असे काही भन्नाट उपाय, ज्यांनी पिवळ्या बाथरूम टाईल्स होतील मिनिटांमध्ये चकाचक
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण कामानिमित्त अथवा फिरायला कुठे गेलो आणि एखाद्या छान हॉटेलमध्ये उतरलो, तर रुमपेक्षाही आपण पहिले बाथरूम अथवा टॉयलेट कसं आहे हे पहातो. ते जर छान, चकाकणारं असेल, तर मन अगदी प्रसन्न होतं.
हे चकाकणारं बाथरूम फक्त हॉटेलमध्ये मिळू शकते का, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर, त्याचं उत्तर नाही हे आहे. काही उपयुक्त टिप्स वापरून तुम्ही तुमच्या घरचे बाथरूम देखील असेच चकाचक ठेवू शकाल. तर पाहू या काय आहेत या टिप्स –
बाथरूम ही अशी जागा आहे, जिथे सातत्याने पाणी आणि साबण पडत असतात. त्यामुळे नुसतेच वॉशिंग पावडरने घासून अथवा वाइपने पाणी काढून बाथरूम स्वच्छ होत नाही. साबणाचे डाग तसेच राहतात.
हे डाग घालविण्यासाठी हार्पिक किंवा बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध बाथरूम क्लीनरचा तुम्ही वापर करू शकतात.
बाथरूमच्या समस्या लक्षात घेऊन आजकाल बाजारात वेगवेगळ्या स्वरूपाचे अनेक क्लीनर्स उपलब्ध आहेत. यांचा वापर केल्यास टाइल्स स्वच्छ राखण्यास मदत होते.
बऱ्याचदा असे होते, की या क्लीनर्सच्या विशिष्ट वासामुळे लोक ते वापरण्यास धजावत नाही. यासाठी घरच्या घरी तुम्ही काही सोल्युशन सहजपणे तयार करू शकतात. जसं –
एक मोठा चमचा बेकिंग सोडा त्यात दोन चमचे डीटर्जेंट आणि एक चमचा हर्पिक टाकून त्याची दाटसर अशी पेस्ट तयार करा. ही पेस्ट ब्रश किंवा स्क्रबर च्या सहाय्याने टाईल्सवर लावून घ्या. १५ ते २० मिनीटांनी पाण्याने धुवून घ्या. टाईल्स एकदम चकाचक दिसतील.
पाणी आणि नेहमीच्या वापरातील व्हिनेगर समप्रमाणात घ्या. हे द्रावण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. या द्रावणाचा स्प्रे टाईल्सवर मारा. ५ मिनिटं तसाच राहू द्या. मग ब्रशच्या मदतीने घासून घ्या. दोन टाईल्सच्या मधली घाण यामुळे सहजपणे निघून आलेली दिसेल.
अर्धा कप बेकिंग सोडा त्यात एक ते दोन चमचे डिश जेल व पाव कप हायड्रोजन परोक्साइड टाकून या द्रावणाने स्प्रे करून घासल्यावर टाईल्सवर चांगला परिणाम दिसून येतो.
३ कप पाण्यात १ कप ब्लीच टाकून या द्रावणाचा स्प्रे मारून १५ मिनिटे ठेवावा.आणि नेहमीप्रमाणे घासून धुऊन घ्यावा.
२ कप पाण्यात एक कप अमोनिआ टाकून या द्रावणाचा देखील तुम्ही उपयोग केल्यास निश्चित फायदा होईल.
लिंबू हा देखील टाईल्स स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त असा घटक आहे. २ ते ३ चमचे बेकिंग सोडा घेऊन त्यात अर्धा लिंबू घोळवून घ्यावा. मग हा लिंबू टाईल्स वर रगडावा. पाच ते दहा मिनिटांनी नेहमीप्रमाणे धुऊन घ्यावा.
यामुळे टाईल्स तर स्वच्छ होण्यास मदत होते, पण लिंबाच्या सुगंधामुळे बाथरूममध्ये एकदम ताजेतवानेपणा जाणवतो.
बाथरूमच्या टाईल्सची स्वच्छता करताना नेहमी हातात ग्लोव्हज घालावेत व शक्य असल्यास तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा. कारण बऱ्याचदा क्लीनर्स किंवा ब्लीच सारख्या गोष्टी वापरताना अॅसिडसारखा उग्र वास येत असतो. खूप जणांना हा वास सहन होत नाही अथवा त्याची अॅलेर्जी असते.
टाईल्सची स्वच्छता झाल्यानंतर त्यावर कार वॅक्सचे एक ते दोन कोट भिंतीवर मारावे. यामुळे भिंतीला एक प्रकारची शाईन येते. शिवाय यामुळे भिंतींवर पाणी जास्त वेळ टिकून रहात नाही.त्यामुळे त्या लवकर खराब होत नाहीत.
सर्व स्वच्छता झाल्यानंतर बाथरूमची जमीनशेवटी स्वच्छ करून घ्यावी. ती वाइपच्या सहाय्याने कोरडी करून घ्यावी. अशा पद्धतीने बाथरूमच्या टाईल्स ची स्वच्छता केल्यास तुमचे बाथरूम देखील हॉटेलच्या बाथरूमसारखे चकाचक दिसेल.
—
- आहारात हे १० पदार्थ असतील तर प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याची शाकाहारी लोकांना गरज पडणार नाही
- ‘पावसाळ्यात कपडे वाळतच नाहीत’ या समस्येवर ‘हे’ आहेत रामबाण उपाय
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.