Site icon InMarathi

इंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं!

kgb-InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – तुषार दामगुडे 

पंडीत नेहरुंच्या काळात आपण रशियाकडे जास्त ओढलो गेलो. रशियाने भारताच्या अलिप्ततावादाच्या धोरणाचा उपयोग स्वतःसाठी खुबिने करुन घेतला. स्वातंत्र्यपुर्व काळापासुन रशियाचे पाठबळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाला होते, त्यामुळे मॉस्कोहुन भारतीय कम्युनिस्टांबरोबर होणाऱ्या वार्तालापावर ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या ईंटेलिजन्स ब्युरोचे लक्ष होते.

हे काम ब्रिटिश निघुन गेल्यावर देखिल सुरुच होते. त्याकाळात भारतीय सरकर उलथुन त्याजागी कम्युनिस्ट सरकार आणा अशा सुचना कम्युनिस्टांना असत.

भारत रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यावर अमेरिकेने पाकिस्तानला मांडीवर घेतले. हे पाहुन चायनादेखिल पाकिस्तानजवळ सरकला. पंडीत नेहरु रशियाच्या प्रेमात असल्यामुळे अमेरिकन धोरणावर आंतरराष्ट्रिय व्यासपिठांवर चौफ़ेर हल्ला करतं.

हे पाहुन केजिबिने (सोव्हियत युनियनची पूर्वीची मुख्य सिक्युरिटी एजन्सी) प्रायोजित केलेल्या प्रकाशन संस्था नेहरुंचा बोलबाला “हुशार राजकारणी, कल्याणकारी नेता” असे करु लागल्या.

 

 

हे सगळ निकिता ख्रुशेव सत्तेत असलेल्या काळात घडत होतं, पुढे ते पाय उतार झाल्यावर रशियाने आपले धोरण पकिस्तान आणि भारताला समान लेखणारे आखले.

१९६० च्या दशकात केजिबिच्या अफ़वा पसरवणाऱ्या विभागाच्या प्रमुखाने एक भारतीय वृत्तपत्र शोधुन काढलं. योग्य तो आर्थिक पुरवठा करुन अफ़वा पसरवण्याच्या कामात त्या वृत्तपत्राचा खुबिने उपयोग करुन घेतला.

या वृत्तपत्रातील बातम्यांची सत्यता न पडताळता इतर वृत्तपत्र बिनदिक्कतपणे यातील बातम्या छापतं, त्यामुळे अफ़वा अजुन जोर पकडतं.

एका अमेरिकन उच्चपदस्थाच्या अधिकॄत कागदपत्राची बनावट नक्कल करुन डाव्यांचे कट्टर विरोधक असलेले मुंबईचे तत्कालिन मुख्यमंत्री स. का. पाटिल यांनी निवडणुक खर्चासाठी पाच लाख घेतल्याची अफ़वा उडवुन त्यांची बदनामी केली गेली.

 

 

 

अशाच एका दुसऱ्या प्रकरणात बनावट कागदपत्रे वापरुन मुंबईच्या फ़्री प्रेस जर्नल मध्ये एक बातमी छापण्यात आली. त्या बातमीत अमेरिकेने व्हियेतनाम मध्ये जैविक हत्यारं वापरल्याची हाळी उठवण्यात आली.

या बातमीची दखल लंडन टाईम्सने घेतली. नंतर या बातमीचा उपयोग मॉस्को रेडिओने करुन जगभर अमेरिकेची बदनामी करण्यात आली.

रोमेश चंद्र नावाचा इसम शिक्षणासाठी परदेशी गेल्यावर कम्युनिस्ट विचारांनी भारवला गेला. या इसमाने पुढे वर्ल्ड पिस सेंटर नावाने एक संस्था केजिबिच्या अशिर्वादाने चालु केली. या संस्थेच कार्यालय पॅरिस, प्राग येथुन स्थानीक सरकारांनी हाकलुन लावल्यावर ते शेवटी विएन्ना मधे सुरु झालं.

 

aipsowb.org

 

या रोमेश चंद्रच काम होतं, नाटो आणि अमेरिकेवर आगपाखड करणं. हे काम तो इतक्या प्रभाविपणे करु लागला की आंतरराष्ट्रिय व्यासपिठांवर त्याच्या संस्थेला प्रतिनिधित्व करायची संधी मिळु लागली.

