Site icon InMarathi

देशवासीयांसाठी जगाची बंधनं झुगारून ऑपरेशन थंडरबोल्ट यशस्वी करणाऱ्या सैनिकांना सलाम!

operation thunderbolt featured inmarathi

sofrep.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : विनीत वर्तक

===

जगात अतिरेक्यांविरोधी ज्या मोहिमा झाल्या त्यात ऑपरेशन थंडरबोल्टला सगळ्यात वरचं स्थान आहे. ह्या मोहिमेच यश हे जास्ती उजळून निघते ते ज्या ठिकाणी सफल केलं गेलं त्यामुळे.

आपल्या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आपण कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्यास तयार आहोत. त्याचवेळी माणुसकीच्या शत्रूंचा नायनाट करायचा असेल तर जहाल भूमिकाच योग्य आहे. चांगला आतंकवाद आणि खराब आतंकवाद अस काही नसते.

आतंकवाद हा माणुसकीचा शत्रुच आहे, हा संदेश बऱ्याच वर्षांपूर्वी ज्या मोहिमेने जगाला दिला. ती म्हणजे ऑपरेशन थंडरबोल्ट.

 

lockheedmartin.com

 

२७ जून १९७६ रोजी एअर फ्रांसचे २४८ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे, पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना ‘Popular Front for the Liberation of Palestine – External Operations’ च्या दोन आतंकवाद्यांनी अपहरण केलं.

तेल अवीव वरून फ्रांस साठी उड्डाण भरलेलं विमान अन्थेंस, बेंगाझी द्वारे इंटेबेकडे नेण्यात आलं. युगांडा देशाने ह्या अपहरणाच समर्थन करत ह्या विमानातील आतंकवाद्यांना संरक्षण दिलं.

इदी अमीन ह्या युगांडाच्या नेत्याने स्वतःहून विमानतळावर ह्याचं स्वागत केलं. एखाद्या पाहुण्याचं स्वागत करावं असा हा समारंभ होता. ह्यानंतर सगळ्या अपहरण केलेल्या लोकांना जवळच्या बिल्डींग मध्ये बंदिस्त करण्यात आलं.

१४८ प्रवाशांना पुढल्या दोन दिवसात सोडून देण्यात आलं. एअर फ्रांस चे १२ कर्मचारी आणि ९४ ज्यू इस्राइल नागरिक मात्र बंदी बनवण्यात आले.

४० पॅलेस्टाईन आतंकवादी तसेच १३ इतर देशातील कट्टर आतंकवादी ह्यांच्या सुटकेच्या बदल्यात ह्या प्रवाशांना सोडण्यात येईल अशी अट त्यांनी इस्राइल सरकारला घातली. इस्राइल हा छोटासा देश असला तरी आपल्या नागरिकांसाठी काही वाट्टेल ते करण्यास मागे पुढे बघत नाही.

इस्राइलने एकीकडे चर्चेची तयारी दर्शवताना दुसरीकडे एक वेगळंच ऑपरेशन हाती घेतलं. ह्या ऑपरेशनची मास्टर माइंड होती मोसाद.

 

mintpressnews.com

 

मोसादच्या सांगण्यावरून इस्राइल डिफेन्स फोर्सेसच्या कमांडोनी ऑपरेशन थंडरबोल्ट हाती घेतलं. ह्या नावातच खूप काही आहे.

वीज जशी काही कल्पना न देता चमकते, तिचा तो लोळ प्रचंड उर्जेचा साठा घेऊन जमिनीवर असा काही झेपावतो कि काही कळायच्या आत सगळंच बेचिराख झालेलंअसतं.

हे सगळं घडून गेल्यावर त्याच्या आवाजाने आपल्याला कळतं कि किती प्रचंड नुकसान झाल आहे.

१०० कमांडोना घेऊन इस्राइलच्या प्लेननी आकाशात भरारी न घेता जमिनीपासून फक्त ३० मीटर वर उड्डाण केलं. इजिप्त, सुदान, सौदी अरेबियाला त्यांच्या ऑपरेशनचा कोणताही थांगपत्ता लागू नये म्हणून हि काळजी घेण्यात आली.

४००० किमीच्या अंतरावर इंधन न भरता उड्डाण भरणं शक्य नव्हतं. अश्या वेळी कोणत्या तरी आफ्रिकन देशाची मदत हवी होती. हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता त्याकाळी इस्राइलकडे नव्हती, म्हणून मोसादने केनियाची मदत घेतली.

केनिया मध्ये इंधन भरून रात्री ११ च्या सुमारास हि कार्गो प्लेन इटेंबे इकडे उतरली.

