Site icon InMarathi

कधी विचार केलाय, की हातापायांच्या तळव्यांवर केस का नसतात?

leg pain im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. या देवाने म्हणजेच निसर्गाने आपली सजीव सृष्टी निर्माण केली ज्यात त्याने अनेक चमत्कार सुदधा केलेत,

जसं की हत्तीचे कान, उंटाच्या पाठीवरील कुबड किंवा कांगारूच्या पोटावर असणारी पिशवी… आहेत ना हे चमत्कार? तसाच अजूनही एक चमत्कार या निसर्गाने करून ठेवला आहे. तो म्हणजे माणसाची निर्मिती!

माणूस ही निसर्गाची अशी निर्मिती आहे, जी त्याला बर्‍याच गोष्टींमुळे इतर प्राण्यांपासून वेगळं ठरवते. यात माणसाचे वागणं, बोलणं, खाणं, पिणं याबरोबरच शारीरिक ठेवण, हे ही सामील आहेत.

 

 

मित्रांनो तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का की इतर प्राणी आणि माणूस यात काय काय फरक असू शकेल? तर इतर अनेक गोष्टींसोबत हा ही फरक तुम्हाला जाणवेल तो म्हणजे त्वचा!

माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या त्वचेचे निरीक्षण केल्यावर कदाचित तुम्हाला हे लक्षात येईल इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाची कातडी पातळ असते आणि इतर प्राण्यांसारखे माणसाचे हात किंवा पाय आणि त्यांचे तळवे केसाळ नसतात. आहे ना वेगळेपणाची गोष्ट !

तेच तर, तुम्ही अनेक प्राणी पाहिले असतील की त्यांच्या तळहातावर आणि पायाच्या तळाशी केस असतात, परंतु माणसांच्या तळहातावर आणि तळव्यावर केस कधीच उगवत नाहीत.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शरीराच्या इतर भागावर केस वाढतात, पण तळवे आणि तळपायावर का वाढत नाहीत? शेवटी त्यामागचे कारण काय असेल? या लेखातून आपण शोधूया की माणसाच्‍या तळहातावर केस का उगवत नाहीत?

 

 

एका सायन्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, जगभरातल्या मानवी रचनेचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांसाठी हे फार पूर्वीपासून एक कोडं होतं की माणसाचे तळवे आणि त्याचे तळपाय यांच्यावर केस का उगवत नाहीत? इतर प्राण्यांच्या तळव्यांवर केस असतात तसे माणसाच्या तळव्यांवर का नसावेत बरं?

तर मित्रांनो आता याचे रहस्य शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया’ मधील ‘स्किन एक्सपर्ट’ सारा मिलर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सारा मिलर यांनी एका वेबसाइटला सांगितले की, यावर खूप संशोधन झाले आहे त्यातून हे समजले आहे की मानवी शरीरात ‘Wnt’ नावाचे एक प्रकारचे प्रोटीन किंवा प्रथिन असते. हे प्रथिन केसांची वाढ, केस उगवण्याची जागा आणि पेशींमधील वाढ याबद्दल माहिती देते आणि त्यासाठी मानवी शरीरात काम देखील करते.

या प्रथिनांसारखे आणखी एक प्रकारचे प्रथिन असते जे, आपल्या शरीराच्या ज्या भागांमध्ये नैसर्गिकरित्या केस वाढत नाहीत त्याठिकाणी आढळते जे, WNT प्रथिनांना केस वाढीसंदर्भातील त्यांचे काम करू देत नाहीत.

हे इनहिबिटर किंवा अवरोधक प्रथिन म्हणजे ‘डिककोप 2 (DKK2) ‘ नावाचा एक प्रकारचा प्रोटीन आहे.

याचा आणखी सविस्तर अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळेत उंदीर आणि ससे यांच्यावर अनेक प्रयोग करण्यात आले.

 

 

त्यामध्ये सशांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की त्यांच्या शरीरात WNT हे प्रथिन फार कमी प्रमाणात आढळते, त्यामुळे त्यांच्या हातावर आणि पायावर जास्त केस वाढतात पण या प्रथिनांच्या उपस्थितीचे कारण काय आहे हे शास्त्रज्ञ अद्याप शोधू शकलेले नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की जैव उत्क्रांतीमुळे ही प्रथिने केवळ मानवी शरीरात आढळत असावीत.

अस्वल आणि ससे यांसारखे प्राणी खडकाळ किंवा खडबडीत नसलेल्या रस्त्यावर चालतात, त्यामुळे त्यांच्या हातावर आणि पायावर केस वाढतात. याउलट मानवी शरीरात केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या wnt प्रोटिन्स ना शरीरात असणारे काही ‘ब्लोक्कर्स प्रथिने’ काम करण्यापासून रोखतात.

 

 

या दुसर्‍या प्रथिनांना डिककोप 2 (DKK2) म्हणतात जी इतर प्राण्यांच्या शरीरात आढळत नाहीत. मानवी शरीरातील या अवरोधक प्रथिनांमुळे आपल्या तळहात आणि तळपायांवर केस येत नाहीत.

मित्रांनो एकाच ठिकाणी परस्पर विरोधी कार्य करणारी ही दोन्ही प्रथिने मानवी शरीरात गुण्यागोविंदाने नंदतात. ज्यामुळे आपल्या शरीरात ठरलेल्या योग्य ठिकाणीच केसांची वाढ होते. आहे ना नवलाईची गोष्ट?

hanhaशेवटी मानवी शरीर हा देखील निसर्गाचा एक मोठा चमत्कारच आहे, खरे ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version