आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चहाची वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो. तेरे बिना जिया जाये ना, चहा प्रेमींच्या तोंडी हमखास असणारी ही वाक्य टपरीपासून ते कॉर्पोरेट ऑफिसेसच्या कॅन्टिनपर्यंत ऐकू येतात. चहाचा इतिहास बघितला तर तो तसा खूप जुना आहे.
कोणी एक चिनी माणूस फार वर्षांपूर्वी प्रवास करताना एका ठिकाणी थांबला आणि जेवणासाठी पाणी गरम करत होता वरून काही पानं त्याच्या पाण्यात पडली आणि चहाचा जन्म झाला अशी आख्यायिका आपण ऐकली आहेच.
आपल्या भारतीय मंडळींना चहाची गोडी लावली ती गोऱ्या साहेबांनी, आज जशा नाक्यानाक्यावर चहाच्या टपऱ्या असतात त्याच पद्धतीने या गोऱ्या साहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जागोजागी चहा विकण्यास सुरवात केली होती. आज दिवस कसा जाईल हे सकाळच्या पहिल्याच्या चहाच्या चवीवर ठरवलं जातं.
भारतीयांचं आवडतं पेय बनलेल्या चहाला जगभरातून प्रचंड मागणी आहे. जसं साड्यांमध्ये बनारसी, येवला अशी घराणी आहेत तशी चहाची देखील आसामी, दार्जिलिंग केरळ अशी घराणी आहेत. नुकतंच आसाममधील एक चहाच्या प्रजातीची किंमत लाखो रुपयांना विकला गेला होता.
आजच्या जगात छोट्या गोष्टींपासून ते अगदी मोठ्या वस्तू घेण्यापर्यंत लोकांचा कल हा ब्रँडेड वस्तू घेण्याकडे असतो. मग चहाचा ब्रँड कसा मागे पडणार? येवले असो किंवा पुण्याचा अमृततुल्य, चहाचे हे ब्रँड लोकांच्या पसंतीस पडत आहे. कॉफी क्षेत्रातला दादा असलेला ब्रँड देखील आता चहा विकणार आहे,
स्टारबक्स आता चहा विकणार?
सामन्यांच्या आवाक्याबाहेरची आणि स्टेट्सवाल्या मंडळींची जीव की प्राण असलेली स्टारबक्सची कॉफी, स्टारबक्सच्या मगचा जरी फोटो कोणी सोशल मीडियावर टाकला की त्यावर उड्या मारणारे लोक आपल्याकडे आहेत. अशा या श्रीमंतांच्या कॉफी ब्रँडने अखेर भारतीय चहा विकण्याची घोषणा केली आहे.
जगभरात या ब्रॅण्डची अनेक स्टोर्स आहेत. अगदी अमेरिकेपासून ते यूरोपपर्यंत सगळीकडेच लोकांच्या पसंतीस हा ब्रँड उतरला आहे. मात्र भारतात फारसा प्रतिसाद न मिळाल्याने आता भारतीयांच्या पसंतीस उतरण्यासाठी ब्रँडने असा निर्णय घेतला आहे. तसेच फिल्टर कॉफी देखील चहासोबत लाँच करणार अशी माहिती मिळाली आहे.
टाटा स्टारबक्सचे भारतातले सीईओ सुशांत दास असं म्हणाले की या सर्व गोष्टी आम्ही आमच्या मेनूमध्ये समाविष्ट करत आहोत जेणेकरून आम्हाला मिळतील. मेनूमध्ये झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. त्याचबरोबरीने स्टारबक्सच्या मेनूमध्ये पनीर कुलचा आणि हळदी लाटे (हळद दूध) देखील समाविष्ट करणार आहोत असं त्यांनी पूढे सांगितलं.
–
- ७ कुकिंग टिप्स ज्या वाचवतील गॅस, घरातील सिलेंडर चालेल अनेक महिने
- हळदीपासून चहा- कॉफीपर्यंतचे डाग या एकाच गोष्टीने होतील काही मिनिटांत साफ
–
दास पुढे म्हणाले की सुरवातीला जे पदार्थ आम्ही लाँच करणार आहोत ते किफायतशीर दरात विकणार आहोत जेणेकरून मोठ्या प्रमाणावर आम्हाला ग्राहकवर्ग मिळू शकतो. ग्राहकांच्या पसंतीनुसार आम्ही मेनू तयार करीत आहोत यात आता किती यश मिळतं आहे ते कळेलच.
आज बाजारात असलेल्या कॉफी ब्रॅण्ड्सच्या तुलनेत स्टारबक्सचा दर्जा आणि किंमत जास्त आहे. २०१२ सालापासून स्टारबक्स भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. भारतात आज त्यांची २६८ पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.