' सकाळी उठल्यावर मळमळतं, डोकं दुखतं? मॉर्निंग नॉशिया दूर करणारे हे ६ सोपेे उपाय तुमच्यासाठीच.. – InMarathi

सकाळी उठल्यावर मळमळतं, डोकं दुखतं? मॉर्निंग नॉशिया दूर करणारे हे ६ सोपेे उपाय तुमच्यासाठीच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सकाळ म्हंटल की उत्साह, फ्रेशनेस आणि दिवसाची नवी सुरवात असा माहौल नजरेसमोर येतो. आपल्यापैकी काहीजण सकाळी फिरायला जातात, व्यायाम, योगासने करतात पण काही मात्र लेट-लतीफ असतात.

रात्रभर जागरण करून सकाळी उशिरा उठतात अशांना मग सकाळी उठल्यावर डोकेदुखी, मळमळ, चक्कर अशा गोष्टींना सामोरे जावं लागत. मित्रांनो आपले आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. तेव्हा सकाळी उठल्यानंतर जर मळमळ, डोकेदुखी असा मॉर्निंग नॉशिया असेल तर काही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करा.

१. पाणी पिणे :

मित्रांनो सकाळी उठल्यावर लगेच एक किंवा दोन ग्लास पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात रात्रभर साचलेले टॉक्झिंस प्रवाही होतात. या अपायकरक द्रव्यांमुळे शरीरातील आमलचे प्रमाण वाढून तुम्हाला डोकेदुखी किंवा चक्कर येवू शकते, तेव्हा हे टाळण्यासाठी पाणी प्या. हा सोपा पण प्रभावी उपाय आहे.

 

drinking water IM

 

२. बेड स्ट्रेचेस :

सकाळी जाग आल्यानंतर अंथरुणातून बाहेर यायच्या आधी काही हलके फुलके स्ट्रेचिंग चे व्यायाम करून तुम्ही तुमचे रात्रभरात आखडलेले शरीर मोकळे करू शकता. स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्यास शरीरातील काही भागांना नकळत मसाज होतो आणि अॅसिडीटीच्या समस्येपासून आपली सुटका होण्याची शक्यता असते.

एक-एक पायाने आणि दोन्ही पायांनी पवनमुक्तासन तसेच हस्तदंगुस्त, सुप्त कपोतासन ही आसने अवश्य करावीत. यामुळे पोट साफ होण्यास देखील मदत होते. पोत साफ झाले की डोकेदुखी किंवा पित्ताचा त्रास बंद होतो.

३. पाचक, आल-लिंबू, पंचामृत :

सकाळी आल,इमबु,साखर, मीठ यांच्यापासून तयार केलेले पाचक खावे किंवा फक्त आल-लिंबू रस घ्यावा अथवा मध, दूध, साखर, तूप,दही यांनी बनवलेले पंचामृत सकाळी अनशा पोटी घ्यावे याने मळमळ, चक्कर तसेच सकाळी उठल्यानंतर होणारा उष्णता किंवा पित्ताचा त्रास होत नाही. किंवा रात्री ३ ग्लास पाण्यात १ चमचा धणे घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. त्यानंतर हे पाणी रात्रभर तसेच ठेवा.

सकाळी ते गाळून प्या, त्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात काही थेंब तुळशीचे थेंब घालून तेही प्या. यामुळे पोटातील अॅसिडीट घटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

 

lemon farming im

 

४. जीभ साफ करणे :

योगअभ्यासानुसार आपल्या तोंडाचे आरोग्य उत्तम असणं आपली तब्येत चांगली राहण्यासाठी अतिशय आवश्यकअसतं. त्यामुळे झोपेतून उठल्याउठल्या ग्लासभर कोमट पाणी प्यायला हवं. त्यानंतर दात, हिरड्या, जीभ साफ करावी.

हे झाल्यावर आपल्या जीभेच्या मध्यभागी दोन बोटं घालून प्यायलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्या शरीरातील अॅसिडीक घटक या पाण्यासोबत बाहेर पडतात आणि अॅसिडीटी कमी होते.

५. चालण्याचा व्यायाम :

सकाळी केलेला चालण्याचा व्यायाम हा तुम्हाला दिवसभर उत्साही रहायला मदत करतो. सकाळी एक दोन ग्लास पाणी प्यायल्यानंतर जर ३० मिनिटं चाललात तर पचनाची क्रिया सुरळीत सुरू होते तसेच शरीरात साठून राहिलेला गॅस बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे एसिडिटी देखील कमी होते. तेव्हा शक्य असेल तर आग्रहाने सकाळी चालायला जा.

 

walk im 2

 

६. प्राणायाम आणि योगासने :

आपले भारतीय आहारशास्त्र आणि आयुर्विज्ञान यांनी शरीराच्या एकंदरीत आरोग्यासाठी प्राणायाम आणि योग करण्यास आवर्जून सांगितलं आहे. प्राणायाम केल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो आणि योगासनांमुळे शरीराला शिस्त तर लागतेच पण चुकीच्या जीवनशैलीमुळे सुरू झालेले बरेचसे त्रास कमी होतात.

 

yoga in marathi

डायबेटिस, बीपी, हृदयविकार : औषधांच्या गोळ्यांपेक्षा कितीतरी गुणकारी ५ घरगुती गोष्टी

गरोदरपणात ही लक्षणं दिसत असली तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

तेव्हा मित्रांनो सकाळी उठल्यावर मळमळतं, डोकं दुखतं? पित्ताचा त्रास किंवा मॉर्निंग नॉशिया होतो आहे? तर वर सांगितलेल्या करण्यास सोप्या अशा टिप्स नक्की फॉलो करा आणि निरामय आरोग्याचे स्वागत करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?