Site icon InMarathi

वडिलांनी हिऱ्याची अंगठी मुलीला दिली, मुलीने तीच अंगठी विकून वडिलांचा काटा काढला

kanhaiya singh featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेम प्रकरणाला विरोध म्हणून घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्या मुलांचा जीव घेतल्याची घटना अनेकदा तुम्ही ऐकली असेल, पण आपल्या प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या बापाचा खून, तो ही त्यानेच वाढदिवसाला भेट म्हणून दिलेल्या हिऱ्याच्या अंगठीने करावा. आणि ते देखील स्वत:च्या लाडक्या मुलीने करावा.

आहे की नाही अजब घटना. काय आहे ही कहाणी? का मुलीला आपल्या वडिलांचा खून करावासा वाटला याविषयी जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण आहे तरी काय?

ही कहाणी आहे कलकत्ता येथील जमशेदपूर जिल्ह्यातील आदित्यपूर शहरातील. येथील राजकीय नेता कॉंग्रेस पक्षाचे अरविंद सिंह यांचे मेहुणे कन्हैया सिंह यांची मुलगी अपर्णा हीचे राजवीर नामक मुलाबरोबर गेल्या पाच वर्षापासून प्रेम प्रकरण सुरु होते.

सुरुवातीपासूनच वडलांचा या प्रेमाला विरोध होता. पण मुलगी देखील हार मानण्यास तयार नव्हती. डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये राजवीर आणि अपर्णाची ओळख झाली. त्यावेळी राजवीर दहावीत शिकत होता तर अपर्णा आठवीत होती. तेव्हाच दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. आणि ते पुढेही तसेच राहिले.

 

 

अल्लड वयातील प्रेम मुले लवकर विसरून जातात असे समजून कन्हैया सिंह यांनी त्या दोघांना चांगलीच समज दिली. आणि एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले. पण दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते.

तेव्हा कामाच्या निमित्ताने वडिलांनी मुलाला आपल्या कार्यालयात बोलविले आणि मुलाच्या डोक्यावर पिस्तुल रोखून आपल्या मुलीबरोबर चे संबंध तोडण्यास सांगितले. इतकेच नाही तर त्या मुलाला देखील चांगलीच मारहाण केली.

तेव्हा मुलाच्या वडिलांनी घाबरून आदित्यपूर येथील आपले घरदार विकून मांझी टोला येथे जाऊन राहू लागले. राजवीरने देखील अपर्णा बरोबर बोलणे तोडले होते. राजवीर आपले ऐकत नाही हे पाहून ,अपर्णाने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ राजवीरला पाठविला.

राजवीरने हा व्हिडीओ त्याच्या वडिलाना दाखविला.आणि तिच्या बरोबर पुन्हा एकदा बोलण्यास सुरुवात केली. याबाबत कन्हैया सिंहला समजताच, त्याने राजवीरला जीवे मारण्याची धमकी दिली.

एव्हाना ,वडिलांच्या मृत्युनंतरच आपण एकत्र येऊ शकतो ,याची खात्री दोघा प्रेम वीरांना झाली. आणि त्याचवेळी अपर्णाने वडिलाना मारण्याचा कट रचला.

यासाठी राजवीरवर संशय येऊ नये म्हणून त्याचा शुटर मित्र निखिल व त्याचा मित्र ,जो कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष छोटराय किस्कू यांचा मुलगा होता यांची मदत घेण्यात आली. आपले वडील कोणत्या वेळेला कुठे आहे ,याबाबतची सर्व बातमी अपर्णा त्यांना पुरवित असे.

पण कन्हैया सिंह जिथे जिथे जात ,तिथे त्यांच्या राजकीय वलयामुळे सभोवताली गर्दी होत असे. त्यामुळे त्यांना मारण्याचा प्रयत्न दोन-तीनदा फसला.

तेव्हा राजवीर सिंह ने रोख ५ हजार रूपये ,देशी दारूची बाटली आणि हिऱ्याची अंगठी ,जी अपर्णाने त्याला भेट दिली होती. ती निखिलला दिली. आणि कसेही करून यावेळेला काम फत्ते झाले पाहिजे असे सांगितले.

 

 

आता शुटर निखिलने देखील आपल्या दोन सहकाऱ्याची मदत घेत, २९ जूनच्या रात्री कन्हैया सिंह घरी परतत असताना, अपर्णाने सांगितलेल्या लोकेशनवर त्यांची हत्या करवली.

या हत्येनंतर राजवीर सिंह त्याच्या कलकत्ता येथील फार्म हाउसवर जाऊन राहिला तर शुटर निखिल त्याच्या गावी जाऊन राहू लागला. इथे कॉंग्रेस सभासदाची अचानक हत्या होते म्हणून आदित्यपूर जिल्ह्यात चांगलाच गहजब झाला.

या खुनाचा लवकरात लवकर शोध लागला पाहिजे,यासाठी पोलिसांवर दबाव येऊ लागला. विशेष म्हणजे यात कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष छोटराय किस्कू, हा तपास लवकरात लवकर व्हावा म्हणून आंदोलन करीत होते.

पोलिसांनी तपास सूत्रे हाती घेताच, शुटर निखिल आणि त्याचा साथीदार ,जो छोटूराय किस्कू यांचा मुलगा होता ह्यांना अटक करताच ही सर्व कहाणी समोर आली. यामुळे कॉंग्रेस सदस्य छोटूराय हे आश्चर्यचकित तर झालेच.

 

 

पुढे अपर्णा आणि राजवीर यांना देखील अटक करण्यात आली. कॉंग्रेस सदस्य कन्हैया सिंह यांच्या हत्येमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नसुन घराचाच भेदी कारणीभुत ठरला, हे या निमित्ताने सिद्ध झाले.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version