रक्तदानाने फक्त दुसऱ्याचाच फायदा होतो असं नाही, वाचा रक्तदानाचे आश्चर्य वाटावेत असे फायदे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? जे बरोबर देखील आहे.
प्रत्येकालाच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे असं वाटतंच असं नाही, सगळ्यांनाच ते रक्तदान करायलाच आवडतं किंवा पटतं असं नाही! रक्तदान करायला कुणीच कुणावर जबरदस्ती करू शकत नाही!
रक्तदान करण्यावरून आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजावरून असे दिसून येते की, रक्तदानाचे महत्त्व माहित असूनही ते लोकांना फारसे पटलेले नाही.
त्यामुळेच अनेक जणांच्या तोंडून तुम्ही ऐकले असेल की, “रक्तदान शरीरासाठी घातक आहे…”, “रक्तदान केल्याने शरीर अशक्त होते…” वगैरे वगैरे!
पण असं खरंच काही नाहीये. उलट नियमित रक्तदान शरीरासाठी अतिशय चांगले आहे. रक्तदान तुमच्या शरीरातलं फक्त रक्त काढून न घेता, तुम्हाला बऱ्याच गोष्टी देतं!
रक्तदान करणे, न करणे ही प्रत्येकाची ऐच्छिक निवड आहे. परंतु अनेकदा केवळ गैरसमजांमुळे रक्तदान करण्यापासून लोक परावृत्त होतात.
त्यामुळे आपल्या सर्वांनाच हे माहित होणे आवश्यक आहे की रक्तदान करणे हे शरीरासाठी उत्तम आहे आणि त्याचे काही फायदेही आहेत.तुमच्यापैकी ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांच्यासाठीच हा खास लेख.
आज आम्ही तुम्हाला रक्तदानाविषयी असे काही फायदे सांगणार आहोत जे रक्तदानाविषयीचा तुमचा नकारात्मक प्रतिसाद बदलतील आणि तुम्ही देखील स्वत:हून रक्तदान करायला हजर व्हाल.
१) नियमित रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह अधिक सुरळीत होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका ३०-४०% ने कमी होतो.
वयाची ४० शी आली कि ब्लड प्रेशर तसेच कोलेस्ट्रॉल असे त्रास चालू होतात, आणि मग त्याचे भीषण परिणाम म्हणजे त्याचं रूपांतर गंभीर हार्ट अटॅक मध्ये होणे!
शिवाय ज्यांना मधुमेहाचा (डायबिटीसचा) त्रास असतो त्यांना तर हार्ट अटॅक ची लक्षणं सुद्धा जाणवत नाही आणि त्यामुळेच ती व्यक्ती दगावण्याची शक्यता बळावते!
रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह सुधारतो. ह्यामुळे ब्लड वेसल्सच्या लायनिंग डॅमेज होत नाहीत. त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो.
२) आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते.
त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.
एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये?
३) रक्तदानामुळे रक्तांच्या नवीन पेशींच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो. त्याचा थेट फायदा असा होतो कि आपण निरोगी आणि उत्साही राहतो.
४) नियमित रक्तदानामुळे कॅन्सर होण्याची शक्यता मंदावते, हा फायदा बऱ्याच जणांना माहीतही नाही…!
५) रक्तदान केल्याने कोलेस्टेरॉल देखील कमी होते. यामुळे कोलेस्टेरॉलमुळे होणाऱ्या रोगांचा धोकाही राहत नाही.
६) जर तुम्ही नियमित रक्तदान केले तर तुमची जखम ही लवकर भरून निघते. कारण जेव्हा तुम्ही नियमित रक्तदान करत तेव्हा शरीर स्वत:हून लाल पेशींचे उत्पादन कमी करते.
७) जर तुम्ही जास्त वजनाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही नक्कीच रक्तदान केले पाहिजे.
कारण प्रत्येक वेळी रक्तदान केल्यावर तब्बल ६५० कॅलरीज कमी होतात. ज्याचा थेट तुमच्या वजनावर परिणाम होतो…!
रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील, नाही का?
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता.
८) नियमित रक्तदानामुळे केवळ वजनच कमी होत नाही, तर तुमच्या शरीराचा “भार” कमी झाल्याने तुमचं शरीर लवकर थकतही नाही.
चला तर मग इतरांनाही हे फायदे सांगा आणि रक्तदान करण्यासाठी त्यांना आवाहन करा!
अर्थात तुम्हाला जर रक्तदान करायचे असल्यास काही गोष्टी ह्या कटाक्षाने पळायला लागतात! जसे कि नियमित मद्यपान किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने रक्तदान करणे तितकेसे उपयोगाचे नसते!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.