त्या व्यासपिठावरुन तो अमेरिकन धोरणांवर सडेतोड टीका करत असे. या संस्थेच्या कामावर खुश असलेल्या केजिबिने १९७० च्या दशकात वार्षिक पाच कोटी डॉलर्स इतका निधी देउ केला. हा निधी देताना दुसरपर्यंत केजिबिचे नाव कुठे येणार नाही याची खबरदारी घेतली जात असे.

इंदिरा गांधींवर केजिबिची आधीपासुनच नजर होती. त्यांच्या भोवती आकर्षक आणि गोड बोलणारे पुरुष राहतील याची काळजी घेण्यात आली होती. इंदिरा गांधी रशियाबरोबर मैत्री करार करण्यास अनुकुल होत्या, परंतु त्यांना राजकिय विरोध भरपुर होता.

 

 

इंदिराजींनी गुपचुप रशियाबरोबर करार केला, त्याची माहिती चार पाच लोकांनाच होती. पुढे त्याची जाहिर वाच्यता करण्यात आली. या मैत्री कराराचा फ़ायदा घेऊन केजिबिने आपले भरपुर अधिकारी भारतात घुसवले.

या अधिकाऱ्यांनी जे अहवाल लिहिले आहेत त्यात “या लोकांनी देश विकायला काढल्याचे” नमुद केलेले आहे. सीआयए देखिल भारतात खोलवर घुसल्याचे हे अधिकारी लिहितात.

तत्कालिन केंद्रिय मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने पन्नास हजार डॉलर्सच्या बदल्यात देशाची गुपितं विकण्याची तयारी एका रशियन हेराला दाखवली होती आणि दुर्दैव म्हणजे हा मंत्री पुढे जाऊन पंतप्रधानदेखिल झाला.

“आम्ही मित्र देशांतुन हेरगिरी करत नाही” असे त्या मंत्र्याला सांगुन कटवण्यात आले, पण तो मंत्री गप्प बसला असेल का? ती गुपितं CIA ,ISI , mi6 यापैकी कुणाला तरी विकली नसतील का? असो, इंदिरा गांधीच कह्यात असल्यामुळे कम्युनिस्ट पार्टिची तितकीशी गरज केजीबी ला राहिली नव्हती. गरज पडली तेव्हा तेव्हा कम्युनिस्टांना इंदिराजींना मदत करण्याचे आदेश दिले जात आणि ते पाळले जात.

 

 

ललित मिश्रा नामक इसमाच्या माध्यमातून केजीबी काँग्रेस पक्षाला आर्थिक पुरवठा करत असे. हा ललित मिश्रा कुठून पैसा उभा करतो याची चौकशी कधी इंदिराजींनी केली नाही, तशी गरजही भासली नाही. (या ललित मिश्रानेच योगायोगाने विमानात ओळख झालेल्या मनमोहन सिंग यांना राजकारणात आणलं.)

काँग्रेसला जास्त निधी मिळतो हे पाहून कम्युनिस्ट तक्रार करत असतं, पण तिकडे दुर्लक्ष करून त्यांनाही पार्थिव पुरवठा केला जाई, याकामासाठी कम्युनिस्ट पार्टीने स्थापन केलेल्या आयात निर्यात उद्योगांच्या माध्यमातून मदतनिधी पाठवला जाई.

 

 

१९७५ साली इंदिरा गांधींचं स्थान बळकट राखण्यासाठी जवळपास एक कोटी रुबल्स केजीबीने खर्च केले आहेत.

आणीबाणी नंतर पुन्हा निवडणुका लागल्या तेव्हा केजीबीने वैयक्तिक शंभर सव्वाशे बैठका लावल्या, कित्येक ठिकाणी केजीबीचे गुप्तहेरच उमेदवार होते, तर काही उमेदवारांना आर्थिक पुरवठा केजीबीकडून झाला होता. यातले काहीजण आधी मंत्री होते. तरी शेवटी लोकांनी इंदिराजींना नाकारले हा इतिहास आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com | वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version