आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय राजकारण हे अनेक रंगी, अनेक पदरी आहे. हे जितके खरे आहे तितकेच ते स्वबळावर पुढे आलेल्यांना संधी देणारे देखील आहे. इतर क्षेत्रातल्या सारखी या क्षेत्रातही नेपोटीजम, घराणेशाही जरी असली तरी अजूनही या देशात एक चहावाला पंतप्रधान बनू शकतो किंवा एक रिक्षावाला एका राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो आणि एक दूधवाला देशाचा रेल्वेमंत्री बनून घाट्यात गेलेल्या रेल्वेखात्याला चक्क नफ्यात आणू शकतो…
आठवलं का काही? बरोबर तेच ते चारा प्रकरणी ट्रोल होवून बंदिवासात गेलेले, तैलबुद्धीचे, विनोदाची डूब देत विरोधकांवर हल्लाबोल करणारे, एकेकाळी बिहारचे सर्वेसर्वा असणारे ‘श्रीमान लालूप्रसाद यादव.’ भारतीय राजकारणातील एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व.
तसं पाहायला गेलं, तर भारतीय राजकारण हे अनेक रंगी, अनेक पदरी आहे. नानाविध विचारधारेचे लोक एकत्र येवून इथे सर्व-सामान्य जनतेचे भवितव्य ठरवताना दिसतात. यामध्ये देखील काहीच लोक आपला वरचष्मा ठेवण्यात यशस्वी होतात. लालूप्रसाद यादव हे त्यापैकी एक आहेत.
बिहारमधील एका गावातून आलेले लालू प्रसाद यादव देशाच्या राजकारणाचा ‘चमकता तारा’ बनण्याची कहाणी खरोखर एखाद्या चमत्कारासारखी आहे. त्यांच्या या प्रवासाचा बराच काळ संघर्षात गेला, पण भरपूर यशही त्यांनी मिळवले.
लालू यादव महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकीय पटलावर मातब्बर होते. राजकीय खेळीमुळे लालू यादव मुख्यमंत्रीपदावरून रेल्वे मंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले. मात्र या राजकीय प्रवासात त्यांच्या प्रतिमेवर जे डाग पडले. जे आजतागायत धुतले गेले नाहीत.
काही असो पण प्रेमात आणि राजकारणात सारेकाही क्षम्य असते असे म्हणतात ते यासाठीच की जर एखाद्या कृतीने अनेकांचे कल्याण होणार असेल तर काही निर्णयांची जबाबदारी घेण्यासाठी जो खरा नेता असतो तो कधीच मागे हटत नाही.
सांगायचा मुद्दा हा, की लालूप्रसाद यादव हे बिहारी जनतेचे खरे हीरो आहेत, पण मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का, की त्यांचं नाव ‘लालूप्रसाद’ कसं पडलं? नाही ना?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
तो ही एक किस्सा आहे. लालूंबद्दलचे अनेक किस्से त्यांच्यासारखेच फेमस आहेत. लालू प्रसाद यांचा जीवन प्रवास चढ-उतार, यश आणि अपयशांनी भरलेला आहे, ज्यामध्ये त्यांना खूप प्रेम मिळाले आहे आणि त्यांच्यावर तीव्र टीकाही झाली आहे.
लालू प्रसाद यांनी त्यांच्या ‘गोपालगंज ते रायसीना’ या चरित्रात लिहिले आहे, की माझ्या आयुष्याची सुरुवात अत्यंत संयमी पद्धतीने झाली. माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट इतकी सामान्य होती की त्यापेक्षा सामान्य काहीही असू शकत नाही.
लालू प्रसाद यांचा जन्म ११ जून रोजी बिहारमधील गोपालगंजमधील फुलवारिया गावात झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. लालू आई मरिचियादेवी सोबत घरोघरी जाऊन दूध वाटायचे. यातून वाचलेल्या वेळेत ते गावच्या शाळेत शिकायला जायचे.
कुंदन राय, त्यांचे वडील पेशाने गवळी (दूधवाला) होते. गावातच शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लालू प्रसाद यादव पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी १९६६ साली पाटण्याला आपल्या मोठ्या भावासोबत शिक्षण घेण्यासाठी आले होते.
लालूंचा मोठा भाऊ बिहार पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करायचा. बीए करण्यासाठी लालू प्रसाद यांनी पटनाच्या बीएन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच लालूंचा विद्यार्थी राजकारणात रस वाढू लागला. मग काय, गावात घरोघरी दूध वाटणारे लालूप्रसाद आता हजारो लोकांसमोर उभे राहून भाषण करू लागले.
आधी विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक ते हरले, पण हरतील ते लालूप्रसाद कसले? त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा नवीन प्रवेश घेतला.
