आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – भूषण वैद्य (चित्रकार, शिल्पकार)
—
आम्हा महाराष्ट्रातील शिल्पकारांच्या उन्नतीसाठी सुरू केलेला एक व्हॉटसअॅप ग्रुप आहे. त्यावर शिल्पकार सुनील देवरेसुद्धा आहेत. त्यांना मी राजचिन्हच्या शिल्पाबाबत काही प्रश्न विचारले होते.
●सारनाथच्या मूळ शिल्पाची रेप्लिका बनवायची होती की सिंह करण्यासाठी काही फ्रीडम दिलं होतं?
शिल्पकार सुनील देवरे सरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं आहे, की त्यांनी सारनाथ येथे सापडलेल्या स्तंभशीर्षाची रेप्लिका बनवली आहे. किंवा तेच शिल्प मुख्य रेफरन्स आहे.
कोणतेही आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स किंवा शिल्पस्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.
■आता मुख्य आक्षेप
◆मुख्य शिल्पाचे डोळे मोठे असून ते नाकपुडीच्या अगदी थोड्या वरच्या रेषेपर्यंत आहेत. नव्या शिल्पात रागीट भावामुळे भुवया आक्रसल्या आहेत त्यामुळे कपाळाच्या मधोमध पडलेल्या वळ्या या मुख शिल्पात कुठेही नाहीत.
◆एकूण मुख्य शिल्पाची सिमेट्रीकल आयाळ असून ती एखाद्या पॅटर्न प्रमाणे कोरलेली आहे अगदी जे नव्या शिल्पात रियलिस्टिक करण्याचा प्रयत्न वाटतो.
◆जेव्हा तुम्ही शिल्पाचा आकार अतिभव्य बनवता तेंव्हा पर्सपेक्टिव्हनुसार हेड मोठं करावं लागतं, पण इथे ते आहे त्याच्यापेक्षा पण लहान झालंय.
डोक्याच्या दोन्ही बाजूला भरपूर आयाळ नसून पण भरपूर प्रमाणात आयाळ दाखलेली आहे जी पार पायापर्यंत वाढलेली आहे.
◆सारनाथचं स्तंभशीर्ष त्याच्या झिलईसाठी प्रसिद्ध आहे. मग ते मातीकामात तर सहज शक्य होतं. (मेटल कास्टिंग करताना तो परिणाम आला नाही तरी ते घासून बफिंग करू शकतो)
◆शिल्पाचे वेगवेगळे भाग जोडलेले एवढे स्पष्ट दिसत आहेत की ते घासून लेव्हल करण्याचे कष्ट ही घेतले नाहीत. हे खटकलं नाही का शिल्पकाराला आणि ते काम अप्रुव करणाऱ्या टीमला?
◆पायावर एवढ्या घोड्यासारख्या शीरा दाखवण्याचं नेमकं प्रयोजन काय?
◆खालचे घोडा आणि बैल (हत्ती आणि सिंह पलीकडल्या बाजूला आहेत) हे ज्या पद्धतीने मुख्य शिल्पात कोरले आहेत त्यासारखे नव्या शिल्पात अजिबात दिसत नाहीत.
बैलाचा पुढच्या दोन पायांपैकी एक सरळ आणि एक हवेत का आहे? त्याचे खुर असे जाडे भरडे का केले आहेत हे न कळणारे आहे.
(मुख्य शिल्पात किती व्यवस्थित खाली टेकलेला पाय आहे.) या साध्या गोष्टी एक शिल्पकार म्हणून लगेच नजरेत भरतात.
खरंतर मातीकामातच एवढे दोष आहेत, की ते यावर काम करणाऱ्या अधिकारी वर्गाने अप्रुव्ह कसे केले हे कोडं आहे.
आपलं राजचिन्ह जसं असायला हवं तसं ते झालं आहे का? अजिबात नाही.
एखाद्या गणपतीच्या सिंहासनाचा सिंह करावा तसा काहीसा तो सिंह मला स्वतःला वाटतो. अशोक स्तंभावरचा सिंह नक्कीच नाही.
ज्या शिल्पकामाचा आदर्श सांगितला गेला पाहिजे ते कामंच सदोष असेल तर आपण भारतीय, शिल्पकलेचा नेमका काय वारसा सांगणार आहोत?
राजकीय लोकांना त्या आडून मोदींवर टीका करायची असेल किंवा अजून काही, त्याच्याशी आपल्याला देणे घेणे नाही. जे स्पष्ट दिसतं आहे ते बोलायला हवं. कारण शेवटी हा चौकातल्या एखाद्या शिल्पाचा विषय नसून संसदेवर लागणाऱ्या राजचिन्हाचा थोडक्यात देशाचा विषय आहे.
(हे आक्षेप घेतल्यावर सकाळपासून अनेक ज्येष्ठ शिल्पकारांचे आणि शिक्षकांचे मला फोन आले. त्यांनी तर हे शिल्प तिथे लागण्याच्या ताकदीचं आणि लायकीचं नाही. ते खरंतर उतरवून नवं बसवणं गरजेचं आहे इथवर मतप्रदर्शन केलं आहे)
(मुख्य शिल्प चहूबाजूने दाखवणाऱ्या व्हिडिओची लिंक खाली दिली आहे)
—
—
मोदींना दोष देण्यात अर्थ नाही, हे मधले लोक जे आहेत त्यांचा हा हलगर्जीपणा आहे. एखाद्या माणसाला (नेत्याला) सगळ्या क्षेत्रातलं सगळं कसं काय येईल. त्यासाठी त्यांना सल्ला देणारे त्या त्या क्षेत्रातले तज्ञ असतात ना. मग इथे एवढी माती खाल्ली जात असताना हे तज्ञ नेमके काय करत होते?
आपल्या शीर्ष नेतृत्वाला मान खाली घालायला लागू नये हे त्यांचं काम आहे.
—
- गौतम बुद्ध म्हणजेच गरजणारा सिंह! भारतीय संस्कृतीची अशीही ओळख सांगणारा अशोक स्तंभ!
- राजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्हे कशी मिळतात?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.