' क्रूर, वेडा, तरीही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘जोकर’ बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी! – InMarathi

क्रूर, वेडा, तरीही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘जोकर’ बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगभरात बॅटमॅनचे फॅन आहेत आणि त्यापैकीच तुम्ही देखील एक असाल यात शंका नाही. फॅन आहात म्हटल्यावर बॅटमॅनचे सर्वच पिक्चर तुम्ही बघितले असणार, व त्यातील बॅटमॅन- द डार्क क्नाईट हा चित्रपट तर तुमच्या फेव्हरेट लिस्ट मध्ये नक्कीच असणार.

हा चित्रपट पाहताना बॅटमॅनच्या सर्वच चाहत्यांप्रमाणे तुम्ही देखील गोंधळात पडला असाल की मला आता बॅटमॅन आवडतो की चित्रपटातील व्हिलन जोकर???

हा चित्रपट आहेच असा कि ज्यात हिरो बॅटमॅन पेक्षा व्हिलन जोकर खूप भाव खाऊन जातो. आजवरच्या चित्रपट इतिहासातील सर्वात नावाजला गेलेला आणि सर्वांचाच लाडका व्हिलन म्हणून जोकरने प्रसिद्धी मिळवली. आज याच जोकरबद्दल आम्ही सहसा कोणाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

joker-marathipizza01
knowthyself.forumotion.net

 

१. जोकरचे खरे नाव हे ‘जॅक नेपियर’ (चित्रपटातील पात्राचे खरे नाव) असे आहे आणि ज्याने हे पात्र रंगवले तो म्हणजे हेथ लेड्जर!

 

२. जोकरला मृत शरीरांशी बोलण्याची किळसवाणी सवय आहे. हो, तो मृतदेहाशी संवाद साधतो. जर तुम्ही जोकरचे कॉमिक्स वाचलेत तर त्याची ही सवय तुमच्या लगेच लक्षात येईल.

 

३. बॅटमॅनच्या अॅनिमेटेड सिरीजमध्ये जोकरला आवाज मार्क हॅमिलने दिला आहे. (जो ‘स्टार वॉर्स’ मधील ल्यूक स्कायवॉकर म्हणून ओळखला जातो.)

joker-marathipizza02
batman.wikia.com

४. जोकरला हे ठावूक असते की, ब्रूस वेन हाच बॅटमॅन आहे तरी जोकरला त्याची ओळख उघड करण्यात काहीच रस नव्हता, कारण त्याचे ध्येयच वेगळे होते.

 

५. १९७७ मध्ये आलेल्या ’द अॅडव्हेन्चर ऑफ बॅटमॅन’ मध्ये जोकरने पदार्पण केल होते. यामध्ये जोकरचा आवाज लेन्नी वेन्रीब दिला आहे. त्यांनी स्कूबी डू मध्ये स्क्रॅप्प्य डू या पात्रासाठी सुद्धा आवाज दिला होता.

 

६. ‘बॅटमॅन : द किलिंग जोक’ या अॅलन मुरे यांच्या कॉमिक्समधील जोकरचे पात्र आणि हेथ लेड्जर याने  बॅटमॅन- द डार्क क्नाईट या चित्रपटात साकारलेले पात्र यांच्यात खूप साम्य आहे.

joker-marathipizza03
screenrant.com

७. कॉमिक्स बुक्स नुसार जोकरची स्माईल ही फ्रोझन आहे. त्याचा चेहरा नेहमी हसराच असतो आणि तसाच राहणार. बऱ्याचदा आपल्याला वाटते की तो खोटे खोटे हसतो आहे, पण तसे नसून ती त्याची खरी स्माईल आहे. त्याने चेहऱ्यावर कितीही वेगवेगेळे भाव आणण्याचा प्रयत्न आणला तरी तो हसत आहे असेच वाटणार.

 

८. जोकरने बॅटमॅनचा जोडीदार रॉबीन याला १९८९ मधील प्रसिद्ध आवृत्ती ‘द डेथ फॅमिली’ मध्ये ठार मारले आहे.

 

९. जोकर हा स्कूबी डू च्या दोन चित्रपटांमध्ये दिसला आहे. ‘द डायनामिक स्कूबी डू अफेअर’ (The Dynamic Scooby Doo Affair) आणि ‘द कॅप्ड क्रुस्डेर केपर’(The Caped Crusader Caper).

joker-marathipizza04
mediashock.blog.hu

१०. जेव्हा जोकर हे पात्र पहिल्यांदा तयार करण्यात आले तेव्हा तो अतिशय पूर्वी बुद्धिमान, सुशिक्षित असा रंगवण्यात आला होता. त्याला रसायनशास्त्र आणि विज्ञान याबद्दल चांगले ज्ञान आहे असे दाखवण्यात आले होते, परंतु १९७० च्या दशकापासून जोकरच्या भूमिकेमध्ये बदल करण्यात आला आणि तेव्हापासून त्याला वेडा, क्रूर असे दाखवण्यात येते.

व्हाय सो सिरीयस..? आवडलं असेल तर आर्टिकल शेअर करा की!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?