देशभरात सेलिब्रेटींवर ईडीच्या धाडी मात्र रजनीकांत यांचं कौतूक होतंय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर झालेली इडीची कारवाई ठाऊक नाही, असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. अगदी लहान मुलांनी सुद्धा याविषयी ऐकलेलं असेल, इतका हा विषयचर्चेत होता. त्यातच शिवसेनेचे राज्यसभेचे आमदार संजय राऊत, प्रताप सरनाईक यांची संपत्ती इडीने जप्त केली होती.
राजकीय नेतेच नव्हे तर हिरो कंपनीचे मालक, बंगालमधील अभिनेत्री, काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी अशा वेगवेगळ्या स्तरावरच्या व्यक्तींच्या मागे ईडीच्या पीडा लागली आहे. ईडीची कारवाई सूडबुद्धीने होत आहे अशी टीका कायम विरोधकांनी केलीच आहे.
वेळच्या वेळी टॅक्स भरा अशी ओरड सतत सरकारकडून केली जात असते. सामान्य माणूस वेळच्या वेळी CA मंडळींना पकडून त्यांच्याकडून सगळ्या बाबी पूर्ण करून घेतात. सेलिब्रेटी मंडळी देखील वेळच्या वेळी टॅक्स भरतात. अक्षय कुमार हा बॉलीवूडमधला सर्वात जास्त टॅक्स भरणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो.
बॉलीवूडमध्ये जसा अक्षय कुमार आहे तसा तामिळ सिनेमाचा थलाईवा रजनीकांत यांचा नंबर लागला आहे. यासाठी त्यांचा सत्कार देखील केला आहे. जाणून घेऊयात त्यांच्या सत्कारा मागचं कारण…
रविवारी म्हणजे काल २४ जुलै देशात आयकर दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचं निम्मित साधून चेन्नईच्या आयकर विभागाने नियमित आयकर भरला म्हणून रजनीकांत यांचा सत्कार केला. रजनीकांत यांच्या मुलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर करत ही माहिती दिली.
जो माणूस नियमित आयकर भरतो त्याचे हात दान करण्यासाठी देखील कायमच पुढे असतात. २० वर्षांपूर्वी रजनीकांत यांनी राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पासाठी १ करोड रुपये दिले होते. २०१४ मध्ये सायक्लॉन वादळ तामिळनाडूत आले होते तेव्हादेखील रजनीकांत यांनी १० करोड रुपये मुख्यमंत्र्यांच्या फंडात जमा केले होते.
मध्यन्तरी रजनीकांत यांनी राजकारणात जाण्याची घोषणा केली होती मात्र त्यांनीच यातून त्यांनीच माघार घेतली. रजनीकांत फाउंडेशनच्या वतीने अनेक समाजउपयोगी काम ते करत असतात.
रजनीकांत यांच्याबद्दल असंही म्हंटल जात की ज्या सिनेमात ते काम करत असतील आणि तो सिनेमा जर फ्लॉप झाला तर ते सिनेमासाठी घेतलेली पूर्ण फी निर्मात्यांना देऊन टाकतात, मुळात रजनीकांत यांचा एखादा सिनेमा न चालणं ही अशक्य गोष्ट आहे. केवळ भारतातच नव्हे तर आशिया खंडात त्यांची क्रेझ आहे तिकडे देखील त्यांचे सिनेमे भरपूर चालतात.
नुकत्याच आलेल्या एक रिपोर्टनुसार रजनीकांत यांनी जेलर नावाच्या आगामी सिनेमासाठी १५० करोड इतकी फी घेतली आहे असं बोललं जात आहे. आज बॉलीवूडच्या अक्षय कुमार पाठोपाठ अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांचा सर्वाधिक आयकर भरण्यात नंबर लागतो.
–
रजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं वाटेल!
अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असूनही, आयकर भारतात भरण्यामागचं खरं कारण
–
भरपूर मेहनत करून नियमित टॅक्स भरणारी मंडळी एकीकडे तर दुसरीकडे देशाला चुना लावून परदेशात पळून जाणारी बिझनेसमन मंडळी. अशा लोकांवर कारवाई होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा हे नक्की…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.