' डिमार्ट ते बिगबजार, सुपर मार्केटमधे या १० युक्त्या वापरून तुमचा खिसा हमखास रिकामा केला जातो! – InMarathi

डिमार्ट ते बिगबजार, सुपर मार्केटमधे या १० युक्त्या वापरून तुमचा खिसा हमखास रिकामा केला जातो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही लोकांना सतत खरेदी करायची सवय असते. अशा लोकांना गमतीने ‘शॉपिंग मॅनिया’ झाला आहे असं म्हणतात. कारण हे लोक बिग बझार किंवा डी मार्ट मध्ये सहजवारी जातात आणि कित्येक बिनकामाच्या वस्तू विकत आणतात. त्याचा नंतर निव्वळ अडगळ असाच उल्लेख करायची वेळ येते. तुमचं असं कधी झालंय का? कि सह्जावारी सुपर मार्केटमध्ये गेला आहात आणि अनावश्यक खरेदी करून आला आहात.

हो?… मग तुम्ही नॉर्मल आहात. तुम्हाला शॉपिंग मॅनिया नाही झालेला. तुम्ही भुलभुलैय्यामध्ये अडकून मोहाच्या क्षणाचे बळी ठरला आहात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

काय आहे हा शॉपिंगचा भुलभुलैय्या?

या दहा वर्षात आपल्याकडे मॉल संस्कृती आली. तोवर आपल्या महिन्याच्या वाणसामानाची यादी आई किंवा इतर कुणीतरी बनवत असे. ती यादी दुकानदाराकडे पोहोचवली की तो त्या यादीनुसार सारे सामान देत असे. त्यात आपल्या आवडीनिवडी या नव्हत्याच. जे साबण असेल ते मुकाट्याने लावले जाई. पण जशी भारतीय अर्थव्यवस्था मुक्त झाली तसे मॉलचे पीक भारतातही उगवले.

 

 

ज्या गोष्टी फक्त पुस्तकात वाचल्या होत्या त्या प्रत्यक्षात अवतरल्या. पिन टू पियानो अशी ख्याती असलेले मॉल भारतातही आले. मोठमोठ्या इमारतीमध्ये असलेले वेगवेगळ्या वस्तूंचे स्टोअर, चकचकीत फरशा, सगळ्या तऱ्हेची साबणे, तेलं, शाम्पू एक का दोन? हजार वस्तूंचा मॉल हा लोकांच्या खरेदीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू न ठरला तरच नवल.

तिथे एक वस्तू खरेदीला गेलात कि अनावश्यक दहा वस्तू घेऊनच येता. काय आहे याचं कारण? त्यासाठी त्यांची पॉलीसी अशी असते की तुम्ही खरेदीच्या मोहात पडावंच. काय असतात त्यांचे फंडे?

१) फ्री सँपल-

जगात सगळ्यात मोठा मोहमयी शब्द आहे तो म्हणजे फ्री!

 

free im

 

याच गोष्टीचा फायदा घेऊन मॉलमध्ये एकावर एक फ्री, इतके टक्के फ्री, शांपूसोबत कंडीशनर फ्री अशा नाना पाट्या तुम्हाला खुणावत असतात. आणि तुम्ही आपोआप त्या फ्रीच्या मोहात ती वस्तू खरेदी करता.

२) मांडणी-

सुपर मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा नीट बघा वस्तूंची मांडणी कशी आकर्षकपणे केलेली असते. त्यातही एक गोष्ट असते, अत्यावश्यक वस्तू थोड्याशा मागे ठेवलेल्या असतात पण अनावश्यक गोष्टी समोर नजरेत भरतील अशा ठेवलेल्या असतात.

 

supermarket im

 

त्या मांडणीला भुलून लोक ते बघतात. आणि बघता बघता खरेदी पण करून मोकळे होतात. नंतर लक्षात येतं याची काही गरज नव्हती. दूध, अंडी, किंवा आजकाल पालेभाज्या पण मिळतात. पण त्या एका बाजूला ठेवलेल्या असतात.

