' बॉडी स्प्रेच्या खपासाठी सामूहिक बलात्काराचा विनोद?! विकृती, निर्लज्जपणा की आणखी काही?! – InMarathi

बॉडी स्प्रेच्या खपासाठी सामूहिक बलात्काराचा विनोद?! विकृती, निर्लज्जपणा की आणखी काही?!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ओटीटी विश्वामुळे जसा बेलगामी कन्टेन्टचा भडीमार सहन करावा लागतोय, तिच गत सध्या जाहिरातींबाबत लक्षात येतीय.

कधी अश्लिल भाषा, कधी चावट विनोद तर कधी टिकेचा अतिरेक यांमुळे जाहिराती लागताच रिमोट शोधण्याची खटपट करावी लागते. एकंदरीत जाहिरात क्षेत्राच्या कल्पकतेवरच प्रश्नचिन्ह उभं रहात असताना एका बॉडी स्प्रेची जाहिरात पाहिल्यानंतर मात्र ”जाहिरात कंपन्यांचं डोकं ठिकाणावर आहे का” हा प्रश्न विचारला जात आहे.

आपलं उत्पादन लोकांच्या गळी उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जाहिरात कंपन्यांनी यापुर्वीही अनेकदा विकृत प्रयत्न केले, मात्र ‘लेअर शॉट बॉडी स्प्रे’ च्या जाहिरातीत चक्क गॅंग रेप अर्थात सामुहीक बलात्काराचं उदात्तीकरण केलं आहे.

 

ad im

 

कोणत्याही परिस्थितीत विनोद करत, प्रेक्षकांना हसवणं आणि आपलं उत्पादन त्यांना लक्षात रहावं यासाठी वाट्टेल तो प्रयत्न करणाऱ्या या लेअर बॉडी स्प्रे च्या जाहिरातदारांनी केलेल्या या विकृत विनोदावर मात्र प्रेक्षकांसह अनेक कलाकारही भडकले आहेत.

बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर, संवेदनशील विषयाला जाहिरातीत विनोदासाठी वापरणं ही विकृत मानसिकता असून महिलांचा अशा पद्धतीने केलेल्या अपमानाविरोधात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींनी आगपाखड केली आहे.

नेमकी जाहिरात काय?

बॉडी स्प्रे ची गरज किंवा लॉंग लास्टिंग अर्थात दिर्घकाळ टिकणाऱ्या बॉडी स्प्रेच्या अनेक जाहिराती यापुर्वी तुम्ही पाहिल्या असतील. ”फॉग चल रहा है” ही टॅगलाईन तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल.

यापुर्वीही अनेक जाहिरातदारांनी विनोदी पद्धतीने बॉडी स्प्रे विकण्याचा प्रयत्न केला, मात्र ”लेअर शॉट बॉडी स्प्रे” ने केलेली जाहिरात म्हणजे विकृती, संवेदनहीनता आणि पैसा कमावण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी यांचा अतिरेक याची प्रचिती येतीय.

‘शॉट’ नावाच्या डिओची ही जाहिरात असून या नावाचाच दुहेरी अर्थ काढत जाहिरात रंगवण्यात आली आहे. एका सुपर मार्केटमध्ये तरुणी खरेदी करत असते. तिच्या मागून चार टवाळखोर तरुण येतात, आणि तिच्याकडे पहात ”मुलगी एकच पण आपण मात्र चौघे, मग नक्की शॉट कोण घेणार” असा सवाल करतो.

कोणत्याही सुज्ञ माणसाला त्यांच्या या व्दैअर्थी शब्दांचा उद्देश लगेचच लक्षात येतो. या  मुलांच्या वाक्याने मुलगी घाबरते, मात्र त्यानंतर तिची नजर समोर असलेल्या एका शॉट नावाच्या डिओकडे गेल्याने ती सुटकेचा निःश्वास सोडते.

त्यावेळी त्या चारही मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षकांना चीड आणणारे ठरत आहेत.

दुसऱ्याही प्रयत्नात तीच विकृती

याच कंपनीने आणखी एक जाहिरात बनवली आहे. त्यातही पुन्हा याच विकृतीचं प्रदर्शन केलं आहे.

एका खोलीत तरुण आणि तरुणी बसलेले असताना तीन मुलं खोलीत येतात आणि खोलीतील मुलाला  शॉट शब्दाचा दुहेरी अर्थ काढून प्रश्न विचारतात.

या जाहिरातीतही चार तरुण मुलं आणि एक तरुणी यांच्यातील विचित्र संभाषण दाखवलं आहे. दोन्ही जाहिरातींमध्ये सामुहिक बलात्कार या विषयाला टार्गेट करत विनोदनिर्मितीचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या दोन्ही जाहिराती पाहिल्यानंतर सुज्ञ प्रेक्षकांना राग अनावर झाला नाही तरच नवल!

या जाहिराती पाहिल्यानंतर अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी निषेध नोंदवला आहे.

” ही जाहिरात म्हणजे कौणतीही चूक नाही. एक जाहिरात तयार करताना संबंधिक कंपनी, जाहिरात करणारी एजन्सी, कलाकार, तंत्रज्ञ अशा अनेकांचा सहभाग असतो. मात्र अशी विकृत जाहिरात करताना कुणालाही त्याबद्दल खेद वाटला नाही याचं नवल वाटतं” अशी प्रतिक्रिया रिचा हिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नोंदवली आहे.

 

ads 1 im

 

ट्विट करत तिने जाहिरात कंपनीला खडे बोल सुनावले आहेत.

अभिनेत्री प्रियंकानेही रिचाला प्रतिसाद दिला आहे, अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद असं म्हणत तिने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. एक जाहिरात तयार होताना अनेकांकडून त्यावर विचार होतो, मात्र बलात्कारासारख्या विषयावर अशी टिप्पणी करताना कुणालाही चीड आली नाही का? मला आनंद या गोष्टीचा आहे की जाहिरात प्रदर्शित होताच संवेदनशील प्रेक्षकांनी तातडीने त्यावर आक्षेप नोंदवला”.

 

priyanka im

 

याशिवाय सोशल मिडीयावर इतरही काही कलाकारांनी आपली जळजळीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

फराहन अख्तर, स्वरा भास्कर यांनीही जाहिरातीवर टिका केली आहे. भारतीय जाहिरात क्षेत्राला नेमकं काय झालंय? इतक्या गंभीर विषयावर विनोद करताना लाज वाटली नाही का? अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी नोंदवली आहे.

एका मुलीसमोर चार मुलांनी अश्लिल भाषेत टिका करणं, व्दैअर्थी शब्दांचा वापर करत विनोद निर्मितीचा प्रयत्न करणं, आणि ही ट्रिक वापरून उत्पादनाची विक्री करण्याचा प्रयत्न करणं या भयावह मानसिकतेला प्रेक्षकांकडून विरोध होत असला तरी ही जाहिरात रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली जाणार ही बाब महत्वाची आहे.

ही जाहिरात बॅन व्हावी का? अशा जाहिरातींना सेन्सॉरची कात्री असायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?