राजकुमार साहेबांनी “त्या” दिग्दर्शकाला स्वतःला श्रद्धांजली वाहायला सांगितलं आणि…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिन्दी चित्रपटसृष्टी एक जादूगार आहे. तिच्याकडे एक किस्से-कहाण्यांनी भरलेली जादूची पोतडी आहे. त्यात कलाकारांच्या अतरंगीपणाचे, त्यांच्या मान-पानाचे, विक्षिप्तपणाचे आणि त्यांच्यात लपलेल्या माणुसकीचे असे अनेक किस्से आहेत.
असाच एक युनिक कलाकार होता, ज्याला लोक स्टाइल आयकॉन समजायचे आणि जो ‘जानी’ या आपल्या गळ्यावरून हात फिरवत म्हंटलेल्या डायलॉगमुळे प्रसिद्ध होता…बरोबर!!! तोच तो प्रचंड मूडी कलाकार, ‘राजकुमार’!
या लेखातून आपण प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी राजकुमार यांचे सांगितलेले किस्से वाचणार आहोत, चला तर मग सुरू करूया ही अनोखी सफर.
मेहुल कुमार हे एकमेव निर्माता-दिग्दर्शक आहेत ज्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांनी तीन चित्रपट केले आहेत. आपल्या काळातील दिग्गज अभिनेते राजकुमार यांनी कोणत्याही दिग्दर्शकासोबत तीन चित्रपट केलेले नाहीत. पण त्यांनी मेहुल कुमार यांच्यासोबत ‘मरते दम तक’, ‘जंगबाज’ आणि ‘तिरंगा’ सारख्या चित्रपटात काम केले.
मोठ्या पडद्यावर राजकुमार यांच्या पुनरागमनाचे श्रेय मेहुल कुमार यांना जाते. आपल्या दमदार आवाजाने आणि संवादफेकीने वेगळी ओळख निर्माण करणारा राजकुमार बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता होता.
राजकुमार यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमारसाठी असे म्हटले जात होते की तो स्वतःच्या अटींवर काम करणारा अभिनेता होता.
आपल्या एका मुलाखतीत मेहुल कुमार यांनी ‘मरते दम तक’ चित्रपटाची एक आठवण शेअर केली होती. ते म्हणाले , “माझ्याकडे राजकुमार यांना नजरेसमोर ठेवून लिहिलेली एक स्क्रिप्ट होती, म्हणून मी निर्माता प्राणलाल मेहता यांना भेटलो. मी त्यांना सांगितले की मला राजसाहेबांसोबत एक चित्रपट करायचा आहे. स्क्रिप्ट तयार आहे. प्राणजी मला म्हणाले की तुम्ही विचारा आणि बघा, कारण राज साहेबांनी मला यापूर्वी दोनदा चित्रपटासाठी नकार दिला आहे.
त्यानंतर मी राजसाहेबांना फोन केला आणि त्यांनी मला भेटायला बोलावलं. मी भेटायला गेल्यानंतर त्यांनी माझी स्क्रिप्ट पाहिली आणि उर्दूमध्ये लिहिलेली स्क्रिप्ट पाहून आश्चर्यचकित झाले. तसेच माझ्या चित्रपटाचे शीर्षकही त्यांना खूप आवडले. ते पुढे म्हणाले – “वाह! तुम्ही उर्दूमध्ये स्क्रिप्ट लिहिली आहे,”
म्हणून मी म्हणालो की ती खास तुमच्यासाठी लिहिली आहे. एक प्रकारे माझी स्क्रिप्ट त्यांना त्याच वेळी आवडली.पण त्यानी मला काही वेळ मागितला व मला पुढच्या आठवड्यात भेटायला सांगितले. पुढच्या आठवड्यातही मी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो. भेटल्यावर त्यांनी स्क्रिप्टचे कौतुक केले आणि सांगितले की ही एक अद्भुत स्क्रिप्ट आहे.
याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकदा असे घडले होते की अभिनेता राज कुमार यांनी स्वत: मेहुल कुमारला फोन केला आणि स्वत: ला श्रद्धांजली वाहण्यास भाग पाडले, मेहुल कुमार सांगतात, “या चित्रपटातील एक सीन मी कधीही विसरू शकत नाही. आम्ही खंडाळ्यात राजसाहेबांच्या पात्राच्या शेवटच्या प्रवासाच्या दृश्याचं शूटिंग करत होतो तेव्हा हजाराहून अधिक कलाकार जमले होते. नकली देह सजवून ठेवला होता. मी क्रेनमधून शॉट्स घेत होतो. मग राजकुमारानी मला बोलावले. मला समजले नाही की ते मला का बोलावत होते.”
तिथे गेल्यावर पाहिले तर कला दिग्दर्शन संघातील एक सहाय्यक फुलांचा हार घेऊन उभा होता. राज साहेब म्हणाले, “मेहुल, मला हा हार घाल.” मला काहीच समजले नाही, मग ते म्हणाले,” बघ मला माहित आहे तुला ही संधी मिळणार नाही जेव्हा मी कायमचा जाईन.” तेव्हा माझे संपूर्ण शरीर थरथर कापले. घाबरून मी एवढंच म्हणू शकलो की ,” राजसाब आप ऐसा क्यो बोल रहे हो ? आप तो सौ साल जिओगे.”
यावर ते काहीच बोलले नाहीत आणि त्यांना जिवंतपणी श्रद्धांजली वाहण्याचा माझ्यावर आलेला तो प्रसंग टळला. आताही ही घटना सांगताना मेहुल कुमार भावूक होतात.
त्यानंतर काही वर्षांनी ते अमिताभ बच्चन आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबत मेहबूब स्टुडिओमध्ये ‘मृत्युता’ चित्रपटासाठी शूटिंग करत होते. तेवढ्यात राजकुमारच्या घरून फोन आला. राजकुमार यांचं निधन झाल्याची बातमी त्यांना समजली.
फोन करणार्याने सांगितले की, राजकुमार साब यांनी त्यांच्या मृत्यूनंतर ज्यांना घरी बोलावण्यास सांगितले त्या यादीत तुमचे नाव समाविष्ट आहे. राजकुमार यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण सेटवर एकच खळबळ उडाली. मेहुल कुमार यांनीही अंत्यसंस्काराला जाण्यासाठी पॅकअपची तयारी सुरू केली.
मेहुल कुमारनी फोन करणार्याला विचारले की अंतिम संस्कार कधी आहेत. मेहुल म्हणतात, ‘कॉलरने फक्त एवढेच सांगितले की त्यांचे अंतिम संस्कार झाले आहेत. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांची यादी तयार केली होती ज्यांना त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलावले जावे अशी त्यांची इच्छा होती.
—
- पेशावर ते मुंबई – बॉलिवूडच्या २ दिग्गज अभिनेत्यांच्या अनोख्या मैत्रीची कहाणी!
- गोविंदाने भेट म्हणून दिलेला टी-शर्ट रुमाल म्हणून वापरणारा विक्षिप्त ‘राजकुमार’!
—
जेव्हा मी शूटिंग अर्धवट सोडून त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराचा तमाशा बनवायचा नाही. त्या दिवशी ‘मरते दम तक’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्यांनी जे सांगितले होते ते मला आठवले, जेव्हा राजसाहेब म्हणाले होते की, ” मेहुल, तू माझ्यासाठी हा हार माझ्या गळ्यात घाल, नंतर तुला ही संधी मिळणार नाही.”
मित्रांनो चित्रपटसृष्टीतली असली तरी ती देखील माणसेच आहेत आपल्यासारखीच… फरक इतकाच की आपण स्वत:ला लपवण्यासाठी मुखवटे वागवतो आणि ते लोक आपल्या चरितार्थासाठी आपल्या माणूसपणावर मुखवटे पांघरतात. हेच राजकुमार यांच्या आठवणीतून समोर येतं. नाही का?
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.