Site icon InMarathi

तिहार जेलसमोर मृतदेह फेकणाऱ्या सिरीयल किलरने दिल्ली पोलिसांची झोप उडवली होती!

chandrakant jha featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुन्हेगारी विश्व हे असं विश्व आहे जिथून रिटर्न तिकीट काढता येत नाही. एकदा त्या मार्गावर माणूस लागला की त्याचा अंत हा नक्की असतो, फक्त तो अंत कसा असेल हे सांगणं कठीण असतं!

कुणी पैशासाठी हा मार्ग स्वीकारतं, कुणी नाईलाज म्हणून या दुनियेत येतं तर कुणी स्वेच्छेने हे विश्व निवडतं. यात तिसऱ्या प्रकारात मोडणारी लोकं ही सर्वात घातक आणि विध्वंसक असतात.

ही लोकं गुन्हे करतात ते फक्त आणि फक्त त्यांच्या मानसिक समाधानासाठी, मग ती चोरी असो, दरोडा असो किंवा एखाद्याचा खून. या लोकांना हे गुन्हे करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो आणि म्हणूनच यात ते पुढे वाहवत जातात.

 

 

अशा अनेक गुन्हेगारांविषयी आपण ऐकून आहोत. चोर, बलात्कारी, खूनी या लोकांची मानसिकता हा एक अभ्यासाचा विषय असतो. त्यांच्याविषयी आपण जेवढं जाणून घेऊ तेवढं कमी असतं. यांची मानसिक अवस्था फार गुंतगुंतीची असते आणि बहुतांश केसेसमध्ये त्यांचा भूतकाळच त्यांच्या या कृत्यासाठी कारणीभूत असतो हे सिद्ध झालं आहे.

आज आपण अशाच एक विकृत मानसिकतेच्या एका सिरियल किलरविषयी जाणून घेणार आहोत. या माणसाची गुन्हा करण्याची पद्धतच कोणाच्याही छातीत धडकी भरवणारीच होती आणि त्याने चक्क दिल्ली पोलिसांना खुलं आवाहनच दिलं होतं की “हिंमत असेल तर मला पकडून दाखवा!”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चला तर जाणून घेऊया त्या भयानक केसबद्दल ज्यामुळे सारी दिल्ली आणि तिहार जेलचा परिसर हादरून गेला होता.

या सगळ्याची सुरुवात १९९८ साली झाली होती. दिल्लीच्या आदर्शनगरमध्ये पोलिसांना एक डोकं नसलेला मृतदेह सापडला. खुनाची अशी पद्धत बघून सगळेच खूप हैराण होते आणि पोलिसांनीही अशाप्रकारचा खून आजवर पाहिलेला नव्हता.

या केसच्या तपासादरम्यान पोलिसांनी बऱ्याच लोकांची चौकशी केली, काहींना ताब्यात घेतलं. या सगळ्यात चंद्रकांत झा या व्यक्तीला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली, पण न्यायालयात सुनावणीदरम्यान मृत व्यक्तीची काहीच ओळख न पटल्याने कोर्टाने चंद्रकांत याची निर्दोष मुक्तता केली.

 

 

यानंतर साधारण ५ वर्षांनी म्हणजे २७ जून २००३ रोजी दिल्लीच्या तिहार जेलच्या गेट नंबर ३ जवळ बरीच गर्दी एकवटली होती. याचं कारण म्हणजे जेलच्या गेटबाहेर कुणीतरी असाच एक डोकं नसलेला मृतदेह आणून टाकला होता.

तिहार जेलसारख्या गजबजलेल्या परिसरात अशाप्रकारे मृतदेह आणून टाकणं हे कोणा येडयागबाळ्याचं काम नाही हे पोलिसांना आणि तिथल्या लोकांना कळून चुकलं होतं, त्यामुळे पोलिसांना याची कसून चौकशी करायला सुरुवात केली पण दुर्दैवाने काहीच पुरावा हातात नसल्याने ही केसही तिथेच रखडली.

यानंतर २० नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या अलिपुर विभागातसुद्धा अशाच पद्धतीने खून केलेला शिर नसलेला मृतदेह सापडला आणि या सगळ्यामागे कुणी एकच व्यक्ति आहे यावर शिक्कामोर्तब झालं.

एवढं होऊनही पोलिसांच्या हाती काहीच ठोस पुरावा लागत नव्हता तसंच दिल्लीकरांच्या मनातली भीती आणखीन गडद होऊ लागली होती. हा सिरियल किलर नेमका कोण आहे? आणि हा नेमकं कोणाला ठार मारतोय? त्यामागचा त्याचा हेतु काय? याविषयी सगळ्यांनाच जाणून घ्यायचं होतं.

यानंतर चौथा मृतदेह पोलिसांना एका काचऱ्याच्या पेटीत सापडला तर पावचा आणीस सहावा मृतदेह २० ऑक्टोबर २००६ आणि २५ एप्रिल २००७ या दिवशी तिहार जेलच्या बरोबर बाहेर सापडला.

 

 

एकंदरच ही केस अवघडत होत चालली होतीच शिवाय दिल्ली पोलिस डिपार्टमेंटची नाचक्कीसुद्धा बाहेर होऊ लागली होती. या ७ लोकांना न्याय देण्याबरोबरच आपल्यावर लागलेल्या नाकारतेपणाचा डागसुद्धा पोलिसांना स्वच्छ करायचा होता!