कार्गो प्लेन असल्याने कोणाला काहीच संशय आला नाही. उतरताच त्यातून इदी अमीनच्या गाडी सारख्याच मर्सिडीज गाड्या बाहेर आल्या. त्या मागे त्याच्या ताफ्या सारख्या गाड्या. ह्यामुळे संशय न येता ह्या गाड्या त्या बिल्डींग जवळ पोचल्या.

नंतर त्यातून इस्राइल कमांडोनी सूत्रे आपल्या हातात घेत अतिरेक्यांवर विजेच्या लोळाप्रमाणे वार केला. सर्व बंधकाना सोडवून त्यांना प्लेन मध्ये सुरक्षित नेण्यात आलं.

युगांडा आर्मीला ह्याचा सुगावा लागल्यावर त्यांनी इस्राइल कमांडो वर गोळीबार सुरु केला. ह्यात ५ कमांडो जखमी झाले. एक युनिट कमांडर योनातन नेतनयाहू शहीद झाले. इस्राइलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहू ह्यांचे सख्खे भाऊ.

 

spectator.co.uk

 

सगळेच्या सगळे ७ अपहरणकर्ते ह्यात मारले गेले. तसेच त्यांना मदत करणारे जवळपास ४५ युगांडाचे सैनिक ह्यात मारले गेले. ११ लढाऊ विमानं मिग-१७ आणि मिग-२१ नष्ट करण्यात आली. १०२ लोकांना वाचवण्यात आलं.

३ मारले गेले, तर एकाला युगांडा मध्ये सोडावं लागलं. काही वेळातच १०२ लोकांना सुखरूप इस्राइल मध्ये उतरवण्यात आलं.

काही कळण्याच्या आत इस्राइल आणि मोसादने जगातील एका यशस्वी ऑपरेशनला मूर्त स्वरूप दिलं.

युनायटेड नेशनने नेहमी प्रमाणे हे ऑपरेशन देशाच्या सार्वभौमत्वा वरील हल्ला अस म्हंटल.

पण आपल्या देशाच्या निष्पाप नागरिकांसाठी केलेलं ऑपरेशन थंडरबोल्ट हे गरजेच होत व वेळ पडल्यास आपण पुन्हा अस करू असं इस्राइलने निक्षून सांगितल.

ऑपरेशन थंडरबोल्टला आता ४० वर्ष होत आली, पण आजही ह्या ऑपरेशनला जगात सर्वोत्तम समजलं जातं ते मोसाद ने केलेल्या प्लानिंग आणि इस्राइल कमांडोनी दाखवलेल्या बहादुरीमुळे.

मोसादने ज्या छोट्या छोट्या गोष्टी, बारकावे लक्षात ठेवून ह्या ऑपरेशन ची मांडणी केली होती त्याला तोड नाही. ४० वर्षा पूर्वी ४००० किमी अंतरावर असं ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या मोसादला आजही जगातले सगळे देश म्हणूनच वचकून आहेत.

२०१५ साली पंतप्रधान मोदी जी-२० परिषदेसाठी तुर्कीला गेले होते. भारताने एस.पी.जी., रॉ, आयबी ह्यांच्या एजंट सोबत मोसाद ला सुरक्षा देण्याची विनंती केली होती.

इस्राइल ने विनंती स्वीकारून त्या पूर्ण दौऱ्यात पंतप्रधान मोदी च्या दौऱ्यावर लक्ष ठेवले होते.

 

jpost.com

 

ऑपरेशन थंडरबोल्ट मधून भारताने खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्याकडे देशभक्तीची कमी नाही. कमी आहे ती निडरता दाखवण्याची.

“आम्ही कोणाला डिवचवत नाही, पण आम्हाला डिवचलं तर सोडणार नाही.” असा इस्राइल सारखा संदेश भारताने देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी एखाद्या अपहरणाची वाट बघण्याची गरज नाही.

सर्जिकल स्ट्राईक हा असाच एक छोटा थंडरबोल्ट होता. पण आता एका मोठ्या थंडरबोल्टची नक्कीच गरज आहे.

 

youtube.com

 

आपल्या नागरिकांसाठी सर्व जगाची बंधन झुगारून ऑपरेशन थंडरबोल्ट यशस्वी करणाऱ्या सर्वच सैनिकांना माझा सलाम. ह्या ऑपरेशन वर चित्रपट पण निघाला असून तो बघितल्यावर आपल्याला ह्या ऑपरेशन ची थोडीफार कल्पना नक्कीच येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version