' या मंदिरात जाऊन आलेला माणूस तिथल्या शक्तींनी आंतर्बाह्य बदलूनच जातो! – InMarathi

या मंदिरात जाऊन आलेला माणूस तिथल्या शक्तींनी आंतर्बाह्य बदलूनच जातो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देव आहे की नाही? युगानुयुगे आस्तिक आणि नास्तिक लोकांचे वादाचे कारण असणारा हा प्रश्न. प्रत्येकाचा आपला आपला दृष्टीकोन.

आस्तिकांना तो चराचरात दिसतो. नास्तिक लोक त्याला माणसात बघत असतील कदाचित. त्यांच्या लेखी विज्ञान हाच देव असू शकेल, पण जुने लोक म्हणतात जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरु होतं. कारण काही प्रश्न असे आहेत की त्याचं उत्तर आजही विज्ञान देऊ शकलेलं नाही.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागांना देवभूमी असं म्हटलं जातं. कारण पुराण काळात विविध देवी आणि देवतांचे अवतार याच भागात जन्मले असं मानलं जातं. कस्तुरीमृग याच राज्यात सापडतात.

याच भागातील मन्सार येथे सीता धरतीत सामावली. गंगोत्री, यमनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ ही परम पवित्र तीर्थक्षेत्रे याच राज्यात आहेत. जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, मसुरी, नैनिताल ही पर्यटनस्थळे इथेच आहेत.

 

ganga river inmarathi

 

या सर्वांसोबतच अल्मोडा येथे असलेले कसारदेवी मंदिर हे एक असीम शक्तीकेंद्र आहे ज्याचं कोडं आजवर विज्ञानपण सोडवू शकलेलं नाही. काय आहे इथे?

कसारदेवी मंदिर हे दुसऱ्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. जगात या शक्तिस्थळासाठीच प्रसिद्ध आहे.अशी एक धारणा आहे, की या ठिकाणी शुंभ निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी दुर्गा माता कात्यायनी रुपात प्रकट झाली होती. ही देवी जिवंत प्रकट झाली होती.

या मंदिराबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. हे अत्यंत जागृत स्थान आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा देवी पूर्ण करते. या मंदिरातून कुणीही रिकाम्या हाताने येत नाही. शेकडो पायऱ्या चढून आल्यानंतरही थकवा जाणवत नाही. असे का?

तर याचं कारण आहे इथे असलेला व्हॅन एलन बेल्ट! म्हणजे अतिशय शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र.

 

temple feature im 1

 

असं म्हणतात, की संपूर्ण भारत देशात ही एकमेव जागा अशी आहे जिथे चुंबकीय शक्ती अस्तित्वात आहे. आणि लोकांना ती जाणवते.

या मंदिराच्या आसपास अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे. त्याला व्हॅन एलन बेल्ट असे म्हणतात. शास्त्रीय भाषेत व्हॅन एलन बेल्ट म्हणजे नैसर्गिक रित्या तयार झालेले उर्जावान कणांचे क्षेत्र असते. जे तेथील वातावरण भारून टाकते.

वैज्ञानिकांच्या मते, या भूभागात पृथ्वीच्या पोटात विशाल चुंबकीय पिंड आहे. त्यामुळे त्यात विद्युतीय कणांचा एक थर असतो. त्याला रेडीएशन असे म्हणतात. नासा या जगप्रसिद्ध संस्थेने खूप प्रयत्न करूनही या ठिकाणची रहस्ये काही उलगडता आलेली नाहीत.

अलमोडा येथील कसारदेवीचे मंदिर हे असेच चुंबकीय शक्तीने भरलेले स्थान आहे. म्हणूनच या मंदिराच्या परिसरात नासाने GPS-8 असे मानांकन दिले आहे.

 

temple im2

 

या चुंबकीय शक्तीनेच इथे आल्यानंतर मनाला पराकोटीची शांतता मिळते. खुद्द स्वामी विवेकानंद पण येथे येऊन गेल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर देश विदेशातून पर्यटक पण केवळ इथे अनुभवता येणारी अपार शांती मिळावी म्हणून आवर्जून या ठिकाणी येतात. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला देवीची यात्रा भरते.

शेवटी असं म्हणतात भाव तसा देव. तुम्ही जसा बघाल तसा देव तुम्हाला दिसतो. नरहरी सोनाराला विठोबा शंकराच्या पिंडीसारखा दिसला होता. शेवटी मन:शांती महत्वाची नाही का?आणि त्या मन:शान्तीसाठीच लोक कसार देवीला येतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?