विराट कोहली संपला नाही! तो पुन्हा येणार…नक्कीच येणार!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : ईशान पांडुरंग घमंडे
===
गेले काही दिवस (किंवा कदाचित काही महिने) ‘विराट कोहली संपला’ अशी चर्चा सुरु झाली आहे. कुठलाही महान खेळाडू असा फ्लॉप होऊ लागला, की या अशा चर्चांना ऊत येतोच. चाहते विरुद्ध द्वेष्टे असा एक लढा सुरु होतो. खेळाडूला याच्याशी काहीही सोयरसुतक नसतं. कारण शेवटी बॅड पॅचला त्यालाच सामोरं जायचं असतं.
या अशा गोष्टींविषयी बोलताना ‘फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज पर्मनंट’ हा डायलॉग मारल्याशिवाय राहवतच नाही. आय नो, लाईन खूप क्लिशे आहे, पण जे सत्य आहे ते आहेच. ते तुम्ही बदलू शकत नाही. विराट कोहली हा ‘क्लास अपार्ट’च आहे.
परवा रोहितने त्याच्याविषयी मांडलेलं मत आपल्याला जाम आवडलं राव; “फॉर्म उपर नीचे होता हैं, प्लेअर का क्वालिटी कभी खराब नहीं होता.” विराट असाच खेळाडू आहे. दमदार, शानदार, आणि सहजासहजी न संपणारा…
थोडक्यात सांगायचं झालं, तर ‘ही स्टील हॅज अ लॉट ऑफ क्रिकेट लेफ्ट. ही विल मेक अ ह्यूज कमबॅक… ही विल सून…!!!’ त्यामुळे चिंता बिलकुल नसावी.
आता राहिला प्रश्न हा, की तो टी-२० च्या संघात सध्या बसत नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर कदाचित ‘होय’ असं असू शकतं. नुकतीच सूर्या म्हणजेच सूर्यकुमार यादवची इनिंग पाहिली, किंवा दीपक हुड्डा सारखा नवा खेळाडू आणि त्याची झकास कामगिरी पाहिली, तर ते पाहता कदाचित विराट सध्याच्या अंतिम ११ जणांच्या खेळाडूंमध्ये बसत नसेलही, (कदाचित म्हणालो कारण, रोहित तसं म्हणत नाहीये.) मात्र याचा अर्थ तो संपला असा अजिबात होत नाही. पुजारा संपला असं अनेकांना वाटलं होतं.
अगदी मलाही वाटलं होतं. पण त्याने खणखणीत पुनरागमन करून दाखवलं. इंग्लिश काउंटी क्रिकेट खेळत, तिथे धावांची टाकसाळ उघडली. सलग २-३ शतकं हाणली आणि संघात परत आला. संघाबाहेरच निवृत्ती घ्यायची वेळ त्याच्यावर येईल असंही अनेकांना वाटलं असेल. त्यानंतरच त्याने दमदार खेळी केली.
इथं विराटला तर अजून संघाबाहेर सुद्धा केलं नाहीये, आणि तरीही चर्चा काय तर म्हणे तो संपला. विराट हा असा खेळाडू आहे, ज्याने आजही एक शतक ठोकलं, की त्यानंतर तो शतकांची लडी लावेल. ही गोष्ट खरी आहे, की आधी वाटत होतं त्याप्रमाणे सचिनचे अनेक विक्रम अगदी सहज तोडणं आता त्याच्यासाठी सोपं राहिलेलं नाही. मात्र याचाही अर्थ, तो संपला असा मुळीच होत नाही.
सचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता. (विराट सुद्धा ७०-८० धावा करतोय बरं अधूनमधून… आकडेवारी असंच सांगते.)
सचिनने टेनिस एल्बोसारख्या आजारातून पुनरागमन केलंय. विराट आणि फिटनेस यांचं नातं तर निराळंच आहे. म्हणेज तिथे बाजू भक्कम आहे. मग त्यानंतर प्रश्न येतो कॉन्फिडन्सचा… तर तिसऱ्या टी-२० सामन्यात ११ धावा करताना त्याने हाणलेला चौकार आणि विशेषतः षट्कार अगदीच खणखणीत होता.
त्याचा आत्मविश्वास खूपच डळमळीत झाला आहे, असं ते फटके पाहताना वाटलं तरी नाही. म्हणजे इथेही बाजू भक्कमच आहे. हे असं खराब फॉर्मात असणं मोठ्या खेळाडूंसाठी सामान्य बाब ठरू शकतं. धोनीविषयी सुद्धा तो संपला असल्याच्या चर्चा झाल्या. पण तो सतत परत येतच राहिला.
—
- कर्णधारपदाबद्दल अचानक निर्णय; जेव्हा या ६ कर्णधारांनी तडकाफडकी पद सोडले…
- विराट कोहली पितो ‘काळं पाणी’; सातासमुद्रापलीकडून येणाऱ्या पाण्यात काय आहे खास?
—
कधी थांबायचं, कधी संपलोय हे त्याला ठाऊक होतं. तेव्हा तो थांबला. विराटच्या बाबतीत सुद्धा असंच वाटतं. तो संपलाय असं जोवर त्याला वाटत नाही, तोवर तो संपला नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी विधानभवनात मारलेला डायलॉग, आज विराटच्या बाबतीत अगदी परफेक्ट वाटतोय. “मेरा पानी उतरता देख, किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ, लौटके वापिस आऊंगा।”
त्यामुळे किंग कोहली मोठा धमाका करणार… जस्ट वेट अँड वॉच…!!!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.