म्हणायला साधा भिल्ल, पण या मामाने ब्रिटिशांना एकहाती जेरीस आणलं होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत ही जशी संतांची भूमी आहे तशीच ती शूर वीरांची देखील भूमी आहे. इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केलं. पण, या काळात त्यांना आपल्या क्रांतिकारी लोकांनी सुखाने बसू दिलं नाही हे देखील तितकंच खरं आहे.
“ऐ मेरे वतन के लोगो…” या गाण्यातील ओळींप्रमाणे ज्या सैनिक, क्रांतिकारी लोकांनी देशासाठी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे त्यांचं १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी शिवाय इतर दिवशी देखील समरण करणं हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असू शकते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
भारतावर राज्य करत असतांना इंग्रजांकडे शस्त्रांची शक्ती होती, तर भारतीय क्रांतिकारी लोकांकडे इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्याची युक्ती होती.
‘टंट्या भिल्ल’ हे १८ व्या शतकात मध्यप्रदेशमध्ये आदिवासी जमातीमध्ये स्वतंत्र क्रांती घडवून आणणाऱ्या अशाच एका क्रांतिकारी व्यक्तीचं नाव आहे ज्याचा कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांनी धसका घेतला होता.
एखाद्या मोठ्या ठिकाणी विना परवानगी पोहोचणे आणि एखाद्या छोट्या जागेतून चपळाईने निघून जाण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे इंग्रजांनी टंट्या भील या व्यक्तीला ‘इंडियन रॉबिनहूड’ अशी पदवी दिली होती.
टंट्या भिल्ल यांचा जन्म मध्यप्रदेश मधील छत्तीसगड येथील बदादा या गावातील आदिवासी जमातीत झाला होता. टंट्या भिल्ल यांचं खरं नाव ‘टंड्रा भिल्ल’ हे होतं. शिकण्यासाठी कोणत्याही शाळेत न जाता देखील इंग्रज भारताला कसे लुटत आहेत हे त्यांना लहानपणीच कळलं होतं. स्वातंत्र्य सेनानी लोक कसं इंग्रजांचा विरोध करत आहेत? हे त्यांना तात्या टोपे यांच्या लोकजागरण अभियानात कळलं होतं.
टंट्या भिल्ल हे सर्व क्रांतिवीरांच्या कथा ऐकायचे आणि त्यांनी केलेले साहस प्रकार ते आपल्या जंगलात करून बघायचे. क्रांतिवीर तात्या टोपे यांनी टंट्या भील यांचं युद्ध कौशल्य बघून त्यांना ‘गोरिला युद्ध’ या युद्ध प्रकाराचं प्रशिक्षण दिलं होतं. ते नेमबाजीत देखील निपुण होते. त्यांनी बंदूक चालवण्याचं सुद्धा प्रशिक्षण घेतलं होतं.
‘आरआरआर’ या सिनेमात दाखवलेल्या क्रांतिकारी व्यक्तींप्रमाणे टंट्या भिल्ल हे इंग्रजांची संपत्ती सफाईदारपणे लुटायचे आणि त्याला भारताच्या गरीब लोकात वाटून टाकायचे. भिल्ल समाजासाठी टंट्या भिल्ल हे एक देवदूत होते ज्यांची छत्तीसगड येथील आदिवासी घरांमध्ये आजही पूजा केली जाते.
गरिब व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्ती यांच्यातील अंतर कमी व्हावं हा टंट्या भिल्ल यांच्या आयुष्याचा उद्देश होता. टंट्या भिल्ल हे आपल्या क्रांतिकारी करवायांसोबतच सामाजिक योगदानासाठी सुद्धा ओळखले जायचे.
आदिवासी समाजात त्यांना आदराने ‘मामा’ या नावाने ओळखलं जायचं. ‘टंट्या मामा’ या नावाने लोकांनी मारलेली हाक आणि त्यांचे संगीतलेले प्रश्न हे त्यांना नेहमीच आवडायचं.
