Site icon InMarathi

एकीकडे १८५७ चा उठाव होत होता…दुसरीकडे फाऊंटन पेनच्या जन्माची कथा रचली जात होती..

fountain pen featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बायोमेट्रिक, इलेक्ट्रॉनिक सही असणारी कागदपत्रं, डिजिटल लिखाण अशा तंत्रज्ञानाच्या युगात, बॉलपेन सुद्धा हळूहळू आउटडेटेड होऊ लागलेलं असताना, फाऊंटन पेन ही तर अधिकच दुर्मिळ गोष्ट म्हणायला हवी. त्यातही शाईची बाटली, ती भरण्यासाठी एखादा ड्रॉपर किंवा तत्सम वस्तू, जास्त झालेली किंवा ओघळणारी शाई पुसण्यासाठी एखादी कापडाची चिंधी अशा सगळ्या गोष्टी सोबत सांभाळणं, हेदेखील नकोसं वाटतं.

त्यामुळे हल्लीच्या काळात काही हौशी मंडळी सोडली, तर कुणी फाऊंटन पेन वापरताना फारसं दिसत नाही. ही हौशी मंडळी सुद्धा हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच!

 

 

मात्र या फाऊंटन पेनाचा इतिहास मोठा रंजक आणि गमतीशीर आहे. फाऊंटन पेन नेमकं कुणी निर्माण केलं? ते कधी निर्माण झालं? हे जाणून घ्यायचं असेल, तर हा लेख नक्की वाचा.

फाऊंटन पेनच्या निर्मितीमुळे :

पूर्वीच्या काळात, म्हणजेच पेन अस्तित्वात येण्याआधी लिखाणाची पद्धती वेगळी होती असं म्हणायला हरकत नाही. झाडाच्या फांद्यांचे बोरू, पक्ष्यांचे पंख अशा साधनांचा वापर लिखाणासाठी केला जात होता. अनेक चित्रांमध्ये सुद्धा याचे पुरावे अगदी सहज पाहायला मिळतात.

मात्र अशापद्धतीने लिखाण करताना टोक सतत शाईत बुडवून बाहेर काढावं लागतं, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पुढे यात काही प्रमाणात बदल होऊन, बांबूपासून लेखणी तयार केली जाऊ लागली. भरीव टोक आणि मागे पोकळ काडी असं काहीसं त्याचं स्वरूप होतं. यात शाई भरून लिखाण करणं शक्य होऊ लागलं.

मात्र फॉऊंटन पेनची निर्मिती झाली आणि हे सोपस्कार सोपे झाले. फॉऊंटन पेनात भरपूर शाई भरण्याची व्यवस्था केलेली असते. पुढे असणाऱ्या निबमधून ही शाई कागदावर उतरते आणि गुरुत्वाकर्षणामुळे कागदाला चिकटून राहते. बांबू, बोरू, पंख अशा गोष्टी वापरून लिखाण करणं फाऊंटन पेनच्या निर्मितीनंतर बंद झालं.

मात्र १९६० साली बॉलपॉईंट पेनची एंट्री झाली आणि फाऊंटन पेनचं महत्त्व सुद्धा कमी होऊ लागलं.

यांनी घडवलं फाऊंटन पेन…

फाऊंटन पेन हा अविष्कार फ्रेंच संशोधक पेट्राचे पोएनरु आणि रॉबर्ट विलियम थॉमसन यांनी निर्माण केला. १८५७ साली हिंदुस्तानात ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा उठाव सुरु असताना, ही जोडगोळी फाऊंटन पेनची निर्मिती करण्यात गुंतली होती.

 

 

फाऊंटन पेनच्या निर्मितीमुळे बरेच प्रश्न सोपे झाले. लिखाण अधिक सुलभ आणि उत्तमप्रकारे होऊ लागलं. यासाठी या दोन्ही वैज्ञानिकांचे आभार मानायलाच हवेत. कारण या पेनाची निर्मिती झाल्यामुळेच, पुढे आपण आज नियमित वापरत असलेलं बॉल पॉईंट पेन निर्माण होणं शक्य झालं.

जॉन जैकब लाउड आणि त्याचा एक साथीदार यांनी बॉल पेनची निर्मिती केली. चामड्याच्या वस्तू बनवताना, त्यावर फाऊंटन पेनाने रेघ मारणं कठीण जात असे. यातूनच बॉल पेनची कल्पना जॉनला सुचली. धातूचं पातळ टोक असणाऱ्या पेनाची निर्मिती या त्रासातून झाली असल्याचं इतिहासात डोकावलं की लक्षात येतं.

फाऊंटन पेन आणि शाई…

शाईमध्ये बुडवण्याची गरज नसलेलं पहिलं पेन ही फाऊंटन पेनची महत्त्वाची ओळख आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शाईची बाटली किंवा ज्याला दौत असं म्हटलं जायचं, ती लेखांच्या वेळी प्रत्येक क्षणी बाजूला असायलाच हवी, हा मुद्दा फाऊंटन पेनाने खोडून काढला.

एकदा शाई भरली, की बराच काळ लिखाण करता येईल अशी व्यवस्था या पेनामुळे झाली. आज बॉल पेनासारखे पर्याय उपलब्ध झालेत, त्यामुळे फाऊंटन पेनाचं सुद्धा महत्त्व कमी झालंय. मात्र आजही एखादी कलाकुसर करायची असेल, एखादं खास डिझायनर पत्र लिहायचं असेल, तर कलाकार मंडळींना फाऊंटन पेनाचीच आठवण होते.

या पेनासाठी किंवा कुठल्याही लिखाणासाठी महत्त्वाची बाब असते ती म्हणजे शाई. या शाईची निर्मित इजिप्त आणि चीन या देशात सगळ्यात आधी झाली. घट्ट लगद्याच्या स्वरूपात असणारी ही शाई पाण्यात भिजवून वापरली जाते.

 

 

अर्थातच अक्षरं लिहिण्यासाठी ही शाई आधी टोकदार गोष्टींवर घ्यायला हवी हे काही वेगळं सांगायला नको. त्यातूनच अणुकुचीदार दगड, झाडांपासून बनवले जाणारे बोरू, पक्ष्यांचे पंख या वस्तू वापरल्या जाऊ लागल्या.

पुढे फाऊंटन पेनाने मात्र शाईच्या वापराचा हा संघर्ष मोठ्या प्रमाणात सोडवला. त्यामुळे आधुनिक काळात शाईचा दौत आणि फाऊंटन पेन हेच नातं आपण सगळे जाणून असतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version