आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय राजकारणात असे अनेक नेते आहेत, ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, अश्याच एका व्यक्तीबद्दल आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत. या व्यक्तीची संपत्ती अनेक उराज्यांच्या बजेटपेक्षा ही जास्त आहे, तसेच अनेक उद्योजकांपेक्षा कैक पटीने जास्त या घराण्याची संपत्ती आहे. हा नेता दुसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे(सिंधिया) आहेत.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे अधुन-मधून चर्चेमध्ये येत असतात. एका राजघराण्याचे वारसदार असल्याकारणाने त्यांच्याकडे एकूण किती मालमत्ता असेल, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. हा प्रश्न जितका सोपा आहे तितकाच गुंतागुंतीचा देखील आहे. सिंधिया कुटुंबातील लोकांनी १९५७ झाली आपली जी मालमत्ता सार्वजनिक केली होती, ती वास्तविकमध्ये खूपच दाखवली होती, कारण यांच्याकडे तुलनेने अफाट मालमत्ता आहे.
चला तर जाणून घेऊया सिंधिया घराण्याकडे मालमत्ता आहे तरी किती :-
●४० हजार कोटी संपत्तीचे मालिक
वसुंधरा राजे सिंधिया या भाजपकडून राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री होत्या तर त्यांचे वडील स्व. माधवराव सिंधिया हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. माधवराव सिंधिया यांचा मुलगा ज्योतिरादित्य सिंधिया २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत उमेदवार होते.
सिंधिया घराण्याच्या संपत्तीचा अंदाज बांधणे कठीण आहे, परंतु ती एकूण ४० हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. सिंधिया यांनी २०१४ लोकसभेत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ३२ कोटी ६४ लाख ४१२ रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले होते.
● सिंधिया कडे आहे ४०० खोलींचा आलिशान बंगला :-
ज्योतिरादित्य हे ४०० खोली असलेल्या राजवाड्यात राहतात. १८७४ मध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या या राजमहालचे नाव जयविलास पॅलेस असे आहे. ४०० खोल्यांच्या राजवाड्यात ४० खोल्यांमध्ये तर फक्त संग्रहालयचं आहे, तर राजवाड्याच्या छतावर अनेक ठिकाणी सोने मढवलेले आहे.
या इमारतीची किंमत सुमारे दोनशे दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. ग्वाल्हेरमधील सिंधियाचा जय विलास पॅलेस १,२४०,७७१ स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला आहे. या राजवाड्याचे वैभव भारताप्रमाणेच संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. तसेच या वाड्याच्या भिंतीही सोन्याने रंगवलेल्या आहेत. या राजवाड्यात ३५०० किलोचा चांदीचा झुंबर आहे.
● दरबार हॉलची वैशिष्ट्ये :-
हा राजवाडा १८७४ मध्ये जिवाजीराव सिंधिया यांनी बांधला असून लेफ्टनंट कर्नल सर मायकेल फिलोज यांनी याचे डिझाइन तयार केलं होत. या राजवाड्यात एक मोठा आलिशान रॉयल दरबार हॉल आहे, जो १०० फूट लांब, ५० फूट रुंद आणि ४१ फूट उंच आहे. त्याच्या छतावर १४० वर्षांपासून ३५०० किलो वजनाची दोन झुंबरे लटकत आहेत. ते टांगण्यासाठी अभियंत्यांनी १० हत्तींना ७ दिवस छतावर उभे ठेवले होते. हे झुंबर बेल्जियमच्या कारागिरांनी बनवले होते.
अशाच प्रकारे सिंधिया राजघराण्याकडे देशभरात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. परंतु आपल्याला माहित आहे का या मालमतेला घेऊन वेळोवेळी सिंधिया कुटुंबात कलह निर्माण झाला आहे. चला तर जाणून घेऊया नेमके या एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये भांडणे होण्यामागचे नेमके कारण तरी काय…
वाद काय?
ज्योतिरादित्य यांची धाकटी आत्या यशोधरा राजे सिंधिया हे सिंधिया कुटुंबातील संपत्तीचा वाद न मिटण्याचे प्रमुख कारण असू शकत, असे अलिकडच्या एका पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलं होत. यशोधरा यांच्या दोन मोठ्या बहिणी मालमत्तेच्या वादात फारसा रस घेत नाहीत, असेही यात सांगण्यात आलं होत. तसेच यशोधरा राजे आपल्या वडिलोपार्जित वारसाहक्कातील वाटा सोडून देण्याच्या तयारीत नाहीत.
राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या काळापासून सिंधिया कुटुंबात मालमत्तेचा वाद सुरू झाल्याचं सांगितलं जात. आपल्या मृत्युपत्रात राजमाता यांनी आपल्या मालमत्तेतून मुलगा माधवराव सिंधिया आणि नातू ज्योतिरादित्य यांना एक रूपयाही दिला नव्हता. मात्र उषा राजे, वसुंधरा राजे आणि यशोधरा राजे या तीन मुलींना त्यांनी आपल्या संपत्तीचा काही वाटा दिला होता.
जोपर्यंत माधवराव सिंधिया हयात होते तोपर्यंत त्यांनी न्यायालयात खटला लढत होते आणि आता हाच खटला ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या ३ आत्यांमध्ये सुरू आहे.
