Site icon InMarathi

हलाखीचं जीवन, शिक्षणाचा अभाव, कलेची असामान्य प्रतिभा, कोण आहेत हलधार नाग?

haldhar final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्यानंतरचे पुरस्कार पाहायचे झाले, तर पद्म पुरस्कारांचा क्रमांक लागतो. पद्म पुरस्काराचा मानकरी होणं, ही सन्मानाची बाब आहे यात दुमत नाहीच. मात्र हे उच्च दर्जाचे नागरी सन्मान प्रदान केले जातात, आणि स्वीकारले जातात ते दिल्ली दरबारी! मात्र पद्मश्री सारखा मोठा सन्मान प्राप्त करणारी व्यक्ती…

दिल्लीपर्यंत पोचण्याची ऐपत सुद्धा नसणारी असेल तर? होय, अगदी योग्य वाचलंय तुम्ही. पद्मश्री प्राप्त असणारे हलधार नाग यांनी ‘दिल्लीपर्यंत येण्यासाठी पैसे नाहीत’ असं म्हणत पुरस्कार पोस्टाने पाठवून देण्याची विनंती खरंच केली होती का? कोण आहेत हे हलधार नाग? चला जाणून घेऊयात.

साधी राहणी, उच्च विचारसरणी…

हलधार नाग यांची एक महत्त्वाची ओळख सांगायची झाली, तर त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. मात्र ते अत्यंत हुशार आहेत. कागदोपत्री शिक्षण फार नसलं, तरीही ते एक प्रसिद्ध आणि नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांना एक उत्तम कवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओडिसामध्ये राहणारे ७१ वर्षीय नाग, हे उत्कृष्ट लोककवी म्हणून प्रसिद्ध आहेत.

 

 

शाळा आणि कॉलेज यापलीकडे सुद्धा शिक्षण असू शकतं आणि ते शिक्षण सुद्धा माणसाला प्रगल्भ बनवू शकतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे हलधार नाग! आज त्यांची ऐपत नाही, त्यांना शक्य नाही असं नाही; मात्र तरीही ते भौतिक सुखांपासून लांबच आहेत.

असं व्यतीत केलं सुरवातीचं जीवन…

ओडिसा राज्यातील एका लहानशा गावात १९५० साली हलधार नाग यांचा जन्म झाला. कुटुंब तसं गरीबच. घरची परिस्थिती बेताची; त्यातही दहा वर्षांच्या कोवळ्या वयात त्यांच्या डोक्यावरून पालकांचं छत्र हरपलं. शिक्षण थांबलं. तिसऱ्या इयत्तेत शिक्षण सोडून त्यांना धाब्याची वाट धारावी लागली. पुढे बराच काळ तेच त्यांचं आयुष्य झालं.

त्यानंतर पुन्हा त्यांच्या वाटेल शाळा आली. मात्र ती शाळेचा आचारी या नात्याने! १६ वर्षं एका शाळेतील आचारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. पुढे हजार रुपयांचा कर्ज काढून त्यांनी त्याच शाळेजवळ स्टेशनरीचं दुकान टाकलं. या सगळ्या प्रवासात, त्यांची लिखाणाची आवड मात्र तसूभरही कमी झाली नाही. ती दिवसेंदिवस वाढतच गेली. छोट्या-मोठ्या प्रमाणात लिखाण सुरूच राहिलं.

…आणि ओळख निर्माण झाली

हे लिखाणच पुढे त्यांची मोठी ओळख निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. १९९० साली ‘धोंडो भर्गच’ ही त्यांची पहिली कविता त्यांनी लिहिली. या नावाचा अर्थ, ‘एक महान वटवृक्ष’ असा होतो.ही कविता लिहिल्यानंतर त्यांची प्रगतीच जप्त गेली.

अनेक स्थानिक नियतकालिकांमधून त्यांच्या कविता आणि लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. यामुळेच त्यांना अधिक प्रेरणा मिळाली. त्यांच्या कविता सादर करण्यासाठी ते गावोगावी जाऊ लागले. कोसली या त्यांच्या भाषेत त्यांनी कविता रचल्या आहेत.

 

 

आजची तरुण पिढी सुद्धा या भाषेतील कवितांना महत्त्व देते हे पाहून त्यांना आनंद होत असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलं आहे. त्यांच्यातील कवी इतका नैसर्गिकपणे त्यांनी जपला आहे, हे त्यांना आजही त्यांच्या सगळ्या रचना तोंडपाठ आहेत, यावरून लक्षात येतं.

धर्म, निसर्ग सौंदर्य, समाज अशा विषयांवर आधारित कविता ही त्यांची ओळख आहे. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, सामाजिक सुधारणा आणि त्याच्याशी निगडित सर्वच बाबींवर प्रकाश टाकणं हा त्यांचा उद्देश आहे.

पद्मश्री जाहीर झाला पण…

हलधार नाग या कवीला, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. एक दर्जेदार लोककवी आणि लोकांच्या मनातील भावनांचा, प्रेमाचा पुरस्कार आधीच प्राप्त असणारे नाग यांना एक नागरी सन्मान देण्यात येणार होता. मात्र त्यांनी त्यावेळी केलेली विनंती चर्चेचा मोठा विषय ठरली.

साहित्यातील त्यांची कामगिरी पाहून, त्यांना पद्मश्री देण्याचा निर्णय २०१६ साली तत्कालीन भारत सरकारने घेतला. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते, पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी, साधं पांढरं धोतर, बंडी आणि उपरणं अशा साध्या पेहरावात आलेले हलधार हे अनवाणी सुद्धा होते.

 

“वाह, उस्ताद!”: तबल्याला लोकप्रिय करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबद्दल १० गोष्टी

रेडिओ सायन्समध्ये महान शोध लावूनही जगदीशचंद्र बोस यांना नोबल का मिळालं नाही?

एका उत्कृष्ट कलाकाराला, हे असं हलाखीचं जीवन जगायला लागावं, याविषयी त्याकाळी माध्यमांमधून चर्चा सुद्धा झाली खरी मात्र माध्यमांनाशी बोलताना ते असं म्हणाले की मी पुरस्कार घेण्यासाठी पैसे नाहीत असं म्हणालेलो नाही. उलट ओरिसा सरकारने मला जमीन ही दिली आहे. एका डॉक्टरांनी मला घर देखील बांधून दिल आहे. नाग यांना सरकारकडून १८०००रुपये मासिक भत्ता देखील मिळतो आहे.

पुढे त्यांचा हलधार ग्रंथावली हा काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित करण्यात आला. हलाखीचं जीवन जगत असणाऱ्या या पद्मश्री विजेत्याला, पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला पोहचणं सुद्धा अशक्य झालं होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version