वर्ष उलटल्यानंतर लालू पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. मास्टर इन पोलिटिकल सायन्स आणि एल.एल.बी. झालेले लालू पुर्णपणे राजकारणाकडे झुकले होते. लालूप्रसाद यांचे हे वागणे कुटुंबीयांना आवडले नाही. लालूंच्या राजकारणातील वाढत्या सक्रियतेमुळे निराश होऊन त्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. १ जून १९७३ रोजी लालू प्रसाद यांचा राबडी देवीसोबत विवाह झाला.
राजकारणात सक्रिय राहण्याचा निश्चय केलेल्या लालूंनी चळवळ, आंदोलने यातून आपला ठसा उंटवायला सुरवात केली होती. जे.पी. अर्थात जयप्रकाश नारायण यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. आणीबाणीनंतर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लालूप्रसाद छपरा येथून विजयी झाले.
वयाच्या २९ व्या वर्षी ते संसदेत पोहोचणारे भारतातील सर्वात तरुण खासदार ठरले. लालूप्रसाद यांनी त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. बिहारच्या राजकारणात आणि पक्षात त्यांचा दर्जा वाढत गेला. त्याचाच परिणाम असा झाला की ते बिहारचे मुख्यमंत्रीही झाले.
सीएम झाल्यानंतर ते ‘नायक’ चित्रपटाच्या कथेसारखे दबंग मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झाले. स्वत: दारूच्या ठेक्यावर छापे मारून न्यायासाठी आवाज उठवताना दिसले. त्यांची शैली केवळ बिहारच्याच नव्हे तर देशातील जनतेलाही आवडली आणि बिहार सोडल्यानंतर ते देशाच्या राजकारणाचे केंद्र बनले.
लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री झाल्यानंतरही चपरासी क्वार्टरमध्येच रहात होते. खरे तर ते गरीब शेतकरी कुटुंबातील होते. त्याचे वडील शेतकरी आणि भाऊ शिपाई म्हणून काम करायचे.
लालूप्रसाद यादवही आपल्या भावासोबत त्यांच्या क्वार्टर मध्ये राहू लागले. त्याच वेळी, जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ते सुमारे चार महिने त्याच शिपायाच्या क्वार्टरमध्ये राहत होते.
केंद्रीय रेल्वेमंत्री असताना लालू यांनी डबघाईला आलेल्या रेल्वेला नफ्यात आणून एक ‘करिश्मा’ करून दाखवला होता.
लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती याही राजकारणात आहेत. ते राज्यसभेचे सदस्यही आहेत. हे जाणून आश्चर्य वाटेल की लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मुलीचे नाव इंदिरा गांधींच्या काळात ‘मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट (MISA)’ मंजूर केल्यावर ठेवले होते.
मिसा यांचा जन्म झाला तेव्हा देशात आणीबाणी होती आणि लालूप्रसाद यादव यांच्यासह सर्व बड्या नेत्यांना मिसा अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याचवेळी मुलगी झाली तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी मुलीचे नाव मीसा ठेवले.
अशा हजरजबाबी आणि चतुर लालूप्रसाद यांचे नाव लालू कसे पडले याचाही किस्स प्रसिद्ध आहे. लालू प्रसाद यादव यांचे नाव लालू कसे पडले हे कदाचित फार कमी लोकांना माहित असेल, हा किस्सा सांगताना त्यांची बहीण गंगोत्री देवी यांनी सांगितले.
लालू आमच्या भावांमध्ये सर्वात लहान असल्याचे गंगोत्री देवी म्हणाल्या होत्या. त्याच वेळी, तो लहानपणापासून खूप गोरा आणि गुबगुबीत होता. यामुळे त्यांचे वडील कुंदन राय यांनी त्यांचे नाव ‘लालू’ ठेवले.
—
- राजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते हे ‘१० नेते’ काय करायचे माहित आहे?
- लालू प्रसाद फ्लर्ट करत पाकिस्तानी अँकरला चक्क “आती क्या घुमने?” म्हणाले होते…
—
लालूंचा मुलगा तेजस्वी यादव हा आयपीएल खेळलेला क्रिकेट प्लेयर आहे, तर पत्नी माजी मुख्यमंत्री. सुरुवातीला दबंग म्हणून प्रसिद्ध असलेला हा नेता चारा घोटाळ्यात अडकला आणि त्याच्या चढत्या कमानीला लगाम लागला.
प्रचंड मोठे आर्थिक नुकसान आणि बंदिवास वाट्याला आला. मित्रांनो शेवटी चढता सूर्य कधीतरी अस्ताला जातो. भलेही लालूप्रसाद यांचे राजकीय जीवन संपले असेल, पण असा हरहुन्नरी नेता नक्कीच दुर्मिळ पठडीतला आहे हे तुम्ही मान्य करालच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.