१९८४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, सिंधिया कुटुंबाची सर्व मालमत्ता विजयराजे आणि त्यांचा एकुलता एक मुलगा माधवराव यांच्यामध्ये अर्धवट वाटून घेण्यात आली होती. राजमाता यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर ही कारवाई करण्यात आली होती. याचे कारण म्हणजे राजमाता यांचे पती जिवाजीराव सिंधिया यांनी मृत्यूपूर्वी कोणतंही मृत्युपत्र लिहलं नव्हतं.
यानंतर १९९० मध्ये माधवराव सिंधिया यांनी ग्वाल्हेर न्यायालयात अर्ज दाखल केला की ते सिंधिया कुटुंबाचे एकमेव वारसदार आहेत. तेच प्रकरण आता न्यायालयात सुरू आहे. राजमातांच्या तीन मुली माधवरावांच्या या दाव्याच्या विरोधात आहेत आणि या तिघीही राजमातेच्या १९८५ च्या मृत्युपत्राचा हवाला देतात. या मृत्युपत्रानुसार राजमाता यांनी पुत्र माधवराव सिंधिया आणि नातू ज्योतिरादित्य यांना काहीही दिलं नव्हतं.
या वादाला एक नवीन वाट तर तेव्हा मिळाली जेव्हा खुद्द राजमाता आपल्या मुलाच्या विरोधात उपोषणाला बसल्या होत्या. या मागचे कारण म्हणजे सिंधिया घराण्याचे वडिलोपार्जित शिवलिंग होते. हे शिवलिंग पाचूचे बनले होते.
अंड्याच्या आकाराचे हे शिवलिंग अनेक पिढ्यांपासून सिंधिया कुटुंबाकडे आहे. असं म्हटलं जात की हे शिवलिंग सिंधिया कुटुंबासाठी विजयाचे प्रतीक आहे. ग्वाल्हेरचे सैन्य जेव्हा युद्धावर जायचं तेंव्हा महादजी शिंदे (सिंधिया) ते पगडीच्या आत घालायचे. शिंदे महाराज आणि महाराणी दरवर्षी महापूजा करायचे आणि हे शिवलिंग या पूजेचेअविभाज्य भाग होते.
मालमत्तेचे विभाजन झाल्यानंतर लगेचच राजमाता सिंधिया यांनी शिवलिंग आपल्याजवळ ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. अशी मागणी त्यांनी माधवरावांकडे केली. परंतु यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. यानंतर या वादात माधवरावांच्या पत्नी माधवीराजे यांनी उडी घेतल्याने हे प्रकरण आणखी चिघळले.
सुरुवातीला तर माधवीराजे या प्रकरणात काहीच बोलल्या नाही. सासू-सासरे आणि पती यांच्या वादात ती काहीच बोलली नाही. परंतु शिवलिंगाबाबत वाद सुरू झाल्यावर माधवीराजे म्हणाल्या की, ग्वाल्हेरची राणी म्हणून शिवलिंगाची पूजा करण्याचे हक्क फक्त आपले आहे. एवढेच नाही तर सौभाग्यवती स्त्री जेव्हा पूजेला बसते तेव्हाच शिवलिंगाची पूजा योग्य मानली जाते, असेही माधवीराजे म्हणाल्या.
–
“शिंदे” घराण्याने इतिहासात किती महत्वाचं स्थान कमावलं आहे हे बघून थक्क व्हाल!
इतिहासातल्या या सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे असलेल्या संपत्तीचा आपण विचारही करु शकणार नाही
–
पती गमावलेल्या विजयाराजे यांना हे ऐकून खूप दुःख झालं होत. संतापलेल्या त्या जयविलास पॅलेसमध्येचं उपोषणाला बसून गेल्या. शिवलिंग परत न मिळाल्यास मी उपाशीपोटी प्राण सोडेल असही त्या म्हणाल्या होत्या.
राजमातेच्या या घोषणेने माधवराव पूर्णतः घाबरले होते. एका बाजूला आई आणि दुसरीकडे पत्नी असल्याने त्यांना काहीच करता येत नव्हतं. राजमातेचा जिद्दी स्वभाव त्यांना चांगलाच ठाऊक होता. राजमातेला काही होणार नाही याची त्यांना भीती वाटत होती. माधवराव बायकोची समजूत घालू लागले. खूप प्रयत्नानंतर माधवीराजे शिवलिंग देण्यास तयार झाल्या होत्या. राजमातेला शिवलिंग परत मिळाले, त्यानंतर त्यांनी आपली जिद्द सोडली.
या घटनेने माधवरावही खुप दुखावले गेले होते. राजमातेच्या मृत्यूनंतरही त्यांनी शिवलिंग आपल्याजवळ ठेवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून हे शिवलिंग नेपाळमध्ये राजमाता यांच्या ज्येष्ठ कन्या उषाराजे यांच्याकडे आहे.
२००१ साली राजमाता यांच्या पक्षाच्या वकिलांनीही न्यायालयात दुसरे इच्छापत्र दाखल केले यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली. ज्यामध्ये राजमाता यांनी आपली संपूर्ण संपत्ती तीन मुलींच्या नावावर केली होती. मात्र, आता न्यायालये या मृत्युपत्रांची वैधता अतिशय बारकाईने तपासत आहेत. मात्र, आगामी काळात या प्रकरणाला सामोरे जाणे कठीण असल्याचे सध्या तरी मानले जात आहे. कारण एकीकडे वसुंधरा राजे आणि यशोधरा राजे सिंधिया आपली मालमत्ता सोडायला तयार नाहीत तर ज्योतिरादित्य सिंधिया देखील मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.