Site icon InMarathi

“हिंदू असणं गुन्हा आहे का?” – समीक्षकाच्या खोचक टिप्पणीवर नंबी नारायणन वैतागले

nambi narayanan featured 2 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

बॉलिवूड, त्यांचे तथाकथित समीक्षक आणि त्यांनी तोडलेले अकलेचे तारे हे आपल्यासाठी काही नवीन नाही. एकंदरच हे क्रिटीक माफिया कशाप्रकारे काम करतात हे देखील आपण गेल्या काही वर्षात अनुभवलं आहे.

आधी या लोकांच्या या गोष्टी जास्त मनावर घेतल्या जात नसत, पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळेच या क्रिटीक लोकांची पोलखोल करू लागले आहे. जसं सिनेसृष्टीवर कित्येक वर्षं डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता तसंच कित्येक समीक्षक याच विचारसरणीतून घडले आहेत.

त्यामुळे कोणत्याही सिनेमात प्रखर राष्ट्रवाद किंवा धार्मिक कट्टरता दाखवली की लगेचच हे क्रिटीक लोकं त्यांचा सोफेस्टिकटेड शिव्यांचा शब्दकोष काढून तयारच असतात आणि यात अग्रेसर आहे ते म्हणजे अनुपमा चोप्रा हिची film companion ही साईट.

उरी, द कश्मीर फाइल्स किंवा तान्हाजीसारख्या सिनेमाचं समीक्षण करताना त्यांनी सिनेमाचं कौतुक तर केलंच, पण jingoism सारखे शब्द वापरुन त्यांनी या सिनेमांना आपटायचासुद्धा प्रयत्न केला. अशीच खोचक टिप्पणी त्यांनी नुकत्याच आलेल्या ‘Rocketry the nambi effect’ या चित्रपटाचा समीक्षणात केली आहे.

 

 

भारताला वैज्ञानिक क्षेत्रात प्रगतीपथावर नेण्यात ज्यांचा सर्वात मोठा सहभाग आहे अशा महान वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाला बॉलिवूडकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी लोकांनी हा सिनेमा चांगलाच उचलून धरला आहे.

माधवनच्या अभिनयाचं, आणि पहिल्याच दिग्दर्शनाच्या धाडसाचं लोकांनी तोंड भरून कौतुक केलं असलं तरी या क्रिटीक माफियाने मात्र नेहमीप्रमाणे त्यावर टीकाच केली आहे.

Film companion च्या तथाकथित समीक्षणाची सुरुवातच या सिनेमाला शब्दबंबाळ आणि अंध राष्ट्रवाद अशी नावं ठेवून झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा रिव्यू तुम्ही इथे वाचू शकता!

पुढे या लेखात असं म्हंटलं गेलंय की “सिनेमातून नंबी नारायणन यांच्या कर्तृत्वाविषयी आपल्याला माहिती मिळते, पण याबरोबरच नंबी नारायण यांना सतत पूजा करताना, प्रार्थना करताना दाखवलं गेलं आहे, ते कट्टर हिंदू आहेत हेच या सिनेमातून प्रतीत होत आहे!”

 

 

खरंतर या स्टेटमेंटला कसलाही अर्थ नाही, आणि ही टिप्पणी केवळ आणि केवळ या मुद्द्याला राजकीय रंग देण्यासाठी केली गेली आहे हे समजायला प्रेक्षक दूधखुळे नक्कीच नाहीयेत!

सध्या सोशल मीडियावर या समीक्षणाची चांगलीच आलोचना होत असून आणखीनही काही लोकांनी यावर अशीच टिप्पणी केल्याचं समोर आलं आहे. लोकांनी तर याला विरोध दर्शवला आहेच, पण नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान खुद्द नंबी नारायणन यांनी यांनाक्रिटीक माफियाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

नंबी नारायणन यांनी कोणाचंही नाव यात घेतलं नसलं तरी ते नेमकं कोणाबद्दल बोलतायत हे नक्कीच आपल्याला समजेल.

