आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
श्रावण म्हंटलं की कित्येक लोकांची नाकं मुरडतात कारण तेव्हा बऱ्याच गोष्टींवर बंधनं असतात. अगदी कांदा लसूणपासून थेट मांसाहार किंवा मद्यपानापर्यंत कित्येक गोष्टींवर बंधनं असतात.
अगदी सगळेच लोकं सर्रास श्रावण पाळतातच असं नाही, पण एकंदरच मांसाहार किंवा मद्यपान करणाऱ्या व्यक्तींसाठी श्रावण हा रावणच असतो. आपल्याइथे तर श्रावण सुरू होण्याआधी गटारी हा असा वेगळा सण म्हणूनच साजरा केला जातो.
अर्थात यावरून बरीच मतमतांतरं होतात, वाद होतात पण लोकं अजूनही दीपअमावस्येबरोबरच गटारीदेखील अगदी धूमधडाक्यात साजरी करतात. सोशल मीडियावर याबद्दल एकंदरच वेगवेगळे जोक्स आणि मीम्स व्हायरल होतात.
अर्थात या सगळ्या गोष्टी एकीकडे, पण श्रावण हा अत्यंत भक्तिभावाने साजरा करणारी, दर श्रावणी सोमवार आणि शुक्रवार उपवास करणारी माणसंसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पण जे कट्टर मांसाहार करणारे असतात त्यांची मात्र या महिन्यात बारिच पंचाईत होते हे मात्र नक्की.
घरात या गोष्टी करता येत नाहीत म्हणून काही लोकं बाहेर जाऊन मांसाहार करतात. अर्थात श्रावणात मांसाहार न करण्यामागची वैज्ञानिक कारणं ठाऊक असतात तरी कित्येक लोकं मांस मच्छी खातात मद्यपान करतात.
पण यावर्षी मात्र भारतातल्या एका शहरात मात्र हा श्रावण अगदी कट्टरपणे पाळला जाणार आहे. या शहरात घरात नव्हे तर बाहेरही मांस मच्छी किंवा तत्सम पदार्थ विकण्यावर बंदी घातली गेली आहे.
गुजरातमधील राजकोट शहरात हा अद्भुत नियम लागू होणार आहे. २९ जुलैपासून श्रावण सुरू होणार असून राजकोटमध्ये दर श्रावणी सोमवारी बाजारात मांस मच्छी आणि इतर पदार्थ विकण्यावरसुद्धा बंदी घातली जाणार आहे.
इतर दिवशी जरी या शहरात मांसाहारी पदार्थ विकण्यास परवानगी असली तरी श्रावणी सोमवारी मात्र त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.
हा नियम कितपत पाळला जाणार आहे हे येणारी वेळच ठरवेल, पण एकंदरच श्रावण महिन्यात असे निर्बंध घातल्याने काही लोकं आनंदी आहेत तर काही लोकं निराश आहेत.
—
- श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागे काय कारणं आहेत? समजून घ्या..
- हिंदू धर्मातील “शाकाहाराचं” उदात्तीकरण मोजक्याच समूहांच्या अहंकारातून
—
लोकांनी काय खावं, कधी खावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि यामुळेच राजकोट शहरात असं बंधन घातल्याने बरीच लोकं नाराज आहेत.
श्रावण महिन्यात कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य असण्यामागे २ प्रमुख कारणं असतात. एक कारण म्हणजे हा महिना म्हणजे प्राण्यांचा प्रजनन काळ असतो आणि दुसरं कारण म्हणजे कांदा लसूण आणि मांसाहार हे या काळात पचायला जड असते म्हणून या गोष्टी श्रावण महिन्यात खाण्याचे टाळावे असे आपल्या पुराणातून सांगितले आहे.
पण सध्या काळ बदलला आणि तसेच लोकांची जीवनशैलीही बदलली आहे, त्यामुळे प्रत्येकालाच याप्रमाणे श्रावण पाळता येईलच असं नाही तरी आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं जपलंच पाहिजे.
जसं कुणी कधी काय खावं यावर कुणी जबरदस्ती करू शकत नाही तसं श्रावण पाळायलाच पाहिजे अशी सक्तीसुद्धा कुणीच करू शकत नाही. त्यामुळे या वैयक्तिक गोष्टीवर अशा प्रकारची बंधनं लादली तर नक्कीच त्याचा विरोध होऊ शकतो.
राजकोट इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आणि त्यामागचा हेतु जरी चांगला असला तरी त्यामुळे उद्योगक्षेत्र आणि लोकांचा व्यवसाय यावर त्याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो. असो या निर्णयामुळे खरंच त्या दिवसांत राजकोटमध्ये मांसाहार होणारच नाहीये याची शाश्वती मात्र कुणीच देऊ शकणार नाही!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.