३) सेल किंवा प्रमोशनच्या झळकणाऱ्या पाट्या-

सुपर मार्केटमध्ये दर आठवड्याला काही न काही स्कीम चालू असते. मग ते नवे प्रॉडक्ट असो की सेल या पाट्या अगदी दर्शनी भागाला लावलेल्या असतात. त्यामुळे आपोआप ग्राहकांचा कल त्यानुसार खरेदी करण्याकडे असतो.

 

sale im

 

यातली मेख अशी असते की ती स्कीम जाहीर करतानाच अशा वेळी करतात की संपायला काहे दिवसच बाकी असतात. मग ते पटकन घ्यायचं म्हणून अनावश्यक खरेदी केली जाते.

४) कोल्ड्रिंकचा फ्रीज समोर ठेवणे-

बराच वेळ खरेदीसाठी घालवला की तहान लागली की ती भागवण्यासाठी आपण आपोआप पाणी किंवा शीतपेय प्यायची इच्छा होते आणि ते घेतले जातेच. पण ते बाहेरच्या पेक्षा महाग पडते.

 

cold drink im

 

५) सवलतीच्या योजना-

सुपर मार्केटमध्ये हा एक सतत लागणारा बोर्ड. अमुक मालावर अमुक टक्के सवलत. तमुक घेतल्यास तितके टक्के फ्री.एक खरेदी करा त्यावर त्याच किमतीची वस्तू मोफत घ्या. पण यात पण गंमत अशी असते की खुपदा बाहेर त्या वस्तू सुपर मार्केटपेक्षा स्वस्त मिळतात त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे घालावे लागतात.

६) फूड कोर्ट-

सुपर मार्केटच्या बाहेरच एखादा खाऊचा स्टॉल लावलेला असतो. त्यावर ताजे ताजे पदार्थ दिसले की खायची इच्छा होतेच होते. पण हे पदार्थ बाहेरपेक्षा महागच असतात.

७) वस्तूच्या किंमती फसव्या पद्धतीने लिहिणे-

हा सर्रास चालणारा नजरबंदीचा खेळ हे सुपर मार्केट प्रत्येक ग्राहकाशी खेळत असते. उदा. एखादी शांपूची बाटली, त्यासोबत कंडीशनर आणि हेअर सिरम अमुक एवढ्या किंमतीत!

 

giving money im

 

पण त्यावर इतक्या बेमालूम किंमत टाकलेली असते की तो सगळा मामला त्या बॉक्सवरील किंमत ओलांडून पुढे गेलेला असतो आणि हे तुम्हाला काऊंटरवर पैसे भरताना समजते.

८) भाज्यांवर मिस्ट करणे-

आजकाल सुपर मार्केटमध्ये भाज्या ताज्या टवटवीत दिसाव्यात म्हणून त्यावर मिस्ट करतात. म्हणजे मिस्टींग मशीनने त्यावर स्प्रे फवारतात. त्यामुळे त्या टवटवीत दिसू लागतात.

 

supermarket 1 im

 

त्यामुळे भाज्यांची गुणवत्ता कमी होतेच पण फवारणी करायचे नोझल साफ केले जातेच असे नाही त्यामुळे विषाणू, जीवाणू यांची समस्या देखील उद्भवते.

आता यावर उपाय काय?

१) सुपर मार्केटमध्ये दिल्या जाणाऱ्या ऑफर काळजीपूर्वक तपासून पहा.

२) जे खरेदी करायला आला आहात ते आणि तेवढ्याच वस्तू खरेदी करून बाहेर पडा.

३) गरजेच्या वस्तू जवळपासच्या दुकानातूनच खरेदी करा.

४) भाजीपाला सहसा शेतकरी लोकांकडूनच खरेदी करा.

५) सहसा सुपर मार्केट मधून कसलीही सँपल घेऊ नका.

६) तिथे दिली जाणारी कुपन्स न घेता कूपन अॅप घ्या. जी तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकाल.

७) कोणतीही ऑफर बघून एकावर एक फ्री च्या जाळ्यात अडकू नका. एका वेळी एकच वस्तू खरेदी करा. त्यामुळे तुम्हाला तीच वस्तू निम्म्या पैशात मिळू शकणार असते.

८) कोणत्याही वस्तूच्या किंमतीची नित पडताळणी करा आणि मगच खरेदी करा.

या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचं बजेट अपसेट होणार नाही आणि सुपरमार्केटमध्ये जाऊनही तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?