' युती बाबत गौप्यस्फोट करणाऱ्या, बलात्काराचा आरोप झालेल्या राहुल शेवाळेंचा राजकीय प्रवास इंटरेस्टिंग आहे – InMarathi

युती बाबत गौप्यस्फोट करणाऱ्या, बलात्काराचा आरोप झालेल्या राहुल शेवाळेंचा राजकीय प्रवास इंटरेस्टिंग आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शिवसेना नक्की कोणाची? ठाकरे की शिंदे? गेल्या काही दिवसांपासून हे दोनच विषय चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने बंड करून अखेर भाजपच्या साथीने आपलं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेताच कामाचा धडाका लावलाय.

शिंदेंच्या बरोबरीने आलेले ५० आमदारांसोबत खासदार देखील जाणार अशी चर्चा होती आणि कालच १२ खासदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली.

 

shewale im 1

 

शिवसेनेच्या खासदारांपैकी एक नाव सध्या खूप चर्चेत आहे, शिवसेनेच्या मुंबईतील खासदारंपैकी असलेले एक खासदार म्हणजे राहुल शेवाळे. भाजप शिवसेना युती मागच्यावर्षी होणार होती असा गौप्यस्फोट करणारे राहुल शेवाळे सध्या एका वादात सापडले आहेत, त्यांचा राजकीय प्रवास आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात…

कोण आहेत राहुल शेवाळे?

राहुल शेवाळे यांचा जन्म मुंबईमधला, घरची परिस्थिती उत्तम असल्याने त्यांचं शिक्षण सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये झालं आहे. २००५ साली शिवसेनेच्याच नगरसेविका असलेल्या कामिनी मयेकर यांच्याशी त्यांनी विवाह केला.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते पहिल्यांदा अणुशक्तीनगर भागातून नगरसेवक म्हणून निवडणून आले. त्यानंतर आमदारकीला आपलं नशीब आजमवण्यचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. तुर्भे मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. आमदारकीत त्यांना अपयश आल्यावर त्यांनी आपला पूर्ण फोकस मुंबई महानगरपालिकेवर केला आणि मुंबई महानगर पालिकेत त्यांनी आपले प्रस्थ निर्माण केलं.

 

shewale im

 

२०१० ते २०१४ पर्यंत मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१४ सालं त्यांच्यासाठी खरं तर लकी ठरलं. मोदी लाटेचा प्रभाव वाढतच होता. त्यात शिवसेनेकडून त्यांना दक्षिण मध्य मतदार संघातून खासदारकीची ऑफर देण्यात आली. काँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांचा त्यांनी पराभव केला.

लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद सोडावं लागलं होत. २०१४ जिंकून आल्यांनतर साहजिकच त्यांचा आत्मविश्वास वाढला होता २०१९ सालच्या निवडणुकीत ते पुन्हा निवडणून आले. मातोश्रीच्या निकटवर्तीयांच्या यादीत राहुल शेवाळेंच नाव घेतलं जात.

कोरोनाकाळात टेंडर काढूनही मुंबईला लस पुरवठा कमी केल्याने तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेणार अशी चर्चा होती, या दोन्ही मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

बलात्कराचे आरोप :

नेतेमंडळी एकतर दोन गोष्टींसाठी चर्चेत असतात ते म्हणजे एक तर त्यांच्या कामामुळे अथवा त्यांनी केलेल्या वादग्रस्त घटनांमुळे, तीन महिन्यांपूर्वी एका महिलेने त्यांच्याविरोधात साकीनाका पोलीस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांनी हे सर्व आरोपा नाकारले असून आपल्याला यात अडकवलं जात आहे असंही ते म्हणाले.

 

rape case im

भाजपचा विरोध पत्करून बाळासाहेब प्रतिभा पाटीलांच्या पाठीशी उभे राहिले होते

लाख चुका केल्या असतील, पण उद्धव ठाकरेंनी “या” बाबतीत नक्कीच मन जिंकलंय!

शेवाळेंची पत्नी देखील त्यांच्या पाठीशी खंबीरणपणे उभ्या आहेत. नुकतंच त्यांनी महिलेने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी एक प्रसिद्ध पत्रक काढलं ज्यात त्या असं म्हणाल्या की, खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात जे आरोप केले जात आहेत ते पूर्णपणे निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या २५ वर्षांपासून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतिनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मालिन करण्याचे हे षडयंत्र आहे.

एकीकडे शिंदे गटात सामील होताच राहुल शेवाळे सामील होताच त्यांच्यावर एक वेगळंच संकट ओढवलं आहे. या घटनेची कायदेशीर प्रक्रिया पुढे चालेलच, तर दुसरीकडे शिवसेनेचं भविष्य आज ठरणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?