आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
असं म्हणतात की ,बायकांची पर्स म्हणजे अलिबाबाची गुहा असते. हौसे-मौजे पासून ते अडीअडचणीला लागणाऱ्या सर्व वस्तू त्यात हमखास सापडतात. आणि यात गंमत म्हणजे अगदी उच्च पदावरील स्त्री पासून ते गरीबातल्या गरिब स्त्रीच्या पर्समध्ये हमखास आढळणारी गोष्ट म्हणजे सेफ्टी पिन.
तसं पाहिलं तर बोटभर उंचीची देखील ही नसते.पण इतकी महत्वपूर्ण असते की ,बायका ड्रेसपासून ते चप्पल दुरुस्तीपर्यत असंख्य गोष्टीसाठी या पिनेचा वापर करतात. सेफ्टी पिनेचे पाकीट नाही अशी स्त्री सापडण कठीणच आहे. ही पिन इतकी प्रिय असते की, काही बायका सहज नि वेळेत मिळावी म्हणून आपल्या चेन किंवा मंगळसूत्रात किंवा आपल्या बांगड्यांमध्ये अडकवून ठेवतात.
विशेष म्हणजे ओळखीची-पाळखीची कुठल्याही स्त्रीला हिची गरज लागली, तर या बायका अगदी आनंदाने दुसरीला पिन देतात. त्यावेळी खूप कृतकुत्य झाल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो. तर अशा या बहुगुणी सेफ्टी पिनेचा शोध कोणी लावला. हे बहुसंख्य महिलांना माहित नसेल. तर आज जाणून घेऊया या सेफ्टी पिनेच्या शोधविषयी.
शोध कसा लागला?
अमेरिकेत १८४९ च्या सुमारास वॉलटर हंट नावाचा एक अविष्कारी माणूस रहात होता. अविष्कारी यासाठी की अनेक छोट्या छोट्या परंतु महत्वपूर्ण गोष्टी तयार करण्यात त्याचा हातखंडा होता. जसे पेन,चाकू ,चाकुची धार करण्यासाठी यंत्र अशा अनेक गोष्टी त्याने तयार केल्या होत्या. इतकंच काय तर पहिले शिवण यंत्र देखील त्यानेच तयार केले असे म्हटले जाते .
एकदा वॉलटरची बायको काही कामानिमित्त बाहेर जात होती. आणि अचानकपणे तिच्या ड्रेसचे मागचे बटण तुटले. आता काय करायचे? असा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला. तेव्हा वॉलटरने एक तार घेऊन त्याची गुंफण तयार केली. आणि ती बटणाच्या जागेवर जोडली. आपल्या बायकोची अडचण सोडविली. त्याची ही कल्पना बायकोला तर आवडली. पण त्याला स्वत:ला देखील त्याचा हा अविष्कार आवडला. त्यावेळी ड्रेस पिन म्हणून ही गोष्ट प्रसिध्द झाली होती.
पुढे कालांतराने ही तार लागून जखम होऊ नये म्हणून त्यावर टोपी बसविण्यात आली आणि ती सेफ्टी पिन म्हणून ओळखली जाऊ लागली. या पिनेचे पेटंट तयार करून त्याने ते विकले आणि मिळालेल्या पैशातून तो कर्जमुक्त झाला.
जसजसा काळ बदलला तरी या पिनेचे महत्व काही कमी झालं नाही .उलट ते वाढतच गेलं, इतकं की आज जगभरातील स्त्रियांच्या पर्समधील ती महत्वाची आणि मानाची गोष्ट बनली आहे.
पुढे अनेक कंपन्यांनी याचा ढाचा मात्र तोच ठेवला, पण काही रंगीत पिना तयार केल्या. जेणेकरून त्या त्या ड्रेसला त्या मॅचिंग होतील. यातही गंमत अशी आहे की, कितीही फॅशनेबल पिना बाजारात आल्या तरीही नेहमीच्या स्टीलच्या रंगातील पिनांना बायकांची अधिक पसंती असते.
आज साडी ,ड्रेससाठी नाही तर गजरा घालण्यासाठी ,अचानकपणे तुटलेली चप्पल जोडण्यासाठी तुटलेला पट्टा किंवा बेल्ट जोडण्यासाठी, विविध प्रकारच्या हॅक्समध्ये या छोट्या बहुगुणी पिनेचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो.
–
गृहिणींसाठी अत्यंत फायद्याचं! हे १५ कोर्सेस तुम्हाला घरबसल्या भरघोस उत्पन्न मिळवून देतील!
ऋतू कोणताही असो, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते?
–
अगदी सोशल मिडीयावरील एखाद्या चॅनेलवर नुसतं सेफ्टी पिन हॅक्स असे टाइप केले तरी ,या पिनेचा वापर काय काय करण्यासाठी केला जातो. हे तुमच्या अगदी सहज लक्षात येईल. जाता जाता आता कधी सेफ्टी पिन वापराल तर वॉलटर हंट यांचे मनोमन आभार मानायला विसरू नका.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.