निराशेतून बाहेर पडा फक्त ६० सेकंदात; हा मंत्र म्हणा आणि…, हार्वर्डचं संशोधन!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जीवन खूप सुंदर आहे, जर हे जीवन नेहमी हसतहसत व्यतीत करता आले असते तर किती छान झाले असते ना….. पण जीवन जेवढे सरळ-साधे भासते त्यापेक्षा ते खूप कठीण आहे, हे देखील सत्य आहे.
अर्थात जगणं कितीही खडतर असलं तरीही ते आनंदाने जगता आलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. ही कला अवगत होणं खरंच आवश्यक आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
पण प्रत्येकालाच ते जमत नाही. नेहमीच आनंदी राहणं हे नक्कीच खूप कठीण आहे. काही प्रसंगांमध्ये आपल्या भावना बदलणं अत्यंत स्वाभाविक आहे.
कित्येकदा तर आपल्या जीवनात असे प्रसंग येतात, जेव्हा आपण अतिशय घाबरतो.
उदा. हजारो लोकांसमोर गाणं गाणे असो किंवा प्रिय व्यक्तीला प्रपोज करणे असो. असे कित्येक प्रसंग आपल्या जीवनात येतात, जिथे आपल्याला शस्त्र टाकून द्यावेसे वाटते. आपल्या हृदयाची धडधड वाढते आणि आपल्याला घाम फुटतो.
अश्या परिस्थिती आपण स्वत:च स्वत:शी बोलून स्वत:लाच समजवायचा प्रयत्न करतो. पण आपण स्वत:च्या मनाला नेमकं काय समजावतो हे महत्वाचं आहे.
केवळ सेल्फ-टॉक करून चालत नाही. सेल्फ टॉक मध्ये काय विचार केला जातो – ह्यावरून त्याची परिणामकारकता ठरत असते.
आज आम्ही तुम्हाला अश्या परिस्थितीमध्ये स्वत:च स्वत:शी बोलताना वापरायचे ३ शब्द सांगणार आहोत. ते तीन शब्द म्हणजे –
‘I Am Excited (आय एम एक्ससाइटेड)
हे तीन शब्द तुम्हाला नवीन एनर्जी देतील. तुमच्यामध्ये एक नवीन विश्वास निर्माण होईल. काय म्हणता? विश्वास बसत नाही..? अहो हे अगदी खरं आहे आणि त्याला पुरावा देखील आहे.
हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये या संदर्भात एक संशोधन करण्यात आले आणि सदर संशोधनाचा निष्कर्ष Experimental Psychology मध्ये देखील प्रकाशित करण्यात आलेला आहे हे विशेष!
संशोधनामध्ये संशोधकांना असे आढळून आले की,
तणावपूर्ण स्थितीमध्ये फक्त चिंता कमी करण्यावर भर न देता, सकारात्मक विचार करणे आणि दु:खी न होणे आपल्यात फार मोठा बदल घडवून आणते. यामुळे चिंता तर कमी होतेच सोबत मनावर कोणतेही दडपण राहत नाही, मन प्रसन्न होते.
—
हे ही वाचा – मेंदूवर सतत येणारा ताण कमी करायचा असेल तर या १० अफलातून ट्रिक्स ट्राय करून पहाच!
—
असे म्हणतात की,
चिंता आणि उत्सुकता या दोन्ही भावनांचा शारीरिक अनुभव एकसारखाच असतो. त्यामुळे आपली चिंता उत्सुकतेमध्ये सहज परावर्तीत होते.
यापूर्वी हार्वर्ड विद्यापीठामध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, चिंता हळूहळू कमी होणे, आपल्याला पुन्हा नव्याने त्या कामासाठी प्रेरित करण्यास कारणीभूत ठरते.
त्यातून नवचैतन्य जागृत होते. या ऊर्जेचा उपयोग केवळ कार्यक्षमता वाढवण्यासाठी न करता, स्वत:मध्ये बदल घडविण्यासाठी केल्यास आपण कठीण प्रसंगात मनावर आणि भीतीवर सहज ताबा मिळवू शकतो.
आणि उपरोक्त संशोधन म्हणते की, हे सर्व होऊ शकते केवळ ‘I Am Excited’ या तीन शब्दांसह!
तुम्ही तुमच्या भीतीदायक आणि चिंताग्रस्त भावनेला Positive Anticipation मध्ये बदलू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला स्वतःशी मोठ्या आवाजात ६० सेकंदापर्यंत I Am Excited हे तीन शब्द सारखे म्हणत राहायचेत.
How are you? या साध्या प्रश्नाला नुसतंच ‘फाईन’ असं उत्तर देण्याऐवजी I am GREAT असं उत्तर द्यावं असं अनेकजण सांगतात. याने खरंच खूप फरक पडतो असंही काही जणांचं म्हणणं असतं.
इथे “I Am Excited” या शब्दांबद्दल तर संशोधन झालेलं आहे. म्हणजेच, हा मंत्र ‘फुल प्रूफ’ आहे असं म्हणूयात.. म्हणजे याचा फायदा होणार हे नक्की…
चला तर मग,
सुरु करा मग या तणावमुक्त करणाऱ्या मंत्राचे पारायण!!!!
हे ही वाचा – मानसशास्त्राने सिद्ध केलेल्या या “२१ गोष्टी”; स्वतःकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकतील
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.