आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आणि देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला.
आयुष्यभर संकटांची मालिका झेलणाऱ्या, खडतर वाटेतून मार्ग काढणाऱ्या द्रौपदी यांची संघर्षगाथाही या निमित्ताने चर्चिली जात आहे. एकूणच द्रौपदी मुर्मू यांबद्दल बरीच माहिती शोधली जात असतानाच यानिमित्ताने एक नवी बाब समोर आली आहे.
देशाच्या नव्या राष्ट्रपतींचं खरं नाव द्रौपदी नव्हतंच ही बाब अनेकांना अजूनही खरी वाटत नाही. मात्र प्रत्यक्ष द्रौपदी यांनीच याबाबतचा खुलासा नुकताच एका मुलाखतीत केला आहे.
मुळ नाव वेगळंच!
द्रौपदी यांचं मुळ नाव द्रौपदी नव्हतंच. मुळच्या ओडिशाच्या असणाऱ्या द्रौपदी यांचं मुळ नाव संथाली भाषेतील होतं. ओडिसासह काही राज्यात संथाली हीच भाषा बोलली जाते. त्यामुळे या भाषेतील त्यांचं नाव पुती असं होतं.
हे नाव केवळ संथाली भाषेतील नसून त्यांच्या आजीचं नाव त्यांना देण्यात आलं होतं. संथाली संस्कृतीत घरात मुलगी जन्माला आली तर तिच्या आजीचं अथवा मुलाचा जन्म झाला तर त्याच्या आजोबांचं नाव त्याला दिलं जातं. याच प्रथेनुसार त्यांना ‘पुती’ हे नाव देण्यात आलं होतं.
शाळेत प्रवेश मिळेपर्यंतं पुती हिच त्यांची ओळख होती. मात्र शाळेती प्रवेशामुळे द्रौपदी या नावाचा जन्म झाला.
झालं असं की त्यांच्या शाळेतील शिक्षकाला पुती हे नाव फारसं आवडलं नाही. यापुढील प्रवासात एखादं चांगलं, वेगळं नाव जोडलेलं असावं या विचारांनी त्यांनी नावाची शोधाशोध केली.
संबंधित शिक्षक हे महाभारताचे अभ्यासक असल्याने त्यांनी महाभारतातील पात्र असलेल्या ‘द्रौपदी’ या नावाची निवड केली. तेव्हापासून द्रौपदी याच नावाशी त्यांची गट्टी जमली.
मात्र शाळेत असताना त्यांची ओळख द्रौपदी तुडू असा होती. ‘तुडू’ हे त्यांचं माहेरचं आडनाव! शाम चरण या बॅंक अधिकाऱ्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी मुर्मू हे आडनाव स्विकारलं.
याच द्रौपदी मुर्मू आज भारताच्या राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळत आहेत. येत्या काळात देशासमोर बरीच आव्हानं असली तरी अत्यंत वक्तशीर, शिस्तीच्या आणि संयमी असलेल्या द्रौपदी मुर्मू त्यावर मात करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
—
- हार पत्करून थेट राष्ट्रप्रमुख पदी झेप घेणाऱ्या आधुनिक “द्रौपदी”ची कहाणी बरंच काही शिकवून जाते
- राष्ट्रपती ज्या शाही बग्गीतून आल्या ती खरी तर टॉस जिंकून मिळाली आहे
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.