Site icon InMarathi

ताज महाल, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला आणि चक्क राजकारण्यांसह भारताची संसद विकणारा महाचोर!

Natwarlal-marathipizza00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात असे अनेक चोर झाले ज्यांनी आपल्या चौर्य चातुर्याने अनेकांना गंडा घातला. काहींनी कोणाच्या मालमत्तेची अफरातफर केली, काहींनी सोन्या चांदींवर, किंमती वस्तूंवर घाला घातला. पण आज आम्ही तुम्हाला अश्या एका भारतीय चोराबद्दल सांगणार सांगणार आहोत, ज्याने केलेल्या चौर्य कामगिरीसमोर सोने, चांदी, पैसे यांच्या चोऱ्या नगण्य वाटतील. तो भारतीय चोर म्हणजे कुप्रसिद्ध ‘नटवरलाल’!

या नटवरलालने ताज महाल, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला आणि ५४५ सदस्यांसह भारताची संसद विकायला काढली होती.

allresourceupdates.wordpress.com

नटवरलालचं खरं नाव- मिथीलेश कुमार श्रीवास्तव! एकदा नाही तर दोनदा त्याने  ताज महाल, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला आणि भारताची संसद विकून लोकांना वेड्यात काढले होते. तो बनावट स्वाक्षरी करण्यामध्ये सराईत होता. त्याने भारताचे माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या देखील स्वाक्षरीची नक्कल केली होती.

नटवरलालने खोट्या ओळखी निर्माण करून जवळपास ५० पेक्षा जास्त लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. त्याने टाटा, बिर्ला एवढेच काय तर धिरुभाई अंबानी सारख्या दिग्गजांपुढे जाऊन आपण गरजूंसाठी देणगी गोळा करत असल्याचे भासवून त्यांना लुटले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याच्या याच फसवाफसवीमुळे संपूर्ण भारताची पोलीस यंत्रणा त्याच्या मागावर होती. पोलिसांनी देखील दिवस रात्र एक करत तब्बल ९ वेळा त्याचा माग काढला, पण दरवेळी काही न काही क्ल्युप्त्या लढवून तो पोबारा करत असे.

funbuzztime.com

नटवरलालने अनेक दुकान मालकांना बनावट स्वाक्षरी केलेले डिमांड ड्राफ्ट आणि चेक देऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. २४ जून १९९६ ला वयाच्या ८४ व्या वर्षी पोलिसांच्या कैदेत असताना त्याला कारागृहामधून AIIMS मध्ये कानपूर पोलिसांच्या संरक्षक दलाच्या देखरेखीखाली नेण्यात येत होते, परंतु  दिल्ली रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन तो अचानक दिसेनास झाला. मुख्य म्हणजे तो ज्या व्हीलचेअर वर बसला होता, त्या व्हीलचेअर सकट पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरला. त्यानंतर तो कधीही कुणाच्या नजरेस आला नाही. त्याच्या कुटुंबांनी तर तो मरण पावल्याचे मान्य केले.

fireflydaily.com

आठ राज्यातील पोलिस १०० पेक्षा जास्त फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात त्याच्या मागावर होते. गंमत म्हणजे त्याच्या या सर्व गुन्ह्यांची शिक्षा म्हणून त्याला ११३ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. जेव्हा जेव्हा त्याला पोलिसांनी कोठडीत डांबले, तेव्हा तेव्हा हा चोर शिताफीने तुरुंगातून निसटला.

मिथीलेश श्रीवास्तव अर्थात नटवरलालच्या वकिलाने अविश्वसनीय दावा करत कोर्टाला अशी विनंती केली की, मिथिलेश याचा २५ जुलै २००९ मध्ये मृत्यू झाला आहे, त्याच्यावर १०० पेक्षा जास्त असलेल्या आरोपामधून त्याची मुक्तता करावी. पण आश्चर्याची गोष्ट ही की नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून गायब झाल्यावर त्यांच्या भावाने १९९६ सालीच रांची येथे याचे अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे या नटवरलालचा मृत्यू म्हणजे एक रहस्यचं बनून राहिले आहे.

indiatimes.com

असो आता काही तो या जगात नाही,  पण त्याच्या या चौर्य निष्णात व्यक्तित्वाने बॉलीवुडला  मात्र दोन सुपरहिट चित्रपट मिळाले. एक होता अमिताभचा – मिस्सुटर नटवरलाल आणि दुसरा इम्रान हाश्मीचा राजा नटवरलाल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version