Site icon InMarathi

चिकन गुनिया, डेंग्यूवर निघालाय एक रामबाण उपाय! काट्याने काटा काढणार!!!

deunge im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाने बरेच दिवस दडी मारली होती, आधीच मे महिन्याच्या उकाड्यामुळे लोक त्रस्त होती. त्यात हवामान खात्याने अंदाज दर्शवला होता की यावर्षी मान्सून लवकर येणार मात्र झालं उलटंच. पावसाने उशिरा हजेरी लावली. उशिरा आलेल्या पावसाने हाहाकार माजवला आहे. ५ दिवसांचा अलर्ट जाहीर केला आहे.

मुंबईपासून ते अगदी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सगळीकडेच पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर ओसरल्यावर रोगराई वाढते मुंबईत चिकनगुनिया डेंग्यूसारख्य आजरांच्या साथी येतच असतात. वेळच्या वेळी काळजी घेतली नाही तर माणसाचा जीव ही जाऊ शकतो. आज कॅन्सरसारख्या आजारांवर मात करणं शक्य झालं आहे.

 

 

डेंग्यू, चिकनगुनिया सारखे आजार एका विशिष्ट प्रकारच्या डासाच्या जातीमुळे होतो. आता ICMR संशोधन करून यावर एक उपाययोजना आखली आहे, ती नेमकी काय आहे जाणून घेऊयात…

ICMR ची उपाययोजना :

मराठीत एक म्हण आहे काट्याने काटा काढायचा, जस सापवरचं औषध तयार करण्यासाठी काही प्रमाणात सापाचं विष घेतलं जातं त्याच पद्धतीने आता ICMR ने डेंग्यू, चिकनगुनिया सारखे आजार पसरवणाऱ्या डासांना नष्ट करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या मादी डासांची रचना केली आहे. ज्याच्यातून निर्माण होणाऱ्या अळ्यांमध्ये याचे विषाणू नसतील.

या संदर्भात अधिक माहिती देताना ICMR चे तज्ज्ञ डॉ. अश्विनी कुमार ANI शी बोलताना असं म्हणाले की, आम्ही अशा मादी डासांना सोडू ज्या नर मादिंच्या संपर्कात येतील आणि त्यातून ज्या अळ्या तयार होतील त्यात हे विषाणू नसतील. त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही डास आणि अंडी तयार केली आहेत.

 

 

सरकारच्या परवानगीने ती आता कधीही आम्ही हवेत सोडू शकतो. पुद्दुचेरी येथे या डासाची निर्मिती करण्यात आली आहे. aegypti असं नाव ही देण्यात आलं आहे. या संशोधनाला तब्बल वर्ष लागली असंही त्यांनी सांगितलं आहे.

डासांची उत्पत्ती कशी होते?

एडिस पद्धतीचे डास हे उघड्या पाण्यावर, अगदी घरात आपण पक्षांसाठी एखाद्या छोट्या भांड्यात पाणी ठेवतो त्या पाण्यात देखील अशा डासांची उत्पत्ती होऊ शकते. खराब टायर, नारळाच्या करवंट्या, इतरत्र पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आदींमधून देखील या डासांची उत्पत्ती होते.

 

 

खबरदारी काय घ्याल :

आपण बघितलं की अशा डासांची उत्पत्ती अगदी आपल्या घरात देखील होऊ शकते, त्यामुळे शक्यतो आपले घर स्वच्छ ठेवा. पाणी साठवत असल्यास ते एक दोन दिवसांनी बदला. डासांचे साम्राज्य तुमच्या भागात असल्यास फवारणी करून घ्या. झोपताना मच्छर दाणीचा उपयोग करा. अशा डासांची उत्पत्ती रोखणे हाच एक मार्ग सध्या आपल्या हातात आहे.

 

दोन वर्षांपासून जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. सगळं जग यावर संशोधन करत आहोत. आपल्या देशात लसीची निर्मिती करण्यात आली तसेच बाहेर देखील पाठवण्यात आली. आज कोरोना आटोक्यात जरी असला तरी आपण मात्र खबदारदारी घ्यायला हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version