स्टेशनवर प्रपोज ते घटस्फोटाच्या अफवा: सिद्धूच्या लव्हस्टोरीतील अकल्पित वळणं..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तो तसा साधा तर ती जगाकडे व्यवहाराने पाहणारी, त्याच्या डोळ्यात चंदेरी दुनियेची स्वप्न तर तिला ओढ वास्तवाची, तो सुपरस्टार तर ती त्याची मैत्रीण, प्रेयसी, बायको आणि त्याच्या मुलींची आई सुद्धा! ही काही कुठल्या सिनेमाची गोष्ट नाही की कुठल्या कथेचा विषय नाही पण तरीही ती वास्तविक प्रेमाची परिकथा आहे. आधी मैत्री, प्रेम, लग्न आणि आता घटस्फोटाच्या अफवा अशा अनेक आघाड्यांवर तरलेल्या या गोष्टीचा नायक आहे अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार…
प्रेम हा शब्द नुसता उच्चारला तरी मनात फुलपाखरे उडायला लागतात आणि love at first sight ची अनेक उदाहरणे तुम्ही देखील आपल्या आजूबाजूला पहिली असतीलच की! ही त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुद्धा तशीच खट्टी-मिठी आहे.
गोष्ट तेव्हा सुरू झाली जेव्हा सिद्धू देवेंद्र पेम यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याने आपलं ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केलं. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केलं. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकामधून प्रकाशझोतात आला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
तसाही तो त्याचा स्ट्रगलिंग चा काळ होता. त्याचवेळी पेम यांच्या ‘रामभरोसे’ या नाटकाचे कास्टिंग सुरू होतं आणि त्यासाठी ऑडिशन घेणं सुरु झालं. या ऑडिशनसाठी अनेक जणं आले होते त्यात तृप्ती देखील होती. नागपूरहून मुंबईत आलेल्या तृप्तिला अभिनयाची आवड होती आणि पत्रकार बनणं हे तिचं ध्येय होतं.
ऑडिशन दरम्यान तिची सिद्धूशी ओळख झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला. अर्थातच हे पहिल्या नजरेचेच प्रेम होतं. तृप्तीने नाटकाची ऑडिशन उत्कृष्ट दिली. सिद्धार्थला तर पहिल्याच भेटीत ती आवडली होती.
ऑडिशन चांगली दिल्यामुळे तिला अभिनायाबाबत विचारल्यावर तिने नकार दिला. सिद्धार्थला हा धक्काच होता. तृप्तीला त्यावेळी जर्नालिझम मध्ये इंटरेस्ट जास्त होता. त्यामुळे तिने नकार दिला होता. पण सिद्धार्थला तिचा बिनधास्तपणा आवडला होता आणि ती ही!
त्यानं तिला भूमिका करण्याविषयी विनंती केली. परंतु, ती नकारावर ठाम होती. तिने नकार दिल्यानं ती सिद्धूला पुन्हा भेटणार नव्हती आणि असं झालं तर सिद्धूच्या प्रेमाचं विमान हवेत उडायच्या आधीच लँड झालं असतं. शेवटी काय मित्रांनो तर प्रेमात पडले की सारे माफ असते हो ना? मग काय सिद्धूने ठरवले की आपण तृप्तीला प्रपोज करायचंच.
ते दोघेही एल्फिन्स्टन स्टेशनवर उतरत असत. त्यावेळी संधी पाहून सिद्धार्थने स्टेशनच्या तिकीट खिडकीजवळ, आजूबाजूला असलेल्या प्रचंड गर्दीतच तृप्तीला थेट लग्नाची मागणी घातली.
तृप्तीला सिद्धार्थ तिच्यावर भाळला असल्याची कल्पना होती. परंतु, तो इतक्या लवकर प्रपोज करेल आणि थेट लग्नाची मागणी घालेल, असं वाटलं नव्हतं. त्यामुळे तिला हा आश्चर्याचा धक्का होता. तिने तिथेच त्याला नकार कळवला. पण सिद्धार्थने लगेच तिला मैत्रीचा प्रस्ताव दिला.
त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली. कालांतराने ते वारंवार भेटू लागले, एकमेकांना फोन करु लागले. पण त्यावेळीही सिद्धार्थ तृप्तीला हेच म्हणायचा की, ”जेव्हा तू लग्नाचा विचार करशील तेव्हा माझ्या नावाचा जरुर विचार कर”. पण तृप्तीला त्याच्याबद्दल अजून ओढ वाटत नव्हती.
