आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारताचा शेजारी असलेला पारंपारिक शत्रू म्हणजे पाकिस्तान. अगदी त्यावरून मीमर्स लोकांनी अपने बाप को मत सिखा, बाप आखिर बाप होता है वगैरे मीम बनवलेली आपण पाहिली आहेत. जेव्हा भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होतो तेव्हा लोक श्वास रोखून पाहत असतात. एकही बॉल हुकु नये याची काळजी घेत असतात.
सानिया मिर्झा पाकिस्तानची सून झाली. शोएब मलिक भारताचा जावई झाला. म्हणजे रोटी बेटी व्यवहार भारत पाकिस्तानात झाला. पण संबंध मात्र फारसे सुधारले नाहीत. पण पाकिस्तानात एक रेस्टॉरंट आहे. आणि तिथे खास भारतीय चवीचे पदार्थ मिळतात. झालात ना थक्क?
साधारणपणे एखादा सामान्य माणूस जेव्हा आपला देश सोडून बाहेरील देशात जातो तेव्हा त्याला दोन गोष्टीची कमतरता जाणवते. एक म्हणजे आपली माणसे आणि दुसरे म्हणजे आपले जेवण. पण आता बहुतेक सर्व ठिकाणी इतर देशातील जेवण मिळायची सुविधा आहे. त्यामुळे ही अडचण काही अंशी कमी झाली आहे.
अगदी आपण आता पाकिस्तानात जरी गेलो तरी तिथेही आपल्याला भारतीय जेवण देणारे एक रेस्टॉरंट झाले आहे. जेवणाला पण जात धर्म काहीही नसते.
निदा फाजली यांची एक कविता आहे, खोया हुआ सा कुछ..पाकिस्तानातील परिस्थिती त्यांनी फार मोजक्या शब्दात मांडली आहे. कविता जुनी आहे पण आजही चपखल लागू होते.
त्या कवितेत एक ओळ आहे – हिंदू भी मजे में है मुसलमाँ भी मजे में…इन्सान परेशान यहाँ भी है वहाँ भी ! पाकिस्तानमधील या रेस्टॉरंटची गोष्ट ऐकून तुम्ही पण या ओळींशी सहमत व्हाल.
आपली भारतीय खाद्य संस्कृती ही एकंदरीत मानवी प्रकृतीचा, हवामानाचा विचार करून बनवलेली आहे. भारतीय मसाले तर जगभरात प्रसिद्ध आहेत. जगातील कुठल्याही देशात जा तिथे भारतीय जेवणाची सोय आहेच. त्यामुळे लोकांचे खाण्याचे वांदे होत नाहीत आताशी. अमेरिका, जर्मनी, इग्लंड वगैरे देशात भारतीय रेस्टॉरंट आहेत. अगदी आश्चर्य वाटेल पण पाकिस्तानात देखील भारतीय जेवण देणारे रेस्टॉरंट आहे.
विशेष म्हणजे या रेस्टॉरंटचे नाव पण भारतीय आहे. त्याचं नाव आहे इंडियन चस्का द टेस्ट ऑफ नेबर. कराची मध्ये असलेले हे रेस्टॉरंट नुकतेच एका फूड vlogger ने प्रकाशात आणले आहे.
आजकाल व्हिडिओ तयार करणारे लोक म्हणजे vlogger. हे लोक अशी हटके असलेली खाद्ययात्रा करतात आणि वेगळे खाद्य पदार्थ, वेगवेगळी हॉटेल्स शोधून त्यांना प्रकाशात आणतात. तर अशाच एका vlogger ने या रेस्टॉरंटला भेट दिली. आणि तिथे सगळे भारतीय पदार्थ होते.
वास्तविक भारतीय पदार्थ काही ठराविकच नाहीत पण तरीही त्यातल्या त्यात प्रसिद्ध पदार्थ त्यांनी तिथे ठेवले आहेत. या रेस्टॉरंटचे मालक आहेत अस्लान. याचं अजोळ भावनगर. आणि इथेच त्यांना ही भारतीय चव सापडली. वास्तविक पाकिस्तान मात्र मांसाहारी डिशेस साठी प्रसिद्ध आहे.
पेशावर, कराची, क्वेटा,गुजरावला, रावळपिंडी, लाहोर ही शहरे तर अशा खास मांसाहारी चवदार डिशसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे स्ट्रीट फूड म्हणून जसे वडापाव, पावभाजी, भेळपुरी वगैरे मिळते तसे इथे नॉनव्हेज डिश मिळतात. आणि विशेष म्हणजे ते अगदी सकाळी सकाळी मिळायला सुरु होतात.
पाकिस्तानात काँटीनेंटल आणि भारतीय डिश बनवणारी बरीच हॉटेल्स आहेत. पण या रेस्टॉरंटमध्ये केवळ भारतीय पदार्थच मिळतात.
हे रेस्टॉरंट सुरु केले ते अपघातानेच. मागे जेव्हा कोरोनामुळे जगाचे शटर बंद झाले होते तेव्हा अस्लान यांना पण काम नव्हते. आणि त्यांनी त्या दरम्यान असे रेस्टॉरंट सुरु करायचा प्लान बनवला. त्यांचे अजोळ भारतात. तेथील स्वादिष्ट पदार्थ इथे ठेवायचा त्यांनी विचार केला आणि अमलांत पण आणला.
—
- मैत्रिणीचं प्रेम “सीमेवर” ठेऊन लतादीदींनी पाकिस्तानला मस्त सणकावून लावली होती!
- मराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे..
—
२०१४ मध्ये अस्लान भारतात आले होते. त्याचवेळी त्यांनी वेगवेगळ्या भारतीय डिशेस बघितल्या. आणि त्याच डिशेस इथे ठेवल्या. पावभाजी, पालकपनीर, शाही दाल चावल, मोमोज, पनीर टिक्का, खिचडी बिर्याणी , आणि मोस्ट फेमस वडा पाव पण इथे मिळतो बरं!
लोकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. पण पाकिस्तानात इंडियन चस्का हे नाव ठेवल्यावर कोणी त्यावर हरकत घेतली नाही हे पण विशेषच म्हणायला हवे. हे नाव ठेवायचे कारण अर्थातच भारतीय पारंपारिक पदार्थांची रेलचेल आहे.
म्हणजे पाकिस्तान बरोबर रोटी आणि बेटी व्यवहार आपोआपच झाला आहे. वास्तविक शत्रू सोबत हे व्यवहार करणे टाळले जाते. पाकिस्तान तर आपला कट्टर शत्रू. पण त्याच्यासोबत हे दोन्ही व्यवहार केले गेले आणि त्याबाबत कुणाचीही तक्रार नाही.
एखादी चक्कर कधी टाकलीच पाकिस्तानात तर या द इंडियन चस्का या रेस्टॉरंटला भेट द्यायला हरकत नाही.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.