Site icon InMarathi

औषधांच्या पाकिटावर का असते रिकामी जागा? वाचा, तुम्हाला माहित नसलेलं कारण

empty spaces tablet strips InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

औषधांच्या गोळ्या आपण सगळ्यांनीच घेतल्या असतील, डॉक्टर कडच्या गोळ्या, तसेच काही सिरप्स त्याबरोबरच डॉक्टर काही बाहेरच्या गोळ्या सुद्धा प्रिस्क्राइब करून देतात!

 

 

आपण जेंव्हा त्या गोळ्या घेतो तेंव्हा ते पाकीट, त्या गोळीचं आणि प्रिस्क्रिप्शन वरचं नाव तसेच त्याची एक्स्पायरी डेट या सगळ्या गोष्टी आपण चेक करतो, आणि या गोष्टी पाकिटाच्या मागच्या बाजूला लिहिलेल्या असतात!

पण यापेक्षा आणखीन एक गोष्ट असते त्याचा आपण कधीच विचार करत नाही, किंबहुना आपल्या डोक्यात तो विचार येतच नाही, तो म्हणजे गोळ्यांच्या पाकीटावर गोळ्यांच्या मध्ये सोडलेल्या रिकाम्या जागा!

 

 

आज आपण याच गोष्टीबद्दल जरा सविस्तर चर्चा करून जाणून घेऊया कि औषधं बनवणाऱ्या कंपन्या अशाप्रकारे पॅकिंग का करतात? यामागे काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे का आणखीन काही ते बघूया!

 

 

तर डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन नुसार आपण मेडिकल वाल्याकडून औषधांच्या गोळ्यांची पॅकेट्स घेतो. सहसा ही पॅकेट्स म्हणजे दहा गोळ्यांची पट्टी (स्ट्रीप) असते. गोळ्यांच्या आकाराप्रमाणे त्यात किती गोळ्या बसतील हे सुद्धा बदलत राहतं!

जर गोळ्यांचा आकार लहान असेल तर एका पाकिटात २० पेक्षा जास्त गोळ्या सुद्धा मावू शकतात!

पण बहुतेक गोळ्यांच्या पॅकेट्सची वेगळ्या प्रकारे देखील पॅकिंग केलेली असते, काही काही गोळ्या एका विशिष्ट एका बॉक्स मध्ये सुद्धा येतात!

हा सगळा फरक प्रत्येक गोळीच्या कंपनीमध्ये आणि ब्रॅण्डिंग मध्ये दिसून येतो! त्यामुळे या पाकिटावर किती रिकामी जागा सोडायची किंवा सोडायचीच नाही हे सर्वस्वी प्रत्येक कंपनी ठरवते!

 

तर जेंव्हा या गोळ्यांचं पॅकिंग केलं जातं तेंव्हा त्या एका गोळीच्या आजूबाजूला रिकामी जागा सोडण्याचं कारण असत कि त्या गोळ्या एकमेकांमध्ये मिसळून जाऊन त्यातून कुठलीही केमिकल रिऍक्शन होऊ नये, यासाठी ती जागा सोडतात!

जर केमिकल रिऍक्शन झाली तर ती औषधं किती उपयोगी पडतील, शिवाय ती औषधं कोणी घेतली तर त्या केमिकल बदलांमुळे त्या औषधांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर अपाय होण्याची शक्यता जास्त असते!

म्हणूनच हा धोका टाळण्यासाठी ती रीकामी जागा सोडली जाते!

शिवाय या गोळ्या जेंव्हा प्रत्येक मेडिकल दुकानात पोहोचवल्या जातात तेंव्हा त्या माल वाहतुकीत सुद्धा त्या गोळ्यांशी काहीतरी छेडछाड होण्याची शक्यता असते त्यामुळे सुद्धा हि गोष्ट औषधांच्या कंपन्यांकडून कटाक्षाने पाळली जाते!

 

 

याचे आणखीन एक कारण म्हणजे फार्मास्युटीकल नियमांच्या आधारे तसेच, मार्केटिंग स्टँडर्ड्स फॉलो करायची म्हणून सुद्धा या कंपन्या हि रिकामी जागा सोडतात!

गोळ्यांच्या पाकिटाच्या मागच्या बाजूला बराचसा तपशील लिहिलेला असतो त्यासाठी सुद्धा हि रिकामी जागा सोडली जाते!

१० किंवा २० गोळ्यांच्या पाकिटावर हा सगळं तपशील लिहिणं अगदी सोपं जातं कारण ते पाकीट बरेच मोठे असते, पण जर हि औषधांची स्ट्रीप फक्त एका गोळीची असेल तर मात्र तो तपशील लिहायचा कशाला हा एक मोठा प्रश्न असतो!

त्यामुळे एक जरी गोळी पाकिटात असेल तरी त्यांना त्या तपशीलासाठी योग्य ती रिकामी जागा सोडावीच लागते!

 

 

शिवाय यामागे आणखीन एक महत्वाचे कारण म्हणजे लोकांच्या मानसिकतेवरून सुद्धा हे पॅकेजिंग ठरवता येतं, जास्त मोठं आकर्षक आणि रिकामी जागा सोडलेलं पॅकिंग म्हणजे सर्वात जास्त उत्तम आणि महागडं औषध!

असं सर्वसाधारण माणसाचं मत ठरतं त्यामुळे लोकं काय प्रकारे विचार करतात हि गोष्ट सुद्धा या पॅकेजिंग मध्ये खूप महत्वाची ठरते!

 

DNA india

 

आता तुमच्या लक्षात आलं असलेच की केवळ पॅकेजिंग आकर्षक दिसावी एवढच यामागे कारण नसून इतरही महत्त्वाची कारण आहेत. 

आणि कशाप्रकारे हे पॅकेजिंग लोकांसमोर येतं आणि त्यातून नेमकं या मोठमोठ्या कंपन्यांना काय साधायचं आहे हे सुद्धा समजत!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version