७ कुकिंग टिप्स ज्या वाचवतील गॅस, घरातील सिलेंडर चालेल अनेक महिने
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हल्ली महागाई इतकी वाढलीये, की सगळ्याच गोष्टींचे भाव गगनाला भिडलेत. अशा परिस्थितीत माणूस पै अन पै वाचवायचा प्रयत्न करतोय.
इंधनाचे वाढते दर हे सतत बदलत असतात, त्यामुळे आपल्याकडंही हे दर महागच असतात. एका महिन्यात आणि कधीकधी महिन्याच्या आतच संपणारा गॅस हा कधी कधी आपलं आर्थिक गणित चुकवू शकतो.
म्हणूनच आम्ही घेऊन आलोय अशा काही टिप्स, ज्या वाचून तुमचा गॅस महिन्याहून अधिक टिकेल आणि बचतही होईल. बघूया या टिप्स-
१. डाळ- तांदूळ काही वेळ भिजवून ठेवा
बऱ्याचजणी वरणभात कुकरमध्ये शिजवत नाहीत. पातेल्यात तांदूळ आणि पाणी घेऊन भात शिजवला जातो. हा भात शिजवताना गॅस बराच खर्च होतो. अशावेळी एक साधी गोष्ट तुम्ही करू शकता, ज्याने भात शिजायला कमी वेळ लागेल.
डाळ- भात शिजवण्याआधी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा आणि मग शिजवा. फक्त फार वेळ भिजत ठेऊ नका.
२. मंद आचेवर अन्न शिजवू नका
बरचसे अन्नपदार्थ मंद आचेवर शिजवले जातात. गृहिणी मंद आचेवर पातेलं ठेऊन इतर कामं करत बसतात, पण असं केल्याने गॅस खूप वाया जातो. तुम्ही गॅसची फ्लेम वाढवलीत, तर अन्नपदार्थ पटकन शिजतील.
हे करताना एक दक्षता घ्या, तीव्र आचेवर पदार्थ शिजवताना ते जाळण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे गॅस वाचवण्याच्या नादात अन्नपदार्थ जाळू नका. लक्ष ठेवणं कठीण जात असेल, तर मध्यम आचेवर गॅस ठेवा, पण अगदी मंद आच करू नका.
३. प्रेशर कुकरचा वापर करा
कोणतीही गोष्ट पातेल्यात शिजवताना प्रेशर कुकरमध्ये शिजवली, तर गॅसची बचत होती. भाज्या, मटण वगैरे शिजवण्यासाठी प्रेशर कुकर वापरणं खूप सोयीचं ठरतं.
प्रेशर कुकरमध्ये तुम्हाला पूर्ण अन्न शिजवायचं नसेल, तर जास्त शिट्ट्या जास्त काढू नका. थोडं कच्च अन्न ठेऊन नंतर पातेल्यात शिजवू शकता. याने तुमचा गॅसही वाचेल आणि तुम्हाला अपेक्षित चवही याने मिळेल.
४. मायक्रोव्हेवचा वापर करा
फक्त अन्न गरम करण्यासाठी, दूध गरम करण्यासाठी किंवा पापड वगैरे भाजण्यासाठी तुम्ही गॅस लावत असाल, तर असं न करता या लहानसहान गोष्टींसाठी तुम्ही मायक्रोव्हेवचा वापर करू शकता.
ज्या गोष्टी गरम करायला गॅसवर १५ -२० मिनिटं लागतात, त्याच गोष्टी मायक्रोव्हेव मध्ये २-३ मिनिटांत गरम होऊ शकतील.
५. भाज्या उकडून मग वापरा
भाज्या उकडून नंतर त्यांना फोडणी दिल्यास गॅसची बचत होईल आणि वेळही वाचेल. शिवाय, घरात त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे जरा वेगळ्या पद्धतीने भाजी केल्यास घरातल्यांना पण आवडू शकते.
६. झाकणाचा वापर करा
भात किंवा भाजी शिजवताना फोडणी दिल्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवा. असं केल्यामुळे वाफेने भाज्या लवकर शिजतील आणि तुमचा गॅस वाचेल. कढई उघडी ठेऊन भाजी शिजवल्यास गॅस वाया जातो आणि पर्यायाने वेळही.
७. तव्याचा योग्य वापर करा
पोळ्या करताना विनाकारण तवा चालू ठेवला जातो, असं होणार नाही याची काळजी घ्या. पोळ्या शेकण्याचा ५-१० मिनिटं आधी तवा गरम करून घ्या.
या टिप्स नक्की वापरून बघा, तुमचं गॅस सिलेंडर दीर्घकाळ टिकेल.
—
- वेळेला चहा लागतो हे मान्यच पण ही गोष्ट देखील त्यासोबत करत जा….
- “गॅस बर्नर” घरच्या घरी स्वच्छ ठेवण्याचे हे सोप्पे उपाय समजून घ्या!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.