आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जर तुम्ही भारतात कार चालवत असाल, तर पावसाळा हा तुमचा सर्वात वाईट काळ असेल. पावसाळा आला, की दरवर्षी बहुतेक सर्व डांबरी रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात होते. शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण बाहेरच्या रस्त्यांपेक्षा जास्त असते. काँक्रीटच्या रस्त्यावर सहसा खड्डे पडत नाहीत. केवळ खडीचे व मुरमाचे रस्ते आता फारसे राहिलेले नाहीत. पण डांबरी रस्त्यांची मात्र, दुरवस्था होते. ओले निसरडे रस्ते आणि खड्ड्यांमुळे ड्रायव्हिंगची परिस्थिती आणखी वाईट होते.
पावसाळ्यात रस्त्यांवरील वाहन अपघाताचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसते. अशावेळी गाडीने प्रवास करणे त्रासदायक असू शकते,
पण जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर मात्र तुम्ही पावसाळ्यात देखील आरामात ड्राइव्ह करू शकता. काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर पावसाळयात ड्रायव्हिंग करताना तुम्ही सेफली ड्राइव्ह करू शकता. काय आहेत या टिप्स? चला माहिती करून घेवू.
कोणती काळजी घ्याल :
१. पाणी साचलेल्या परिसरात जाणे टाळा. साचलेल्या पाण्यात गाडी चालवताना जर साचलेल्या पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर तुमची गाडी पाण्यात अडकून बसू शकते. तेव्हा अशा ठिकाणी जाण्याआधी तिथला अंदाज घ्या.
२. जिथे पाणी साचू शकेल अशा भागात थांबण्याची वेळ आली तर आशा जागी थांबा जिथे साचलेल्या पाण्याचे प्रमाण कमी असेल, कारण साचलेल्या पाण्यात अडकून तुमची गाडी बंद पडू शकते. ज्यामुळे तुमच्या गाडीचे महत्वाचे पार्ट्स खराब होवू शकतात.
३. पाणी साचलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवताना गाडीचा वेग जास्त ठेवू नका. तसेच एकदम ब्रेक देखील लावू नका. गाडी हळू आणि एकसारख्याच वेगात चालवा.
४. कारचे संरक्षण करण्यासाठी पाणी साचलेल्या रस्त्यावरून कार कमी गियरमध्ये चालवा. तुम्ही ऑटोमॅटिक वाहन चालवत असल्यास, पहिल्या किंवा दुसऱ्या गियरमध्ये राहण्यासाठी वेग कमी ठेवा आणि वेग नियंत्रित करण्यासाठी ब्रेक वापरा.
५. त्यातूनही कार बंद पडलीच तर लगेच रीस्टार्ट करू नका. त्यामुळे कारच्या इंजिनाचे नुकसान होवू शकते. तेव्हा अशावेळी mechanic च्या मदतीने गाडी सुरू करा. तसेच गाडीमध्ये AC सुरु असल्यास तो बंद करा, त्यामुळे इंजिनवरचा ताण होईल.
६. जर कार पाण्यात फसली आणि तुम्ही आत अडकलात तर घाबरून न जाता कारच्या खिडकीची काच उघडण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करा. अथवा गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करा. गाडी सोडायचीच वेळ आली तर शक्य असेल तर गाडीची बॅटरी डिस्कनेट करून घ्या.
७. गाडी चालवताना अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन बाबी म्हणजे, पावसाळ्यात रस्ते नेहमी ओले आणि निसरडे असतात आणि टायर अनेकदा रस्त्याची योग्य पकड मिळवू शकत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात नेहमी कमी वेगाने गाडी चालवावी.
–
- पंख्याचा स्पीड कमी झालाय? इलेक्ट्रिशियनला न बोलवताही या टिप्सनी वाढेल स्पीड, वीजही वाचेल
- पहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो?
–
८. कोणत्याही वेगाने, फक्त १५cm (दीड इंचापेक्षा थोडे जास्त) पाणी देखील तुमचे कारवरील नियंत्रण गमावू शकते. तुमच्या कारच्या चाकांच्या मध्यभागाच्या वर जाणारे पाणी कधीही ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. त्यात डबक्यांचा समावेश असू शकतो.
खड्डे चुकवत कार चालवणे ते ही पावसाळ्यात, हे नक्कीच एक स्किल आहे पण तरीही जर वरील टिप्स चा तुम्ही उपयोग केला तर पावसाळ्यात खड्डे असलेल्या रस्त्यांवरून देखील गाडी चालवणे तुम्हाला सोपे जाईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.