आपल्या नावातच दडलेल्या ‘तंटा’ या शब्दाप्रमाणे ते इंग्रजांसोबत भांडण करण्यासाठी नेहमीच तत्पर असायचे. १५ वर्ष सलग त्यांनी इंग्रजांच्या संपत्तीची लूट करणे, त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही भाग देण्यास नकार देणे असे प्रकार सुरूच ठेवले होते.
१७५७ मध्ये झालेल्या ‘प्लासी’ येथील लढाईच्या वेळी आदिवासी जमातीने सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र हातात घेतले होते. टंट्या भिल्ल यांचा इंग्रजांच्या नाकात दम आणण्याचा कार्यकाळ हा १८५७ ते १८८९ हा होता.
—
- RRR मध्ये दिसणाऱ्या, धनुष्य बाण घेऊन ब्रिटिश सैन्याला भिडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी!
- प्राचीन भारताच्या ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या या अज्ञात गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
—
‘गोरिला युद्ध’ पद्धतीने ते इंग्रजांवर हल्ला करायचे आणि एखाद्या पक्षी प्रमाणे ते तिथून क्षणात पसार व्हायचे. कमालीची गोष्ट म्हणजे त्यांना प्राण्यांची भाषा देखील बोलता यायची.
टंट्या भिल्ल यांच्यात काही दैवी शक्ती होती असं देखील बोललं जायचं. एकाच वेळी विविध गावांमध्ये सभा करतांना लोकांना दिसायचे असा त्या काळातील लोकांचा अनुभव होता. ही एखादी दैवी शक्तीच असावी ज्याच्या जोरावर ते २००० इंग्रज सैनिक पाठीमागे लागलेले असतांना देखील तिथून निसटून जायचे.
प्रत्येक चांगल्या, वाईट गोष्टींना अंत असतो. टंट्या भिल्ल यांचं शौर्य हे देखील अपवाद नव्हतं. टंट्या मामा यांच्या भाऊजी ‘गणपत’ या व्यक्तीने इंग्रजांनी देऊ केलेल्या काही पैश्यांच्या आमिषाने टंट्या यांची संपूर्ण माहिती दिली आणि ते पकडले गेले.
टंट्या भिल्ल यांना ‘राजद्रोह’च्या गुन्ह्याखाली पकडण्यासाठी इंग्रजांना ७ वर्ष प्रयत्न करावे लागले होते. टंट्या भील यांच्या अटकेची बातमी प्रकाशित करतांना ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वर्तमाणपत्राने सुद्धा त्यांचा उल्लेख ‘भारताचे रॉबिन हुड’ असा केला होता.
टंट्या भिल्ल यांची मध्यप्रदेशात इतकी लोकप्रियता होती की, त्यांचा खटला लढण्यासाठी वकिलांनी कोणतीही रक्कम मागितली नव्हती. जबलपूर येथील पोलीस स्थानकात त्यांना नेत असतांना पोलिसांना मोठ्या जनसमुदायाला बाजूला करावं लागल्याचा काही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे.
जबलपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १९ ऑक्टोबर १८८९ रोजी टंट्या भील यांना फाशीची शिक्षा सुनावली. टंट्या भिल्ल कारागृहात प्रचंड त्रास दिल्यानंतर त्यांना ४ डिसेंबर १८८९ रोजी फाशी देण्यात आली.
टंट्या भील यांच्याकडून त्या आधी नेहमीच हरलेले इंग्रज यावेळी इतके क्रूर झाले होते की यावेळी त्यांनी लोकांच्या लाडक्या टंट्या मामाचा देह त्यांनी इंदोर जवळ असलेल्या ‘पातालपाणी (कालापानी)’ या रेल्वे स्टेशनवर फेकून दिला होता. याच ठिकाणाला ‘टंट्या मामा’ यांचं समाधीस्थळ म्हणून ओळखलं जातं.
मध्यप्रदेश मधील ‘पातालपानी’ या रेल्वे स्थानकावर टंट्या भील यांना आदरांजली म्हणून रेल्वे ही काही अतिरिक्त क्षणांसाठी थांबवली जाते.
मध्यप्रदेशचे नायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टंट्या मामा’ यांच्या जीवनावर आधारित ‘टंट्या भिल्ल’ नावाचा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. टंट्या भील यांच्या शौर्याला आपणही शतशः नमन करूयात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.