आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पावसाळ्यात उन्हापासून सुटका होत असली तरी दमट हवा तसंच ओलावा, हवामानाती बदल यांमुळे साथीच्या आजारांचा धोका जास्त असतो. तसंच या सीझनमध्ये इम्युनिटी कमी झाल्यामुळे लहान मुलं सर्वात जास्त आजारी पडतात. अशा परिस्थितीत पावसाळ्यात मुलांचं आरोग्य नीट राहावं यासाठी सेलेब्रिटी आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत, ज्या तुमच्या मुलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतील.
मित्रांनो, जरी पावसाळ्याच्या सीझनमध्ये काही खमंग, चटपटीत आणि गरमागरम तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होत असली तरी आपल्यासोबत आपली मुलंही असे पदार्थ खातात. जे त्यांच्या आरोग्यासाठी फारसे चांगले असत नाही.
अशावेळी पालक म्हणून आपल्या मुलांसाठी पावसाळ्यात कोणता आहार चांगला आहे ते तुम्हाला माहिती असणे आणि त्यानुसार आपल्या मुलांना तो आहार खाऊ घालणे आवश्यक आहे.
सुप्रसिद्ध आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘गुड हेल्थचे रहस्य’ या ऑडिओबुकमध्ये मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी टिप्स शेअर केल्या आहेत. काय आहेत या टिप्स ?
१. भिजवलेल्या ड्रायफ्रुट्स सोबत दिवसाची सुरुवात करा :
हे पावसाळी, उदास दिवस मुलांसाठी उर्जादायी असावेत म्हणून ऋजुता पालकांना शिफारस करतात की “दिवसाची सुरुवात या तीनपैकी कोणत्याही गोष्टीने करा. पहिले, सकाळी एक ताजे फळ मुलांना खाण्यास द्या किंवा भिजवलेले बदाम अथवा केशराच्या एक-दोन काड्यांसोबत भिजवलेले काळे मनुके द्या. हे त्यांची उर्जा पातळी वाढवतं तर शरीरातील संपूर्ण प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत देखील करतं असं सिद्ध झालं आहे.
बदामामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि त्यात लोह आणि प्रथिने असतात जे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असतात.
२. आमला का डोस हर रोज :
ऋजुता यांच्या मते आवळा हा “द वंडर फ्रूट” म्हणून ओळखला जातो. आवळा हा अनेक आरोग्यविषयक समस्यांवर एक उत्तम उपाय आहे.
आवळ्यामधील व्हिटॅमिन ‘सी’ च्या उच्च पातळीमुळे संक्रमण आणि अगदी डोकेदुखी किंवा चक्कर येणं अशा तक्रारींना प्रतिबंध होतो.
जे पालक आपल्या मुलांना आवळा खाऊ घालू इच्छितात त्यांच्यासाठी,ऋजुता सुचवितात की ” तुम्ही मुलांना आवळा च्यवनप्राश, लोणचं, सरबत किंवा मुरंबा म्हणूनही खाऊ घालू शकता.”
३. मुले घरी असली तरी त्यांना खेळू द्या :
पावसाळ्यात बाहेर सर्वत्र पाणी, चिखल असल्यामुळे मुलं बाहेर खेळायला जाऊ शकत नाहीत. पण ती जरी घरी थांबली तरी त्यांना खेळू द्या. प्रत्येक मुलाने खास करून मुलींनी दिवसातून कमीतकमी ६० मिनिटे खेळलंच पाहिजे.
आपल्या शरीरातील हाडांची घनता ही लहानपणी ठरत असते. जेव्हा आपली मुलं मन लावून काही खेळ खेळतात तेव्हा त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे पावसाळ्यात मुलं घरात असली तरी त्यांना खेळू द्या.
४. मुलांचे खाणे म्हणून घरगुती, पारंपारिक पदार्थ निवडा :
बरेचदा काय होतं की पावसाळ्यात वातावरणामुळे आळस येतो आणि मग बाहेरून खाण्याचे पदार्थ मागवण्याची इच्छा होते. अशावेळी हे बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी जर तुम्ही घरीच काही चवदार, हलकेफुलके पदार्थ बनवले तर मुलंही ते आनंदाने खातील.
जेव्हा जेवणाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही मुलांना सतत पर्याय दिले पाहिजेत. असे पर्याय द्या की जिथे पॅकबंद खाद्यपदार्थाऐवजी ते चांगले, आरोग्यदायी, चविष्ट आणि अधिक पौष्टिक घरी बनवलेले अन्न मिळतील.
तुमच्या मुलाने केचप मागितल्यास, त्याऐवजी त्यांना चटणी द्या. याचं कारण असं की चटणीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जी तुम्हाला केचपमध्ये सापडणार नाहीत.
मुलांनी जर चिप्स मागितले तर त्यांना काजू खायला द्या अथवा किवी सारखे फळ मागितले तर त्यांना केळी खाऊ घाला. मुळात प्रत्येक वेळी असे वेगवेगळे पर्याय वापरुन तुम्ही त्यांना जास्त पोषक आणि पचण्यास सुलभ असे खाऊ घालू शकता.
तेव्हा मित्रांनो जागरूक पालक असाल तर ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेल्या टिप्स वापरुन पावसाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या मुलांच्या खाण्यापिण्याची आणि आरोग्याची काळजी नक्की घेऊ शकता.
—
- तासंतास बसून काम करणाऱ्यांसाठी रुजुता दिवेकरनी सांगितले हे सोपे व्यायाम नक्की ट्राय करा!
- लहान मुलांना योग्य आहार देणं गरजेचं असतं. काय असावं आणि काय नसावं? वाचा…
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.