आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मासिक पाळीचे चक्र हे सर्व साधारणपणे २८ ते ३२ दिवसांचे असते. या कलावधीने येणारी पाळी ही नियमित मानली जाते. तर या कालावधीपेक्षा एक आठवड्याहून जास्त दिवसांनी पाळी आल्यास ती अनियमित पाळी समजली जाते.
पाळी अनियमित होण्यामागे अनेक कारणे जसे – ताण, सततचा प्रवास, थायरोइड, अति प्रमाणात चहा-कॉफी किंवा अल्कोहोल युक्त द्रवांचे सेवन इ. कारणीभूत ठरतात.
जर ही अनियमितता सातत्याने दिसू लागली तर, ओलिगोमेनोरेहा (अपुरी पाळी ) सारखा विकार जडू शकतो. जर हा विकार वेळीच टाळावयाचा असेल तर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत काही बदल करावे लागतील.
नियमित योगासने अथवा कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम आणि पुढील काही पदार्थांचा आहारात नियमित समावेश केल्यास पाळी नियमित होण्यास मदत होऊ शकते. तर कोणते आहेत असे हे पदार्थ पाहू या –
आलं –
अपचनापासून ते सर्दी-डोकेदुखी पर्यंत हमखास गुण देणारा पदार्थ म्हणजे आलं. व्हिटामिन सी आणि मॅग्नेशिअम सारख्या घटकांनी पुरेपूर भरलेला हा पदार्थ म्हणजे अनियमित पाळीवरचे घरगुती औषधच आहे, असं समजायला हरकत नाही.
चहा, कॉफी किंवा इतर कोणतेही पेय तुम्ही घेत असाल त्यात जर माफक प्रमाणात आलं टाकून घेतल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. आल्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होते आणि त्यामुळे पाळी येण्यास मदत होते.
पपई –
बऱ्याचवेळेला गरोदरपणात बाकी काही खा, पण पपई मात्र खाऊ नकोस,असा सल्ला आवर्जुन त्या स्त्री ला दिला जातो. कारण ती इतकी उष्ण असते, की गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते. याच उष्ण गुणांमुळे पाळी येण्यास उशीर होऊ लागला, की भरपूर प्रमाणात पपया खाण्याचा सल्ला दिला जातो.
पपईमध्ये मूलत: असे काही घटक असतात, ज्यामुळे शरीरातील इस्ट्रोजन हार्मोन्स पातळी नियमित होण्यास मदत होते. परिणामी पाळी सुरु होण्यास मदत होते. याच कारणांमुळे पपई खाण्याचा सल्ला दिला जातो.
आहारात नियमितपणे पपईचे सेवन ठेवल्यास अनियमित पाळीच्या दोषावर सहजपणे मात करता येईल.
अननस –
काही तज्ञ डॉक्टर मंडळीच्या मते, पाळी म्हणजे फक्त शरीरातील अविकसित झालेली बीजांडे रक्ताच्या मार्फत बाहेर टाकण्याची क्रिया इतकाच त्याचा मर्यादीत अर्थ नाही, तर ती गर्भाशयाच्या आरोग्याच्या दृष्टीने होणारी एक महत्वाची प्रक्रिया आहे.
जर हे गर्भाशय आरोग्यदायी ठेवायचे असेल तर त्यास पोषक आणि पूरक ठरणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे. अननस या दृष्टीने एक महत्वाचे फळ आहे. त्यात असलेल्या एन्झाइम ब्रोमिलेनमुळे गर्भाशय सशक्त राहण्यास मदत होते.
याशिवाय, रक्तातील लाल व पांढऱ्या पेशींचे संतुलन होऊन पाळीच्या काळात रक्ताचा फ्लो योग्य रीतीने होतो. त्यामुळेच अननसाचा आहारात जरूर समावेश करावा.
–
- अंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल?
- स्त्रियांच्या अंतर्वस्त्राबाबतची एक अशी गोष्ट, जी खुद्द स्त्रियांनाही माहित नसते
–
ओवा –
शरीरातील अनेक विकारांवर रामबाण औषध म्हणजे ओवा. एक छोटा चमचा रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवून ते पाणी सकाळी उकळून प्यायल्याने शरीरामध्ये अनेक चमत्कारी फायदे दिसून येतात.
याच्या नियमित सेवनामुळे गर्भाशयाचे आरोग्य तर सुधारते. पण पाळीच्या काळात ओटीपोटात ज्या काही वेदना होतात किंवा असह्य कळा येऊन पोट दुखते, या त्रासांवर निश्चितपणे आराम पडतो.
पार्सले –
पार्सले हे कोथिंबीरी सारखे दिसणारे हर्ब्ज असले तरी ते कोथिंबीरीच्या घटकांपेक्षा खूप वेगळे आहे. आहारामध्ये याच्या रसाचा अथवा हे हर्ब्ज उकळून ते पाणी प्यायल्यास केल्यास ओटीपोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
या व्यतिरिक्त आपल्या रोजच्या आहारातील हळद, दालचिनी, अॅलोव्हिरा यांचे देखील नियमित सेवन पाळी नियमित येण्यास पूरक ठरते.
वरील गोष्टी या आरोग्यास पूरक असल्या तरीही पाळीसंदर्भात तुमच्या काही समस्या असल्यास त्यावर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बऱ्याचदा कित्येक स्त्रिया स्वत:च्या सोयीसाठी म्हणजे कधी पाळी लवकर यावी म्हणून किंवा उशिरा यावी म्हणून गोळ्या घे अथवा अमुक-तमुक खा, असे काही प्रकार करीत असतात, पण या गोष्टींचे आपल्या शरीरावर किती गंभीर परिणाम होत असतात याचा मात्र फारसा विचार केला जात नाही. निसर्गाच्या कोणत्याही चक्रात मानवी हस्तक्षेप झाला, की गडबड ही ठरलेली असते. वरील माहिती ही तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी दिली आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.