पावसाळ्यात या भाज्या खाणं, म्हणजे स्वतःच्या हाताने शरीराचं नुकसान करून घेणं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पाऊस म्हटलं की डोळ्यांसमोर हिरवागार निसर्ग उभा राहतो. भाताची पोपटी रोपे असोत की मक्याची कणसे आपल्या डोळ्यांना आणि मनाला हिरव्या रंगामुळे थंडावा मिळतो.
पण मित्रांनो असे जरी असले तरी डोंगर दुरूनच साजरे दिसतात. कारण पावसाळ्यात जेव्हा आहाराचा विषय निघतो तेव्हा या हिरव्या भाज्या किंवा पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत असे आहारशास्त्रात सांगितलं जातं.
आपल्याकडे पावसाळ्यात चातुर्मास पाळला जातो त्यामागचे विज्ञान देखील आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. पावसाळ्यात येणारे सणवार आणि त्याकाळात करायचा आहार विहार यांची सांगड किती व्यवस्थित घातली गेली आहे हे तुम्ही पाहील्यास तुमच्याही लक्षात येईलच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आता तुम्ही म्हणाल की असे जर असेल तर मग पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या खाऊ नयेत? तर मित्रांनो काही भाज्या आहेत ज्या पावसाळ्यात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. कोणत्या आहेत या भाज्या?
१) वांगी :
पावसाळ्यात वांग्यावर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असतो ज्यामुळे ही भाजी दूषित होते.
अशा स्थितीत याच्या सेवनामुळे पचनसंस्थेच्या समस्यांचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात वांगी खाणे सहसा टाळावं.
२ ) बटाटे आणि अरवी :
बटाटे, अरवी सारख्या भाज्या खाणं टाळा, कारण त्या खाल्ल्याने जडपणा येतो आणि कमकुवत पचनामुळे गॅस-ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते.
या भाज्यांमुळे संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात बटाटा, अरवी यांसारख्या भाज्या खाणे सहसा टाळावे.
३ ) हिरव्या पालेभाज्या :
पावसाळा हा जिवाणू आणि सूक्ष्मजंतूंच्या प्रजननाचा काळ असतो.
ज्यामुळे हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी, राजगिरा इ. दूषित होतात. लोह, फायबर, आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असल्यामुळे या भाज्या खाण्याची शिफारस केली जाते, परंतु या भाज्या पावसाळ्यात खाल्ल्या तर पोट बिघडू शकतं म्हणून जर तुम्हाला पावसाळ्यात आजारी पडायचे नसेल तर त्या टाळल्या पाहिजेत.
४ ) शिमला मिरची :
शिमला मिरची लाल, पिवळा आणि हिरव्या अशा अनेक रंगात येते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.
पण पावसाळ्यात शिमला मिरची खाल्ल्यावर श्वसनाचा त्रास, मळमळ, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. म्हणून पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी कमी प्रमाणात खावी.
५ ) फुलकोबी किंवा फ्लॉवर :
फुलकोबीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असतं, तसेच फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. मात्र पावसाळ्यात खाल्ल्यास ही भाजी अनेक प्रकारे तुमचे नुकसान करू शकते.
त्यात असलेले ग्लुकोसिनोलेट्स एक संयुग आहे. ज्याचे सेवन केल्याने पावसाळ्यात आजारपण येऊ शकते. तसेच तुम्हाला या भाजीची एलर्जी येवू शकते.
—
- तेलाच्या धोक्यामुळे भजी खाण्याचा मोह टाळताय? या घ्या “ऑईल-फ्री” भजीच्या टिप्स!
- आला पावसाळा तब्येत सांभाळा ही ६ औषधं सोबत ठेवाच…
—
६ ) टोमॅटो :
आता तुम्ही म्हणाल स्वयंपाकासाठी टोमॅटो हवेतच. कारण भारतीय खाद्यसंस्कृतीत साध्या डाळ, आमटी, सार, भाजीसाठी पण टोमॅटो लागतात. पण टोमॅटो पचण्यासाठी अतिशय जड असतात.
पावसाळ्यात मुळातच तुमची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यात जर जास्त प्रमाणात टोमॅटो सेवन केला तर तुमच्या पचनशक्तीवर भार पडतो. त्याचप्रमाणे पावसाळ्यात टोमॅटो लवकर सडू नयेत यासाठी पिकावर केमिकल्स मारले जातात. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याचा धोका असतो.
यासाठी पावसाळ्यात टोमॅटोचा वापर स्वयंपाकात कमी करावा. त्याचप्रमाणे टोमॅटो कच्चा खाण्यापेक्षा शिजवूनच खावा.
७) मशरूम :
पावसाळ्यात निरनिराळ्या प्रकारचे मशरूम बाजारात येतात. मात्र जर तुम्ही गावच्या ठिकाणी अथवा नैसर्गिक पद्धतीने उगवलेले मशरूम खाणार असाल तर काहीच हरकत नाही.
वास्तविक पावसाळ्यात कोणत्याही ओलसर जागी मशरूम वाढतात. दूषित जागी उगवलेले मशरूम खाण्यामुळे तुमच्या शरीरात रोगाचे संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.
तेव्हा मित्रांनो जाणीवपूर्वक या भाज्या पावसाळ्याच्या दरम्यान खाण्याचे टाळा. या भाज्यांचा वापर पूर्णपणे टाळणं शक्य नसेल तरी हरकत नाही, पण किमान त्यांचं प्रमाण कमी करा.
शिवाय पचायला जड असणाऱ्या भाज्या सकाळच्या वेळेत खा, जेणेकरून रात्री पोटास आराम मिळेल आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या कारण ‘बचेंगं तो और भी खायेंगे’…नाही का?
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.—
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.