दोघंही तेव्हा फक्त विशीत असल्याने आधी करियर केलं पाहिजे असं तृप्तीला वाटत होतं. मात्र सिद्धार्थ तिच्याबाबतीत खूपच पझेसिव्ह झाला होता. तृप्तीबरोबर कोणी बोललं किंवा तिला कोणाचा फोन आला तर त्याला राग यायचा. हे तृप्तीला जाणवलं. त्यामुळे तिने त्याच्याशी न बोलण्याचे ठरवलं. तिने त्याला तसा निरोपही दिला.
पण नंतर आपण सिद्धार्थसारखा चांगला मित्र गमवायला नको, हे तिला जाणवल्याने तिने त्याच्यासोबत पुन्हा बोलायला सुरुवात केली, हळुहळू त्यांचं नातं बहरत गेलं आणि तब्बल ४ ते ५ वर्षांनी तिने सिद्धार्थला होकार दिला.
सिद्धार्थ आणि तृप्ती हे रोज स्टेशनवर भेटायचे. सिद्धार्थ हा रोज तिला ५ रुपयांचं एक चॉकलेट देत असे. सुरुवातीला तृप्तीला ते भारी वाटायचे. नंतर ती त्याला वैतागली होती. पण सिद्धार्थने मात्र चॉकेलट देणं सोडलं नाही. ज्या दुकानातून तो चॉकलेट खरेदी करायचा. तो दुकानदार ही त्याच्या चांगल्या ओळखीचा झाला होता.
सिद्धार्थने तृप्तीला एल्फिन्स्टन स्टेशनवर १० जुलै २००२ रोजी प्रपोज केलं होते. त्यानंतर ५ वर्षांनी म्हणजे १० मे २००७ रोजी दोघांनी लग्न केले.
सुरुवातीला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता. त्यासाठी दोघांनीही पुष्कळ प्रयत्न केले, अखेर कालांतराने तो मावळला. तृप्तीचं घराणं दाक्षिणात्य असल्याने मराठमोळ्या सिद्धुला त्यांचा पहिल्यापासूनच विरोध होता. पण नंतर त्यांनी दोघांना स्वीकारलं.
—
- हिंदी सिनेमांत मराठी कलाकारांची खिल्ली… हे चाळे कधी थांबणार ?
- …आणि देवेंद्र फडणवीसांना मित्राच्या घरी भेटली आपल्या आयुष्यातली खरी ‘काजोल’…!
—
लग्नानंतर दोघेही अंधेरी येथे एका घरात भाड्याने राहायला गेले. त्यावेळी तृप्ती ही नोकरी करत होती. तर सिद्धार्थ हा नाटक, टीव्ही सिरियल्स आणि काही चित्रपटांमध्ये भूमिका करत होता.
हळूहळू सिद्धार्थ आपल्या क्षेत्रात मोठा झाला. तो याचे सर्व श्रेय तृप्तीला देतो. सिद्धार्थ जेवढा उत्साही आणि इमोशनल तेवढीच तृप्ती शांत व प्रॅक्टिकल आहे. तृप्तीचं कौतुक करताना “माझ्यासारख्या वेड्या माणसाबरोबर तृप्ती संसार करते”, असे सिद्धू नेहमी म्हणतो. या दोघांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.
एवढी फिल्मी लव्हस्टोरी असलेलं, सुखदुःखाचे प्रसंग एकत्र अनुभलेलं हे जोडपं एकमेकांशी घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. तृप्ती हिने सोशल मिडीयावरून ‘जाधव’ हे आडनाव हटवल्याने या चर्चेला सुरुवात झाली.
त्यांच्या मुलीने मध्यस्ती केल्याच्याही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र अद्याप सिद्धार्थ किंवा तृप्ती यांनी कोणतंही स्पष्टीकर दिलं नसल्याने ही अफवा आहे की सत्य? ही बाब अधोरेखित झालेली नाही. त्यामुळे कोणतेही तर्कवितर्क काढण्यापेक्षा त्यांच्या उत्तराची अपेक्षा करणं योग्य!
अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सिद्धू आणि त्याचा भरभरून साथ देणारी तृप्ती यांची प्यारवाली लव्हस्टोरी तुम्हाला कशी वाटली? हे नक्की कळवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.