' पतीच्या निधनानंतर पत्नीच्या शरीराचं…अंगावर काटावर आणणारी प्रथा आजही जिवंत आहे! – InMarathi

पतीच्या निधनानंतर पत्नीच्या शरीराचं…अंगावर काटावर आणणारी प्रथा आजही जिवंत आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपला भारत हा रूढी आणि परंपरा प्रिय असा देश आहे ,असं म्हंटल जात. कारण आपण आधुनिक दृष्ट्या कितीही प्रगत झालो असलो तरीही ,कालबाह्य झालेल्या परंपरा आजही तितक्याच अभिमानाने पाळत असतो. आता हेच बघा ना फार पूर्वी पासून आपल्याकडे सतीची परंपरा पाळली जात होती.

सती म्हणजे काय तर नवऱ्याच्या मृत्यू नंतर त्याच्या चितेवर त्याच्या बायकोला जिवंत जाळणं. कारण काय तर नवरा गेल्यानंतर त्या बाई च्या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही.म्हणून तिने देखील त्याच्या बरोबर स्वत:ला जाळून आपले आयुष्य संपवावे. परंतु राजा राम मोहन रॉय आणि तत्कालीन ब्रिटीश सरकार यांच्या प्रयत्नाने कायद्याने या प्रथेवर बंदी घालण्यात आली.

 

sati inmarathi
culture trip

मध्यंतरी म्हणजे मागच्या १५ -२० वर्षांपूर्वी राजस्थान मध्ये जबरदस्तीने एका स्त्रीला सती जाण्यासाठी प्रवृत्त केलं होत. तिकडच्या पोलीस आणि समाजसेवकांच्या मदतीने हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

तसं पाहिलं तर आपल्या देशातल्या विविध प्रांतात, तेथील विविध भागात अनेक मूर्खपणाच्या प्रथा, त्यामागं कोणत्याही स्वरूपाचे योग्य ते कारण नसताना आजही पाळल्या जातात. अर्थात फक्त आपणच नाही तर जगभरात असे अनेक देश आहे, जे कालबाह्य परंपरा पाळण्यात आपल्या इतकेच प्रगतीवर आहेत. किंबहुना आपल्यापेक्षा एक पाऊल आणखी पुढे आहेत,असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

याच मांदियाळीतला देश म्हणजे इंडोनेशिया. येथील दानी नावाच्या एका आदिवासी जमातीमध्ये पतीच्या मृत्यू नंतर त्याच्या बायकोचे बोट कापण्यात येत. ही प्रथा इकिपलीन म्हणून ओळखली जाते. असे केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते ,असा समज आहे.

 

Indonesia-temple inmarathi
scriptmag.com

या प्रथेमागचा नेमका विचार

दानी जमातीतील लोकांच्या मते ,स्त्रीचे एक बोट कापल्याने, तिला याची जाणीव होते की, मरण पावलेल्या नवऱ्यासमोर एक बोट कापल्याचे दु :ख म्हणजे काहीच नाही. नवऱ्याच्या मृत्यु बरोबर बोट कापण्याचे दु:ख देखील तिला आयुष्यभर सोबत राहिल.

 

daani im

“देवीचा प्रकोप नको!” म्हणून दरवर्षी १२ दिवस वनवसात जाणारं गाव…!

घरातली व्यक्ती गेल्यावर केस पूर्ण कापायच्या प्रथेमागे ही आहेत ६ महत्वाची कारणं!

स्त्रीचं हे बोट कापण्यासाठी धारदार अशा दगडी ब्लेडचा वापर केला जातो. किंवा दोरीने ते इतके घट्ट बांधले जाते की, तिथला रक्त प्रवाह थांबून काही महिन्याच्या आत ते बोट आपोआप गळून पडते. मग हे कापलेले बोट एका खड्ड्यात पुरविले जाते अथवा जाळले जाते.

सरकारने आणली या प्रथेवर बंदी

इंडोनेशिया सरकारने या संदर्भात या प्रथेवर बंदी आणणारा कायदा बऱ्याच वर्षांपूर्वी केला होता. पण त्याची अंमलबजावणी तितक्याशा प्रभावीपणे झाली नाही.
आजही दानी जमाती तील महिला नवऱ्याच्या मृत्यू नंतर आपले बोट कापून घेत असतात. या परंपरेच्या विरोधात एकाला ही आवाज उठ्वावासा वाटत नाही ,हेच नवल आहे. आदिवासी जमात आजही जगभरात अस्तित्वात आहे. आजही ते प्रवाहात येण्यास तयार नाहीत. त्यांच्या रूढी परंपरा आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?