२ किंवा ४ नाही, १३०६ पाय असणाऱ्या जगातल्या पहिल्या प्राण्याबद्दलच्या थक्क करणाऱ्या गोष्टी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पृथ्वीवर जेव्हापासून जीवसृष्टीची निर्मिती झाली आहे तेव्हापासून ते आजतागयत पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीवजंतू, पक्षी आणि प्राणी अस्तित्वात आले आहेत. यात काहींनी तर हजारो वर्षांनंतरही आपले अस्तित्वात टिकवून ठेवले आहेत तर काहींचे अस्तित्व काही वर्षातचं संपले आहेत.
अशातच अजुनही आपल्या पृथ्वीवर वेळोवेळी नवनवीन जीवजंतूचा शोध घेणे सुरुच असते. काही दिवसांपूर्वी असाच एक विचित्र जीव सापडला आहे. ज्याला एक नाही, दोन नाही तर तब्बल १३०० पाय आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
शास्त्रज्ञांच्या हाती लागलेला हा जीव एक गोचर असून १३०० पायांद्वारे चालणारा हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच जीव असल्याचे मानले जात आहे.
याआधी सर्वात जास्त पाय असणाऱ्या जीवमध्ये ७५० पाय मोजले गेले होते, पण आता सापडलेल्या जीवाला एकूण १३०६ पाय असल्याचे समोर आले आहे. या हजार पाय असलेल्या जीवाबद्दल संपूर्ण माहीती आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एक हजारपेक्षा जास्त पाय असणाऱ्या जीवाला मिलिपिड असे म्हटले जाते. कीटकशास्त्रज्ञ म्हणतात, की आजपर्यंत हजारो पाय असलेले एकही मिलिपीड सापडलेले नाहीये. फारफार तर १०० पाय असलेले गोचर सापडतात आणि या १००च्या घरात पाय असणाऱ्या गोचरांना सेंटीपीड्स असे म्हटले जाते.
याआधी ७५० पाय असलेले मिलिपीड मिळाले होते. ज्याचे नाव Elecme Planipes आहे आणि हे नाव त्याला प्लॅनिस या प्रदेशाचे नावावरुन देण्यात आले होते. ती पहिल्यांदा १९८० मध्ये दिसली होती.
आता सगळ्यात जास्त पाय असण्याचे विक्रम या १३०६ पाय असणाऱ्या मिलिपीडकडे आले आहे, ज्याचे नाव युमिलिप्स पर्सेफोन असे ठेवण्यात आले आहे. हा जीव जमीनीखाली तब्बल २०० फुट खाली राहतो. याचे जीवनमान साधारणपणे ८-१५ वर्ष असल्याचे मानले जात आहे.
या प्राण्याचा रंग हलका पिवळा आहे, याचे डोळे कुठे असतात हे अजूनही सापडले नाहीये, परंतु ते संरचनेत लांब धाग्यासारखे आहे, असे मानले जात आहे. युमिलेप्स पर्सेफोनच्या डोक्यावर आइसक्रीम कोन सारखे अनेक अँटेना आहेत, जे त्याला अंधारात चालण्यास मदत करतात.
हा जीव बुरशी खाऊन जगतो. कीटकशास्त्रज्ञ म्हणतात, की या प्राण्याचे पाय मोजणे देखील सोपे नाही, कारण तो स्वतःला गोलाकार गुंडाळतो. तसेच मिलिपीड्सची प्रजाती ही हळूहळू विकसित होणारी जीव आहे, असेही ते म्हणाले.
हा १३०६ पाय असलेला दुर्मिळ जीव ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना सापडला होता. पृथ्वीच्या २०० फूट खाली एका खानीचे काम सुरु असतांना याचा शोध लागला आहे. याची लांबी एकूण ९५.६ मिलीमीटर आहे आणि ते USB केबलसारखे पातळ आहे.
तज्ज्ञांनी या प्राण्याचे नाव Eumileps persephone असे ठेवले आहे. ही प्रजाती ४०० दशलक्ष वर्षांपूर्वी पासून पृथ्वीवर राहत असल्याचे मानले जात आहे.
शोध मोहिमेदरम्यान, वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना दोन मादी आणि दोन नर मिलिपीड सापडले होते. मादी मिलीपीडच्या पायांची संख्या १३०६ आणि ९९८ होती. नर मिलिपेड्सला ८१८ आणि ७८७ पाय होते. सध्या पृथ्वीवर या प्रजातींची संख्या १३,००० च्या वर आहे.
आपल्याला प्रश्न पडत असेल, की या ला एवढे पाय कशासाठी असतात तर त्याचे उत्तर म्हणजे पर्सेफोन अशा जगात राहतो जिथे प्रकाश पोहोचत नाही तसेच पुरेसे अन्न देखील नसते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर या प्राण्याला पृथ्वीखाली जगायचे असेल तर त्याला इतके पाय असणे आवश्यक आहे. याची लांबी आणि अनेक लहान-लहान पायामुळे हिची हालचाल सोपे आणि लवचिक होते. तसेच पृथ्वीखाली अन्नाची कमतरता असल्याकारणाने त्यांच्या शरीराच्या इतर अवयवांचा विकास होऊ शकत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.