Site icon InMarathi

शबाना आझमी मुस्लिम असल्यामुळे एक अस्सल कलाकार त्यांच्या प्रेमाला पारखा झाला!

shabana azmi featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा कित्येक प्रेम कहाण्या अशा आहेत ज्या कायम अधुऱ्याच राहिल्या. राज कपूर – नर्गिस, गुरुदत्त – वहिदा रेहमान, अमिताभ बच्चन – रेखा अशा कित्येक स्टार्सची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात.

या स्टार जोड्या पुढे वैयक्तिक आयुष्यात जरी एकत्र आल्या नसल्या तरी त्यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनात बरंच एकत्र काम केलं आणि लोकांच्या मनात स्वतःची अशी खास जागा निर्माण केली.

 

 

अशाच एका अत्यंत प्रतिभावान अभिनेत्याचीसुद्धा प्रेम कहाणी अधुरीच राहिली ती केवळ त्याच्या आईच्या हट्टापायी. “मुसलमान मुलगी ही सून म्हणून घरात चालणार नाही” असा त्यांच्या आईचा आग्रह होता, आणि त्यामुळेच या अभिनेत्याची लव्ह स्टोरी पूर्ण होऊ शकली नाही.

तो प्रतिभावान अभिनेता म्हणजे संजीव कुमार. संजीव कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून कित्येकांच्या हृदयात घर केलं आहे. सिनेसृष्टीचा शेहेनशाह अमिताभ बच्चन यांनीसुद्धा ज्यांचा आदर्श समोर ठेवला असे संजीव कुमार हे एकमेव अभिनेते आहेत ज्यांनी त्यांच्या फिल्मी करियरमध्ये कधीच रिटेक दिला नाही.

अत्यंत संयत आणि सामान्य प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा असाच त्यांचा अभिनय होता. एका गुजराती कुटुंबात वाढलेल्या संजीव कुमार यांची लव्ह लाईफ मात्र तितकी फिल्मी आणि रंगीत नव्हती.

संजीव कुमार यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त ९ जुलै रोजी एक खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात त्यांच्या या प्रेम कहाणीविषयीचा किस्सा सांगण्यात आला.

 

 

याच सोहळ्यात संजीव कुमार यांच्या बायोग्राफीचे प्रकाशन केले गेले. रिता राममूर्ती गुप्ता आणि संजीव कुमार यांचा भाचा उदय जरिवाला या दोघांनी मिळून त्यांचं हे चारित्रात्मक पुस्तक लिहिलं असून त्यातच त्यांच्या या किस्स्याबद्दल सांगण्यात आलं आहे.

संजीव कुमार यांच्या आयुष्यात बऱ्याच मुली आल्या पण त्यांचं एकही प्रेमप्रकरण सफल झालं नाही. प्रेमाच्या बाबतीत त्यांच्या पदरी कायम निराशाच पडली.

एका मुलाखतीत संजीव कुमार यांनी त्यांच्या लव्हलाईफविषयी सांगितलं की “२६ व्या वर्षापर्यंत मी कोणत्याही मुलीशी जवळीक साधली नव्हती. पण नंतर मला एक मुलगी खूप आवडायची, तिच्यासोबत लग्न करून संसार थाटावा असंही मला वाटत होतो. पण घरून मुस्लिम मुलीशी लग्न करण्यासाठी विरोध होता. मी माझ्या आईचा लहान मुलगा असतो तर या गोष्टीची एवढी परवा केली नसती. पण माझ्या आईने वडिलांच्या पश्चात आम्हा ४ भावडांना वाढवलं, मोठं केलं त्यामुळे असं पाऊल उचलण मला शक्य नव्हतं!”

संजीव कुमार यांनी सिनेमात काम सुरू केलं तेव्हासुद्धा त्यांना आवडणाऱ्या दोन्ही मुली मुस्लिम होत्या. शिवाय नंतर त्यांचं नाव सायरा बानोशी जोडलं गेलं. जॉय मुखर्जी आणि सायरा बानो यांच्या एका सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिकादेखील साकारली होती, पण त्याचंही पुढे काहीच झालं नाही!

एका मुलाखतीत संजीव कुमार यांनी आणखीन एका अभिनेत्रीविषयी खुलासा केला, ती अभिनेत्री म्हणजे शबाना आजमी. खरंतर संजीव कुमार शबाना यांना सिनेमात येण्याआधीपासून ओळखत होते. थिएटर करताना या दोघांची ओळख झाली होती.

 

 

इतकंच नाही शबाना यांची आई शौकत यांच्याबरोबरसुद्धा संजीव यांनी नाटकात काम केलं होतं. तेव्हा त्यांच्या मनात शबाना यांच्या बाबतीत असलेल्या भावना या फार अल्लड असल्या तरी त्या आठवणी खूप सुंदर होत्या असंही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं!

संजीव कुमार यांच्या आईला मुस्लिम मुलगी नको होती आणि त्यांनी आईच्या विरोधात जाऊन शबाना यांच्याशी लग्न केलं असतं तर त्यांना घर सोडावं लागलं असतं, आणि या वयात संजीव कुमार आपल्या आईला सोडून वेगळे राहायला तयार नव्हते!

त्यामुळे संजीव कुमार आणि शबाना आजमी यांच्याही प्रेमकहाणीला नाट्यमय पूर्णविराम मिळाला आणि केवळ वयाच्या ४७ व्या वर्षी आपल्या लाडक्या हरिभाई म्हणजेच संजीव कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.

त्यांच्या भाच्याने संजीव यांच्या निधनानंतर त्यांच्या सगळ्या गोष्टी जमा केल्या, त्यात त्यांच्या चाहत्यांची पत्रं होती. याबरोबरच शबाना यांनी संजीव कुमार यांना लिहिलेली पत्रंसुद्धा त्याच्या हाती लागली.

सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनासुद्धा संजीव कुमार यांनी मागणी घातली होती, दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते, पण यापुढे त्यांच्यातही काहीच घडलं नाही. संजीव कुमार यांना पहिला हार्ट अटॅक आला तेव्हासुद्धा हेमा मालिनी त्यांच्यासोबतच होत्या.

 

 

एकंदरच आईच्या हट्टापुढे संजीव कुमार स्वतःच्या आनंदावर पाणी सोडलं. कदाचित त्यांच्या आईने हा हट्ट धरला नसता तर नक्कीच आज फार कमी वयात एकाकी पडलेले संजीव कुमार यांच्या आयुष्यात वेगळंच वळण आलं असतं. अर्थात नियतीपुढे कोणाचे काय चालणार?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version