Site icon InMarathi

“त्या” कामुक गाण्याला २ दिग्गजांनी नकार दिला अन् हरहुन्नरी आशाजींनी इतिहास रचला

shammi kapoor song IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस जेवढ्या जास्त उंचीवर जाऊ लागतो तसतसे त्याच्या आयुष्याला कंगोरे येत जातात. त्या कंगोर्‍यांना अनेक पदर असतात. त्यात अनेक व्यक्ती, घटना , प्रसंग, आठवणी लपलेल्या असतात. भारतीय संगीत विश्वात त्यातही हिन्दी चित्रपट सृष्टीत ‘मंगेशकर सिस्टर्स’ ना ओळखत नाही असा माणूस दुर्मिळच!

या मंगेशकर भगिनींच्या नात्याचे, प्रेमाचे, दुराव्याचे अनेक किस्से आहेत. एक कोकणी सोलकढी तर एक तिखट ठसकेबाज तर्रीदार रस्सा. अशा या दोघींच्या आंबट-गोड नात्याने अनेक किस्से जन्माला घातले.

 

 

लता मंगेशकर यांनी वयाच्या १४व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली. वडिलांच्या अकाली निधनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबातील मोठी मुलगी असल्याने लतादीदींनीही ही जबाबदारी चोखपणे पार पाडली.

आशा मोठी झाल्यावर लताला तिच्याकडूनही तितकीच जबाबदारी आणि गांभीर्य अपेक्षित होते. पण आशाचा मूड लहानपणापासूनच वेगळा होता. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे बंधन तिला आवडत नव्हते. त्यांनी त्यांचे वेगवेगळे मार्ग निवडले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लता दीदी कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तशीर होत्या, इतक्या की गाणे रेकॉर्ड करताना त्या आपल्या चपला रेकॉर्डिंग रूम बाहेर काढून जायच्या, कारण त्यांच्यासाठी ते सरस्वतीचे मंदिर होते. अशा लता दीदी पॉप, रॉक, किंवा वॅम्प टाईपची गाणी देखील गायच्या नाहीत. जेव्हा आशाताईंनी गाणे गायला सुरवात केली तेव्हा त्यांना लतादीदिनी नाकारलेल्या वाईट मुली आणि व्हॅम्प्ससाठी म्हणायची गाणी किंवा कमी बजेटच्या चित्रपटातील गाणी मिळत होती.

एका मुलाखतीत ओ.पी. नय्यर यांनी सांगितले होते की आशाला इतका लता फोबिया होता की आशाला हे पटवून द्यायला मला काही महिने लागले की तिची स्वतःची गायन शैली विकसित करण्याइतपत तिचा आवाज वैयक्तिक आहे…मित्रांनो हे सगळे सांगण्यामागे देखील एक किस्सा लपला आहे.

 

 

तो आहे १९६४ साली प्रदर्शित झालेला आणि गाण्यांमुळे सुपरहीट झालेला, शम्मी कपूर -साधना अभिनीत चित्रपट ‘राजकुमार’! या चित्रपटाशी जोडले गेलेले दोन किस्से आहेत. या चित्रपटाचे संगीतकार होते शंकर – जयकिशन आणि गीतकार होते हसरत जयपूरी आणि शैलेन्द्र तर चित्रपटाचे दिग्दर्शक होते के. शंकर.

झाले असे की ‘आ जा आयी बहार’ या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यासाठी लतादीदी स्टुडियोत आल्या त्यावेळी तिथे शम्मी कपूर देखील होते, त्यांना पाहून दीदी अस्वस्थ झाल्या आणि वाहयात बोलणार्‍या या माणसाला (शम्मी कपूर) स्टुडियो बाहेर जाण्यास सांगावे यासाठी त्यांनी शंकर- जयकिशन यांच्याकडे आग्रह धरला.

