' भारतातल्या या घाटात गेल्यावर तुमचं वय एकदम २ वर्षाने वाढतं…! – InMarathi

भारतातल्या या घाटात गेल्यावर तुमचं वय एकदम २ वर्षाने वाढतं…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टाईम ट्रॅव्हल ही गोष्ट आपण बऱ्याच इंग्रजी सिनेमात पाहिली आहे. भारतातसुद्धा या विषयावर बनलेली JL50 ही सिरिज चांगलीच लोकप्रिय झाली. एकंदरच या विषयी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कुतूहल आहे, आणि प्रत्येकजण याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो.

आता तुम्ही म्हणाल की चित्रपट किंवा गोष्टीत वाचतो तसं ‘टाईम मशीन’ किंवा ‘टाईम ट्रॅव्हल’ करणं खरंच शक्य आहे का? अजूनही याबाबत असं ठोस उत्तर मिळालेलं नसून टाईम ट्रॅव्हलवर कित्येक तज्ञांचा अभ्यास सुरू आहे. पण तुम्हाला माहितीये का असाच टाईम ट्रॅव्हलचा अनुभव भारतातल्या एका ठिकाणी गेल्यावर येतो.

 

time travel IM

 

भारतातल्या या ठिकाणी गेल्यावर चक्क तारीख बदलते म्हणे. ही नेमकी भानगड काय आहे तेच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत!

तुम्ही आपल्या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुमची घड्याळ एकच वेळच सांगेल किंवा फरक असला तरी सेकंदाचा असेल. पण आपल्याच देशात एक असा भाग आहे जिथे पोहोचताच चक्क टाइम झोन बदलतो.

आज आपण झारखंडमधील रांची-जमशेदपूर रोडच्या तैमारा व्हॅलीबद्दल जाणून घेणार आहोत.  या गूढ जागेची सध्या जगभरात चर्चा होत आहे. पाहुयात चक्क टाईम झोन  बदलणाऱ्या व्हॅलीविषयी आणि त्यामागचं रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करूया!

भारतातील रांची मधून जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला हा नक्कीच या जागेचा थरार अनुभवता येईल. रांची-जमशेदपूर रस्त्यावरून जाताना तैमारा दरी ओलांडून पुढे गेलात की तुम्ही तब्बल दीड वर्षं पुढे जाता. या भागात अचानक मोबाईलचे टाईम झोनही बदलतात आणि ते एवढे बदलतात की २०२२ ऐवजी तुम्ही थेट २०२४  मध्ये पोहोचता.

 

taimara ghati IM

 

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला तैमारा व्हॅलीचा हा परिसर सर्वांच्याच मनाला भुरळ घालत असला तरी अलिकडच्या काळात रामपूर ते तैमारा व्हॅलीपर्यंतचा परिसर हा याच गूढ रहस्यासाठी चर्चेत असतो.

इथून प्रवास करणारा माणूस काही काळासाठी म्हणजे एक किंवा दोन मिनिटांसाठी नाही तर चक्क दीड-दोन वर्षांसाठी जातो.

तैमारा व्हॅलीमध्ये मंदिरात राहणारा एक पुजारी सांगतो की, इथे कुठल्यातरी दैवी शक्तीचा वास असावा, त्यामुळे ही अशी परिस्थिती इथे दिसतेय. इथे मोबाईलच्या टाईम झोनसोबतच काही वेळा वाहनांचे दिवेही बंद होतात.

मात्र, काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येथे नक्कीच काही चुंबकीय किरणोत्सर्ग आहे ज्याचा परिणाम मोबाईलवर होत असून हे गूढ उकलण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

रांची-जमशेदपूर मार्गावर प्रवास करताना टाईम झोनमध्ये कमालीचा फरक पडत असल्याने वेळेबाबत मोठी अडचण होत असल्याचे तिथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. आपोआप मोबाईलवरही काळ बदलतो. लॉकडाऊनच्या वेळी तिथल्या मोबाइलवर २०२३ दिसत होते.

 

time zone IM

शाळांच्या हजेरीमध्ये समस्या :

तैमारा खोऱ्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीमध्ये खूप समस्या येत आहेत.

बायोमेट्रिकच्या माध्यमातून हजेरी लावली जाते तेव्हा ते २०२३ किंवा २०२४ साल उजाडले असते. त्यामुळे शाळेतील कर्मचाऱ्यांनी वैतागून आता हजेरीसाठी रजिस्टर तयार केले आले आहे.

कंपास सुई देखील आपली दिशा बदलते :

इथे गेल्यावर कंपासच्या सुईची दिशादेखील बदलते. अनेक पर्यावरण तज्ञांनी आपल्या मोबाईल फोनद्वारे चुंबकीय परिणाम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोबाईल फोनच्या कंपास जवळ चुंबक हलवला जातो आणि तो डावीकडे आणि उजवीकडे हलविला जातो हे दाखवून त्याने ते केले. मात्र कंपास सुईची दिशा पूर्णपणे भलतीच दिशा दाखवते हे दिसून आलं आहे!

 

compass IM

 

आपल्या भारतातील या गूढरम्य जागेला भेट देऊन तेथील या बदलाचे वैज्ञानिक कारणाचा शोध आपल्या वैज्ञानिकांनी घेतला पाहिजे.

अंधश्रद्धा आणि चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यापेक्षा ‘सायंटिफिक अँगल’ लोकांना गवसला तर निर्माण होणारे गैरसमज नक्कीच कमी होतील. थोडक्यात काय तर दैवी शक्तीचा वास असलेली जागा लवकरचं वैज्ञानिक कारणांनी ओळखली जावी हीच आपली अपेक्षा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?