Site icon InMarathi

R.K. Studio चे हे दुर्मिळ फोटोज् आपल्याला एका अज्ञात जादुई विश्वात घेऊन जातात

r k studio feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती’ ही कविता आपल्यापैकी सगळ्यांनी बऱ्याचदा ऐकली असेल. काही काही वास्तू या तिथल्या माणसांमुळे, तिथे घडलेल्या प्रसंगांमुळे आपल्या लक्षात असतात.

मुंबईतील अशी कितीतरी ठिकाणं आहेत, ज्यांच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात आहेत. चेंबूर जवळील आर.के स्टुडिओज हे असंच एक ठिकाण. चित्रपटप्रेमींसाठी तर ही वास्तू एखाद्या देवळासारखीच होती.

या जागेचा इतिहासदेखील तितकाच फिल्मी आहे. १९४६ साली प्रदर्शित झालेल्या ‘वाल्मिकी’ या चित्रपटात राज कपूर यांनी नारदमुनींची भूमिका निभावली होती. ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

भालजी पेंढारकर आणि कपूर घराण्याचे खूप सलोख्याचे संबंध होते. राज कपूर यांच्या कामाचे पैसे भालजी पेंढारकर यांनी देऊ केले, मात्र त्यांनी पैसे घेण्यासाठी स्पष्ट नकार कळवला.

शेवटी, भालजी पेंढारकर यांनी प्रेमापोटी चेंबूरमधील एक जागा कपूर घराण्याच्या नावे केली. १९४८ मध्ये राज कपूर यांनी इथे ‘आर.के स्टुडिओ’ची स्थापना केली.

 

‘आर.के स्टुडिओ’ने अनेक कलाकाराचं आयुष्यच बदलून टाकलं. स्टुडिओमध्ये शूट होणारा प्रत्येक चित्रपट राज कपूर यांच्यासाठी खूप खास होता. शुटिंगनंतर कलाकारांनी वापरलेले ड्रेस ते एका खोलीत जपून ठेवत. काही काही चित्रपटांमध्ये वापरलेल्या गोष्टीदेखील त्यांनी स्टुडिओमध्ये जपून ठेवल्या होत्या.

दुर्दैवाने २०१७ मध्ये या स्टुडिओला आग लागली आणि या भीषण आगीत अनेक वस्तू आणि आठवणी जळून खाक झाल्या. यानंतर काही आर्थिक चणचणींमुळे २०१८ मध्ये हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबाने घेतला.

बघूया आर.के. स्टुडिओमधील काही दुर्मिळ फोटोज, जे बघून तुम्हीही त्या काळात हरवून जाल…

१. स्टुडिओमध्ये होणारी पूजा

 

 

२. कलाकारांनी वापरलेला प्रत्येक ड्रेस जपून ठेवण्यात आलेली खोली

 

 

३. स्टुडिओमध्ये रंगपंचमी खेळली जायची. अशाच एका पार्टीत मज्जा करताना राज कपूर, शशी कपूर, जय किशन आणि राजेंद्र

 

 

४. होळी खेळताना नर्गिस

 

 

५. होळी पार्टीचे अजून काही दुर्मिळ क्षण

 

 

 

६. होळीच्या पार्टीत राज कपूर, बघा ओळखता येतंय का…..

 

 

७. होळी पार्टीत पूर्णिमा, नर्गिस, निरुपा रॉय, स्मृति बिस्वास, शम्मी, नीलम, अनवर हुसेन

 

 

८. कपडे बघताना नर्गिस दत्त

 

 

९. ‘खुफिया’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान विद्या सिन्हा आणि राज कपूर

 

 

१०. १९५० मध्ये ‘आवरा’ चित्रपटाच्या शूटिंगची तयारी

 

 

११. स्टुडिओचा हॉल

 

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version