Site icon InMarathi

बोगद्यात शिरलेली एक ट्रेन कधीच बाहेर पडली नाही: एक न सुटलेलं कोडं

train tunnle im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादं वाहन, ट्रेन किंवा विमान अचानक नाहीसं किंवा अदृश्य होण्याचे प्रकार केवळ चित्रपट आणि मालिकांमध्येच घडू शकतात. अशी जादू प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही.

एक संपूर्ण विमानाच्या विमान अदृश्य होणं अशा कथानकावर आधारित मॅनिफेस्ट नावाची एक इंग्रजी मालिका आहे. जेएल ५० नावाची एक अशाच काहीशा गोष्टीवर आधाराची हिंदी मालिका सुद्धा एका ओटीटी ओलाटफॉर्मवर पाहायला मिळते. यात टाइम ट्रॅव्हल या संकल्पनेचा वापर करून कथानक रंगवलेलं पाहायला मिळतं.

 

 

टाइम ट्रॅव्हल प्रत्यक्षात शक्य असल्याचा कुठलाही पुरावा विज्ञानाकडे उपलब्ध नसला, तरी अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, असं सांगणाऱ्या काही बाबी इतिहासात उल्लेखित आहेत.

अशीच एक ट्रेन बोगद्यात शिरून अदृश्य झाली होती. कुणी तिला भुताटकी म्हटलं, तर कुणी टाइम ट्रॅव्हल! चला जाणून घेऊया या रहस्यमयी ट्रेनबद्दल..

…आणि ट्रेन अदृश्य झाली

ही घटना आहे, १९११ साली इटली या देशाची राजधानी असणाऱ्या रोम शहरात घडलेली! १०६ लोकांसह एक ट्रेन प्रवास करत होती.

झानेटी या कंपनीची ट्रेन अखेरच्या स्थानकापर्यंत पोचलीच नाही. त्याआधीच एका बोगद्यात ती शिरली आणि अचानक नाहीशी झाली. ही ट्रेन बोगद्यातून बाहेर आल्याचा कुठलाही पुरावा नाही.

 

 

याहूनही अधिक आश्चर्याची गोष्ट अशी ठरते, की १९११ साली अदृश्य झाली ही ट्रेन तब्बल ७० वर्षं आधीच, मेक्सिकोमध्ये पाहिली गेली होती, असं अनेकांचं म्हणणं आहे. गायब होणारी ट्रेन भूतकाळात दिसली होती, त्यामुळे यामागे टाइम ट्रॅव्हल असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली.

ही भुताटकी तर नाही ना…

बोगद्यात अदृश्य झालेल्या ट्रेनमध्ये १०६ प्रवासी होते, असा उल्लेख अनेक ठिकाणी दिसत असला, तरी त्या ट्रेनमध्ये १०४ लोकच असल्याचा सुद्धा एक पुरावा आहे.

ज्या बोगद्यात शिरून ट्रेन नाहीशी झाली, त्याच बोगद्याच्या बाहेर त्या ट्रेनमधून प्रवास करणारे दोघे प्रवासाची सापडल्याचं सुद्धा म्हटलं जातं.
या दोघांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून तो बोगदा अगदी स्पष्ट दिसत होता. मात्र अचानक तिथे धूर दिसू लागला, समोरच्या गोष्टी धुरकट झाल्या. हे सगळं पाहून ते दोघेही घाबरले आणि त्यांनी ट्रेनमधून बाहेर उडी टाकली.

त्यानंतर बोगद्यात शिरलेली ट्रेन पुन्हा कधीच बाहेर आली नाही. ट्रेन अदृश्य झाल्यानंतर मोठं शोधकार्य होऊन सुद्धा ट्रेनच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता, हे सत्य मात्र नाकारून चालत नाही.

 

 

बोगद्याजवळील धूर आणि गायब झालेली हीच ट्रेन अनेक वर्षांआधीच दुसऱ्या देशात दिसली होती, या घटनेचे पुरावे यामुळे अनेकांनी ही एक भुताटकी असल्याचं म्हटलं होतं. मात्र ट्रेनचं अदृश्य होणं या घटनेमागे नेमकं काय होतं हे अजूनही उलगडलेलं नाही.

मेक्सिकोच्या डॉक्टरचा दावा…

या घटनेला पुष्टी देणारा दावा मेक्सिकोच्या एका डॉक्टरने केलेला आढळतो. ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती, तिथे एक दिवस अचानक १०४ जण भरती करण्यात आले. हे सगळेच वेडे झाल्यासारखे वाटत होते. याशिवाय ते नेमके कुठून आले होते, कोण होते, याविषयीचं रहस्य कुणालाही ठाऊक नव्हतं.

ते सगळे लोक ट्रेनने आल्याचं आणि रोम मधून प्रवास सुरु केल्याचं सांगत होते. मात्र १८४० च्या त्या काळात रोमहून थेट मेक्सिकोला येणारी एकही ट्रेन अस्तित्वात नव्हती. अशी एखादी ट्रेन किंवा असे कुणी लोक मेक्सिकोमध्ये आले आहेत, अशी कुठलीही नोंदणी केल्याचं सुद्धा दिसत नव्हतं. त्यामुळे ही एक आश्चर्यकारक घटना होती.

तरीही रहस्य उलगडलं नाहीच…

इटलीमधून अदृश्य झालेली ट्रेन भूतकाळात मेक्सिकोमध्ये पोचली; हे नेमकं कसं घडलं, यामागे नेमकं काय होतं याविषयी कुठलाच पुरावा अस्तित्वात नाही. एवढंच नाही, तर या ट्रेनबद्दल आणखीही काही रहस्यमयी गोष्टी सांगितल्या जातात.

 

 

इटली, रशिया, रोमानिया, जर्मनी अशा देशांमध्ये अनपेक्षित अशी ट्रेन पाहिली गेल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. या ट्रेनचं त्यांनी केलेलं वर्णन, १९११ साली रोममधून अदृश्य झालेल्या ट्रेनशी तंतोतंत जुळणारं आहे. असं असूनही, या ट्रेनविषयीचं रहस्य, बोगद्यात जाऊन तिने पुन्हा बाहेरच न येण्याचं कोडं आजही न सुटलेलं किंवा अनुत्तरितच आहे असं म्हणायला हवं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version