नंबी सर म्हणतात “मी काही समीक्षणं वाचली, त्यात मी सिनेमात हिंदू आहे, सतत प्रार्थना करत असतो, मी हिंदू आहे, प्रखर हिंदुत्व सिनेमातून दाखवलं गेलं आहे हेच या सिनेमातून दाखवलं गेलं आहे. हिंदू असणं किंवा ब्राह्मण असणं हा गुन्हा आहे का? मी ब्राह्मण नाही, तो एक वेगळा मुद्दा आहे पण या देशासाठी कित्येक ब्राह्मणांनी त्यांचे प्राण पणाला लावले आहेत. जर माझी कथा या सिनेमातून मांडली जात असेल तर मला हिंदूच दाखवणं योग्य आहे, मला मुस्लिम किंवा ख्रिश्चनतर दाखवू शकत नाही ना?”

 

 

हे असे लेख वाचून नंबी नारायण यांना किती यातना झाल्या असतील याचा अंदाज आपण यावरून लावू शकतो. ज्या वैज्ञानिकाने नासाची ऑफर धुडकावून केवळ स्वतःच्या देशासाठी काम करण्याचं ठरवलं या वैज्ञानिकाला या समीक्षकांनी कट्टर राष्ट्रभक्त किंवा हिंदू अशा २ शब्दांपुरतं मर्यादित ठेवलं.

सिनेमा कसाही असो, त्याची योग्य बाजू निष्पक्षपणे मांडून त्यात काय चांगलं आणि काय वाईट हे सांगणं म्हणजे समीक्षण. पण सध्या याच गोष्टी पद्धतशीरपणे बाजूला सारून स्वतःची विचारधारा प्रमोट करणाऱ्या समीक्षकांचा सुळसुळाट वाढल्यानेच आपल्याला हे असं काहीतरी रोज ऐकायला पाहायला मिळत आहे.

ज्या हिरीरीने या समीक्षकांनी दंगल सिनेमातल्या आमीर खानच्या transformation बद्दल कौतुक केलं तसंच माधवनने या सिनेमासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल केलेलं तुम्हाला बघायला मिळालं का हो?

 

हिंदूघृणा म्हणजे उत्तम आणि हिंदुत्व किंवा राष्ट्रवाद म्हणजे वाईट ही मानसिकता लोकांच्या मनात पदोपदी रुजवणाऱ्या या लोकांना समीक्षक तरी म्हणावं का? ही विकृत मानसिकता जोवर नष्ट होत नाही, तोवर हे असंच होत राहणार.

लोकं सोशल मीडियावर व्यक्त जरी होत असले तरी थिएटरमध्ये मात्र नंबी नारायणन यांच्यासाठी गर्दी फारशी होत नाहीये. त्यासाठी हे समीक्षक जेवढे जबाबदार  आहेत तेवढेच आपण प्रेक्षकही आहोत.

एकीकडे बॉलिवूडला नेपोटीजमला शिव्या घालून त्यांच्याच सिनेमांना आपण करोडो रुपयांचा नफा कमवून देतो, कॉफी विथ करणसारखे हिडीस कार्यक्रम बघून त्यांना डोक्यावर घेतो, तर दुसरीकडे जेव्हा एक rocketry सारखा उत्तम सिनेमा येतो तेव्हा मात्र तो सिनेमा थिएटरला न बघता OTT वर येण्याची वाट बघतो.

त्यामुळे या समीक्षकांची तरी काय चूक म्हणा, ते जरी एकाच चष्म्यातून सिनेमे बघत असले किंवा परीक्षण करत असले तरी आपला प्रेक्षक मात्र अजून स्वतःचा दृष्टिकोन बदलत नाही, त्यामुळे आपणही यासाठी तितकेच जबाबदार आहोत!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version