वन रुपी डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले सुशोवन बंडोपाध्याय यांचं २६ जुलै २०२२ रोजी कोलकाता येथील रुग्णालयात निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. डॉ. सुशोवन जवळजवळ दोन वर्षांपासून किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते. डॉ. बंडोपाध्याय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करताना लिहलं की-

“डॉ.सुशोवन बंडोपाध्याय हे मानवी आत्म्याचे सर्वोत्कृष्ट मूर्त रूप आहेत. ते एक दयाळू आणि मोठ्या हृदयाचे मनुष्य म्हणून स्मरणात राहतील, त्यांनी अनेकांना आजारातून बरं केलं. पद्म पुरस्कार सोहळ्यात त्यांच्याशी झालेला माझा संवाद मला आठवतो. त्यांच्या निधनाने दु:ख झालं आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो. ओम शांती.

अश्या या मानवी सेवेसाठी अविरत झटणाऱ्या डॉक्टरला आपण श्रद्धांजली वाहुयात. केवळ स्वार्थ आणि आर्थिक उन्नती न बघता आपल्या दैनंदिन कार्यातूनही काही प्रमाणात लोकसेवा घडेल अशी अपेक्षा बाळगूयात !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version