असं पत्र लिहून पोलिसांना धमकावणं इथेच या गुन्हेगाराला त्याचा आत्मविश्वास नडला आणि पोलिसांना या केसचा कसून तपास करायला सुरुवात केली. यानंतर त्या व्यक्तीने दुसरी चूक केली ती म्हणजे आझादनगर पोलिस स्टेशनमध्ये फोन करून पोलिसांना धमकावणं!

ज्या PCO बूथवरून पोलिसांना हा फोन केला होता त्या बूथचा पत्ता पोलिसांना मिळाला आणि तिथल्या मालकाने चंद्रकांत झा या माणसानेच हा फोन केल्याचं स्पष्ट केलं आणि अशा रीतीने गेली ७ वर्षं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटणारा चंद्रकांत झा अखेर पोलिसांच्या ताब्यात आला.

चंद्रकांतला ताब्यात घेतल्यावर बरंचसं चित्र स्पष्ट झालं होतं, पण केवळ एका फोन कॉलच्या जोरावर त्याला न्यायालयात हजर करणं शक्य नसल्याने पोलिसांनी त्याचं हस्ताक्षर तपासलं तेव्हा त्याचं हस्ताक्षर आणि पत्रातली लिखावट सारखी असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी हा तपास पुढे सुरू ठेवला.

चौकशीदरम्यान चंद्रकांतने अतिशय थंड डोक्याने पोलिसांना सांगितलं की “मला मारलं तर मी एकही गोष्टी सांगणार नाही, आणि जर मला मारलं तर मी सगळं नीट सांगेन.” यावरून आपण अंदाज लावू शकतो की चंद्रकांत हा किती उलट्या काळजाचा माणूस होता ते!

 

 

पोलिसांना स्टेटमेंट देताना त्याने सगळ्या गोष्टी अगदी उघडपणे कबूल केल्या. सुरुवातीचे २ खून हे त्याने नाईलाजस्तव केले असले तरी नंतर यात त्याला मजा येऊ लागली आणि हळूहळू लोकांना मारून त्यांचे अवयव कापून वेगवेगळ्या ठिकाणी फेकायची त्याला चटकच लागली.

त्याला जेव्हा १९९८ मध्ये अटक करण्यात आली होती तेव्हा तिहार जेलमध्ये असताना एका कॉंस्टेबलने त्याचा खूप छळ केला होता आणि म्हणूनच तो हे मृतदेह तिहारच्या बाहेर येऊन टाकत होता हे कबूल केलं.

पोलिसांना दिलेला जवाब हा कोर्टात ग्राह्य धरला जात नाही, त्यामुळे पोलिसांसमोर ठोस पुरावे शोधण्याखेरीज दूसरा पर्याय नव्हता. केवळ एक फोन कॉल आणि एक पत्र याच्या आधारावर चंद्रकांतला कोर्टासमोर उभं करणं शक्य नव्हतं!

त्यामुळे चंद्रकांतला हाताशी धरून त्या मृतदेहाचं धड शोधण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली. चंद्रकांतने या सगळ्या मृतदेहांचं डोकं यमुना नदीत फेकून दिलं असल्याचं स्पष्ट झालं आणि फार कष्टाने पोलिसांना नदीत २ लोकांचं डोकं सापडलं आणि त्याची तपासणी करून पोलिसांनी एक भक्कम केस चंद्रकांतच्या विरोधात कोर्टात उभी केली.

 

तब्बल ७ खूनांपैकी ५ खूनांच्या बाबतीत चंद्रकांतला दोषी ठरवून कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. नंतर ती शिक्षा कमी करून आजन्म कारावासाची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली.

चंद्रकांत इतका निर्ढावला होता की तो माणसाला अर्धमेला करून त्यांचं मुंडकं आणि इतर अवयव छाटायचा आणि नंतर त्या मृतदेहासमोरच बसून पोट भरून जेवायचा. त्याने ज्यांना ज्यांना मारलं त्यांचा सर्वप्रथम त्याने विश्वास संपादन केला आणि मगच त्यांच्यावर झडप टाकायचा.

असं म्हंटलं जातं एका माणसाने जेवण झाल्यावर ताट घासून ठेवलं नव्हतं म्हणून चंद्रकांतने त्याला यमसदनी धाडलं. एकंदरच दिल्ली पोलिसांनी ही केस सोडवली असली तरी त्या काळात चंद्रकांतने साऱ्या राजधानीच्या पोलिस डिपार्टमेंटचं धाबं दणाणून सोडलं होतं!

या भयानक केसविषयी आणखीन विस्तृत माहीती देणारी एक documentary नुकतीच netflix वर रिलीज झाली आहे.  त्यात या केसशी निगडीत सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि चंद्रकांत यांच्या निंतवर्तियांचे अनुभव आपल्याला बघायला मिळतील.

 

 

दिल्ली पोलिसांना चॅलेंज करणाऱ्या विकृत चंद्रकांत गजाआड झाला खरा, पण अजूनही असे कित्येक चंद्रकांत बाहेर मोकाट फिरतायत आपल्या आजूबाजूला ज्यांच्याविषयी आपण येऊन जाऊन ऐकत असतो. त्यांचा बंदोबस्त कधी होणार?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version