काही केल्या त्या ऐकेनात. आता प्रश्न हा उभा राहिला की शम्मी यांना हे सांगणार कसे? पण ही कुणकुण शम्मी यांच्या कानावर गेली आणि लता यांना गाणे रेकॉर्ड करू दे असे म्हणून शम्मी कपूर तेथून निघून गेले.

दूसरा किस्सा याहून खमंग होता. या चित्रपटासाठी लताजी, सुमन कल्याणपूर आणि महम्मद रफी हे एक गाणं म्हणणार होते. त्याच दरम्यान दीदी आणि रफीसाब यांच्यात गाण्याच्या रोयल्टी वरून काही कुरबुर होवून त्यांच्यातली बोल-चाल बंद होती, त्यामुळे मी त्यांच्यासोबत युगलगीत गाणार नाही असे लतादीदी यांनी संगीतकारांना कळवले.

 

 

तेव्हा युगलगीते गाण्यासाठी सुमन कल्याणपूर यांची निवड करण्यात आली त्यानुसार दोन युगलगीतांचे रेकॉर्डिंग झाले आणि आता ‘कहानीमे ट्विस्ट’ येण्याची वेळ आली.

सिनेमात सिनेमॅटिक लिबर्टी साठी जॅझ म्यूजिक असलेले एक गाणे घ्यायचे ठरले. आता या गाण्याचे वैशिष्ट्य असे की त्यात वॉइस मोड्यूलेशन मोठ्या प्रमाणावर होते. रफी साहेबांना ते गाणे गाण्यात काहीच अडचण नव्हती पण लतादीदी आणि सुमनजी यांनी मात्र नकार दिला.

या नाकारामागेदेखील बरीच कारणे होती एकतर ते गाणे त्या काळातले हिंदी सिने संगीतातील सर्वात कामुक अर्थ असलेले गाणे होते, त्यामुळे त्या काळातील समाज आणि संस्कृती व्यवस्थेला मानणार्‍या लोकांसाठी हे गाणे व्हल्गर ठरले असते आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाचे टेक्स्चर त्या गाण्याला सूट होणारे नव्हते.

शंकर जयकिशन यांच्यासमोर आता एकच पर्याय होता, ‘आशा भोसले’! त्यांनी आशाताईंना हे गाणे गाण्यासाठी विचारणा केली असता त्या तयार झाल्या पण त्यांनी अट घातली की लता दीदी यांना एका गाण्यासाठी मिळणार्‍या बिदागीच्या पाचपट बिदागि त्यांना या गाण्यासाठी मिळाली पाहिजे. ते ऐकून शंकर-जयकिशन चक्रावून गेले.

ही गोष्ट शम्मी कपूर यांना समजल्यावर त्यांनी सिनेमाच्या दिग्दर्शकांकडे निरोप पाठवला की भलेही माझी फी कमी करा पण आशाताई यांना त्या म्हणतात तेवढे मानधन द्या कारण हे गाणे फक्त त्याच म्हणू शकतात.

त्यानंतर एका अतिशय सुंदर आणि पाश्चात्य संगीताचा आभास करून देणार्‍या पण दुर्दैवाने आजवर अंडररेटेड असलेल्या कलात्मक अशा ‘दिलरुबा दिल पे’ या गाण्याचा जन्म झाला.

 

 

गाण्यात आशाजी आणि रफी साब यांच्या आवाजातील मोड्युलेशन्स आपल्याला ऐकायला मिळतात. नवलाची गोष्ट म्हणजे या गाण्यात कोणत्याही व्हॉईस व्होकल मशीन चा वापर झालेला नाही.

रफी साहेबांनी आपल्या आवाजाने केलेली कमाल पाहता त्यांना हिन्दी चित्रपट संगीताचे एल्विस प्रेस्ले म्हंटले गेले आणि त्यांना आशाताई यांनी दिलेली साथ तर अप्रतीमच. इतकेच नाही तर हे गाणे ज्यांच्यावर चित्रित झाले त्या साधना आणि शम्मी कपूर यांनी गाण्याचे हुबेहूब लिप्सिंग करून कमाल केली आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version