Site icon InMarathi

सिर्फ एक मच्छर…जेव्हा थेट चोर पकडण्यात पोलिसांची मदत करतो!

mosquito im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजवर आपण अनेक चित्रपटांमधून, वेब ससिरीजमधून चोर-पोलिसांच्या अनेक थ्रिलर गोष्टी पाहिल्या आहेत. वेगवेगळ्या शक्कल लढवून पोलीस चोराला पकडतात हे आपण प्रत्येकजण लहानपणापासून पाहत आलेलो आहोत. पण एखाद्या डासामुळे चोर पकडला गेला हे आपण कधी ऐकलंय का? नाही ना?

चीनमधील एका प्रांतात ही घटना घडली आणि बघता बघता चर्चेचा विषय झाली. या डासाने चोराला कसे पकडून दिलं हे खरोखर इंटरेस्टिंग आहे. चला तर मग जाणून घेऊयात एका चोराला पकडण्यासाठी पोलिसांना कशी झाली डासाची मदत?

 

 

*चोराला पकडायला..डासाची मदत !*

चीनमधील फुजो शहरात एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये रात्री घर फोडून चोरी करण्यात आली. त्या घरातील लोक बाहेरगावी असल्याने बऱ्याच दिवसांपासून घर बंद होत. याच संधीचा फायदा घेऊन एका चोराने या फ्लॅटमध्ये गॅलरीमधून वर येऊन घरात घुसला. घरातील काही वस्तू अस्ताव्यस्त केल्यानंतर त्यानं तिजोरीतून पैसे आणि मौल्यवान दागिन्यांची चोरी केली आणि तो पसार झाला.

दरवाजा न फोडता झालेली ही चोरी म्हणजे पोलिसांसाठी आव्हानचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर पोलिसांना खबर मिळाली आणि ते चोरीच्या ठिकाणी दाखल झाले. ना कुठे दारच्या कडीला हाताचे निशाण ना कुठे काही पुरावा..

पोलीस हतबल होऊन निघणार तोच त्यांना बेडरूमच्या एका भिंतीवर डास मेलेला दिसला आणि त्यावर रक्ताचा डाग दिसला..कोणीतरी काही तासांपूर्वीच त्या डासाला या भिंतीवर मारलं असल्याचं दिसत होतं. तात्काळ पोलिसांनी ते ब्लड सॅम्पल गोळा करून फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलं.

 

 

आणि त्याने गुन्हा कबूल केला !*

फॉरेन्सिक लॅबने रक्ताचे परीक्षण करून डीएनए टेस्ट केली. या डीएनए टेस्टमधून समोर आले की तो डीएनए चाय नावाच्या एका व्यक्तीचा आहे. पोलिसांनी क्रिमिनल रेकॉर्ड चेक केल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्याचे नाव रेकॉर्डवर आधीपासूनच समाविष्ट होते.

पोलिसांनी अचानक जाऊन त्याला ताब्यात घेतल्यावर चोर गांगरला आणि काही बोलण्यास नकार देऊ लागला. काही दिवसांनी स्वतःहून त्याने मान्य केलं की त्या घरात आणि आजूबाजूच्या आणखी ३ घरात चोरी त्यानेच केली होती म्हणून.

 

मोबाइल हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती आहे? या काही टिप्स वाचा!

CID आणि CBI, राज्य सरकारच्या अखत्यारीत की केंद्र सरकारच्या? नेमका फरक जाणून घ्या

चोराला त्याच्या एका डास मारण्याच्या कृत्यामुळे जेलची हवा खावी लागली. सध्याचे विज्ञान हे डीएनए टेस्ट, ब्लड सॅम्पल, बोटांचे ठसे यांमुळे एवढे प्रगत झाले की आता चोरांनाही चोरी करायची झाल्यास डोकं लावून करावी लागणार आहे कारण एक चूक थेट पोलिसांसाठी पुरावा ठरू शकते…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version