Site icon InMarathi

स्वप्नातल्या भुताने एक गोष्ट सांगितली, अन अहमदने एकामागे एक ४२ तरुणींचा बळी घेतला…

ahmed suradji featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण संपत्ती, प्रसिद्धी आणि सन्मान मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहे आणि हे मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाण्यास आणि काहीही करण्यास तयार आहे, भले त्याला यासाठी रक्तासोबत खेळावे लागले तरी चालेल…!

अशीच एक घटना इंडोनेशिया या देशात घडलेली आहे. अंधश्रद्धेमुळे एका व्यक्तीने हृदय पिळवटून टाकणारे अपराध केले आहे. ही गोष्ट आहे एका सीरियल किलरची, ज्याने ११ अल्पवयीन मुलींसह ४२ महिलांची हत्या केली होती.

अंधश्रद्धेपोटी या व्यक्तीने प्रत्येक महिलेला क्रूरपणे ठार केले होते. १० जानेवारी १९४९ रोजी मेदान, उत्तर सुमात्रा, इंडोनेशिया या मुस्लिमबहुल देशात जन्मलेला अहमद सुरदजी हा ‘ब्लॅक मॅजिक किलर’ या नावाने ही ओळखला जायचा.

 

 

अहमद ज्याला आपला बळी बनवायचा त्याच्या अर्धा मृतदेह जमीनीखाली दफन करायचा आणि अर्धा भाग वर ठेवायचा आणि यावर असलेल्या शरीरावर तंत्रविद्या करायचा.

अहमद सुरदजी हा व्यवसायाने तांत्रिक होता, ज्यात त्याने काही दिवसांनी महिला आणि मुलींना आपली शिकार बनवायला सुरुवात केली. या तांत्रिकाने १७ ते ४० वयोगटातील महिलांना आपला बळी बनवले.

अहमद सुरदजी हा अनेक वर्षांपासून जादूटोण्याच्या व्यवसायात होता आणि अनेक लोक त्यांच्या समस्या घेऊन त्याला भेटायला येत असत. समस्या घेऊन येणाऱ्यांपैकी बहुतेक वेळा तर मुली आणि स्त्रियाच असायच्या.

या स्त्रिया अहमदला तिच्या पतींना किंवा प्रियकरांना आपल्या वश मध्ये करण्यासाठी तसेच सुंदर दिसण्यासाठीच्या टिप्ससाठी आपल्या घरी बोलवत असे. यानंतर हळूहळू योग्य वेळेची संधी बघून अहमदने दुष्कृत्य करण्यास सुरुवात केले, त्याच्या या कामाला १० वर्ष झाले तरी कोणालाही संशय आला नाही.

परंतु जेव्हा लोकांना त्याच्यावर संशय आला तेव्हा ३० एप्रिल १९९७ रोजी त्याला मेदान, सुमात्रा येथून अटक करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा त्याच्या घराची तपासणी केली गेली तेव्हा त्याच्या घरातून डझनभर मृतदेह सापडले होते.

 

 

त्याच्यावर संशय येण्यामागचे कारण म्हणजे जेव्हा त्याला अटक केली गेली होती, त्याच्या ठीक एक आठवडा आधी, २४ एप्रिल रोजी केमला नावाच्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात सापडला होता. तपासादरम्यान लक्षात आले की, ती तांत्रिक अहमदला भेटण्यासाठी आली होती.

जेव्हा पोलिसांनी अहमदला तिच्याविषयी विचारले तेव्हा सुरुवातीला तर त्याने तिला ओळखण्यास नकार दिला. परंतु जेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची पडताळणी केली तेव्हा त्याच्या घरातून केमालाची पर्स आणि इतर सामान सापडले होते. यानंतर मग त्याने या दुष्कर्माची कबूली दिली.

अटकेनंतर केलेल्या चौकशीत अहमद सुरदजीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, तेव्हा पोलिसांना तर जोरदार धक्का बसला. मेदन प्रशासन आणि तपास अधिकाऱ्यांनी अनेक दिवस चौकशी केली असता त्याने १९८६ ते १९९७ या काळात ४२ महिलांची हत्या केल्याचे कबूल केले. त्याच्या या कामात त्याच्या तीन पत्नींपैकी एक पत्नी तुमिनीनेही त्याला या संपूर्ण कामात मदत केली होती.

त्याने पोलिसांना सांगितले होते की, एके दिवशी त्याच्या स्वप्नात त्याच्या वडिलांचा आत्मा आला. त्या आत्याने त्याला स्वप्नात सांगितले की जर तो ७० महिलांची लाळ प्यायल्यास तर तो एक चांगला आणि विद्वान तांत्रिक होऊ शकतो. यानंतर तो लगेचच या कामात गुंतला.

 

 

सुरदजीनी सांगितले की, वडिलांच्या आत्म्याने कोणत्याही महिलेला मारण्याचा सल्ला दिला नव्हता, परंतु त्याने असे विचार केले की, जर त्याने प्रत्येक महिलेमागे लाळेची वाट बघितली तर ७० महिलांची लाळ होईपर्यंत संपूर्ण आयुष्यभर निघून जाईल. अशा स्थितीत त्याने सर्व महिलांना जीवे मारण्यास सुरुवात केली आणि त्या मृत महिलांची लाळ पिऊ लागला.

अहमद सुरदजीने पोलिसांना सांगितले की, आधी तो महिला/मुलींना मारायचा आणि नंतर मृतदेहाचा चेहरा त्याच्या घराकडे ठेवून तिचा अर्धा भाग जमिनीत गाडायचा आणि अर्धा भाग जमिनीच्या वर ठेवायचा. अहमद ला वाटायचे की त्याच्या या तंत्रविद्येमुळे ‘शक्ती’ त्याच्या घरात कैद होईल.

अहमदची पत्नी तुमिनी हिला खुनात सहभागी झाल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली.

तर २७ एप्रिल १९९७ रोजी न्यायालयाने अहमदला फाशीची शिक्षा सुनावली होती. ब्लॅक मॅजिक किलर अहमद सौरदजी याला १० जुलै २००८ रोजी न्यायालयाच्या आदेशानंतर ४२ लोकांच्या हत्येच्या आरोपाखाली गोळीबार पथकाद्वारे मारुन टाकण्यात आले.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version